लेखन

संवाद : BMM २०२६: उत्तररंग सह-अध्यक्षा (co-chair) - श्रीमती उषा आडगावकर

Submitted by सुखदा देवधर on 17 July, 2026 - 13:30

नमस्कार मंडळी!

बीएमएम २०२६ (BMM 2026 - बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशन २०२६) मधे ज्येष्ठ नागरिकांसाठी आपण 'उत्तररंग' आयोजित केला आहे. त्यामध्ये उत्तम चर्चासत्र, व्याख्याने आहेतच. पण मला उत्सुकता आहे ती त्यातल्या अंताक्षरीची. या अंताक्षरीचा सगळा बेत आखलाय आपल्या उषा काकूंनी.

विषय: 

पागोळ्या

Submitted by मनीमोहोर on 18 August, 2026 - 02:00

पागोळ्या

पाऊस मला कोणत्याही गावातला आणि कोणत्या ही वेळेचा आवडतो. पण सर्वात जीव लावतो तो पावसाचे चार ही महिने आपली नित्य नवी रूपं दाखवणारा, मनाला अक्षरशः वेड लावणारा कोकणातला पाऊस. ..

विषय: 
शब्दखुणा: 

भारतात आणल्या गेलेल्या पोलिश निर्वासित मुलांची दुसऱ्या महायुद्धातील कथा

Submitted by रेव्यु on 15 August, 2026 - 08:08

दी इपोक टाइम्स मधील एका आर्काइव्ह्ज आधारे
जेव्हा जगाने पाठ फिरवली होती, तेव्हा दुसऱ्या महायुद्धाच्या काळात बेघर आणि निराधार झालेल्या मुलांना आश्रय व आशेचा किरण देण्यासाठी महाराज दिग्विजयसिंहजी जडेजा पुढे सरसावले. दिग्विजयसिंहजी रणजितसिंहजी जडेजा हे भारताचे माजी क्रिकेटपटू अजय जडेजाचे पणजोबा (खापर पणजोबांचे भाऊ किंवा आजोबांचे काका) आहेत.
नवानगरचे महाराज दिग्विजयसिंहजी रणजितसिंहजी जडेजा; ज्यांच्या करुणेमुळे आणि निर्णायक कृतीमुळे दुसऱ्या महायुद्धादरम्यान विस्थापित झालेल्या शेकडो पोलिश मुलांना आश्रय मिळाला.

विषय: 

कॉम्प्लिमेन्टरी ब्रेकफास्ट

Submitted by रेव्यु on 15 August, 2026 - 07:02

हॉटेलमधला मोफत नाश्ता ही अशी जागा आहे जिथे लोक भुकेमुळे नाही, तर खोलीचं भाडं वसूल करण्याच्या इच्छेपोटी खातात. घरी टोस्टचे दोन तुकडे पुरेसे असतात, पण हॉटेलमध्ये, तुम्ही प्लेट उचलल्याबरोबर तुमच्यातला बकासूर जागा होतो.
सर्वात आधी, आपण फळं घेतो कारण आपल्याला निरोगी दिसायचं असतं. पण लगेच पुढचे काऊंटर खुणावत असतात मग त्याच्या शेजारी, आपण आलू पराठा, इडली, पोहे, सॉसेज आणि एक छोटा क्रोइसेंट ठेवतो, जो आपल्या ओळखीचा नसतो, पण तो मोफत असतो, म्हणून त्याचा आदर करायलाच हवा म्हणून आपण घेतो.

विषय: 

"फासे "

Submitted by @अज्ञात म्हणे on 14 August, 2026 - 06:39

​आयुष्याचे कसे निराळे फासे हे फिरले,
ज्या बघूनी आनंद कळे, तेच हसे विरले!

​होत असतील जखमा मज तुझ्या चाहुलींच्या
दिसू दे ती रोज ईश्वरा, अनेक अपघात कर रे!

​अताशा इच्छा खूप होते मंदिरात जाण्याची,
बघितले बाहेर तुला, अन् अवसानच सरले!

​आयुष्याचा एक एक सर्ग पालटत गेला जसा,
जगुनी न जगल्याचे असे, भास व्हाया लागले!

​अन् एका जन्मी मला जरा तू तुझे डोळे दान कर,
बघू दे की अहंपणाचे किती डोहाळे राहिले!

-दक्ष .

विषय: 
शब्दखुणा: 

जिवती

Submitted by Mugdha Deole on 14 August, 2026 - 05:42

श्रावण नुकताच सुरू झाला होता.

पुण्याच्या आकाशात सकाळपासूनच ढगांची गर्दी होती. खिडकीतून येणाऱ्या पावसाच्या गार वाऱ्याबरोबर ओल्या मातीचा मंद सुगंध घरभर पसरला होता.

किचनमधून मीराचा आवाज आला.

"अनन्या, जरा स्टोअररूममधली ती तपकिरी पेटी देशील का गं?"

लॅपटॉपसमोर बसून ऑफिसची मीटिंग अटेंड करत असलेली अनन्या थोडी वैतागली.

"आई, आत्ताच का? पाच मिनिटांत देते."

"हो हो, आधी तुझं काम कर."

मीराने सहज उत्तर दिलं.

हीच त्यांच्या नात्याची खासियत होती.

मीरा सल्ला द्यायची, सांगायची, समजावायची; पण आग्रह करायची नाही.

शब्दखुणा: 

द क्वीन्स गॅंबिट - चौसष्ट चौरसांतील शांतता

Submitted by अस्मिता. on 13 August, 2026 - 15:33

(अनुभव मार्च - २0२६ पूर्वप्रकाशित
ललिता- प्रीतीने मुद्रितशोधनासाठी मदत केली आहे. )

द क्वीन्स गॅम्बिट : चौसष्ट चौरसांतली शांतता

विषय: 
शब्दखुणा: 

आक्षेपार्ह(?) कथेचे अध्यापन व नोकरीतून डच्चू

Submitted by हेमंतकुमार on 11 August, 2026 - 01:59

अभिव्यक्ती स्वातंत्र्य, नैतिकता, अश्लीलता आणि तत्सम मुद्दे हे कायमच जगभरात संवेदनशील विषय होऊन राहिलेले आहेत. ते शब्द बरेच सापेक्ष असून त्यांच्या व्याख्याही देशप्रांतकालागणिक काहीशा भिन्न असलेल्या आढळतात. इतिहासात आतापर्यंत अनेक साहित्यप्रकार अथवा कलाकृतींवर विविध कारणांनी सरकारी बंदी घातल्याची उदाहरणे आहेत. तसेच त्यांच्या लेखक वा कलाकारांनाही न्यायालयीन खटल्यांना सामोरे जावे लागलेले आहे. एखादे प्रौढ साहित्य जर काही लोकांच्या मते आक्षेपार्ह असेल तर ते विद्यार्थ्यांना अध्यापनासाठी ठेवावे काय, असाही वादग्रस्त मुद्दा चर्चेत येऊ शकतो.

विषय: 

"गोंदण"

Submitted by @अज्ञात म्हणे on 10 August, 2026 - 03:29

तुला बघताना पुन्हा ठार झालो,
तुझा न होता ही तुझाच फार झालो!

​सत्वरी जाणीव आली सावरून मज गेली,
असे सावल्यांना माझे ,पाहणे पाहून गेली!

​कर्दमल्या आकाशी जणू तुझेच गोंदण हे,
थांबतो चंद्र खिडकीत ,तुझेच आंदण हे!

​स्मरणे विस्मरून गेलो, काय तुझी किमया ग,
मलाच आता मी दर्पणी दिसेनासा झालो!

​तुला बघताना पुन्हा ठार झालो,
तुझा ना होता ही तुझाच फार झालो!

-दक्ष

शब्दखुणा: 

प्रेयसी (३/४)

Submitted by आर्त on 7 August, 2026 - 11:10

आमची ओळख एका अ‍ॅपवर झालेली आणि तिथेच तीन-चार वेळा संदेशव्यवहार झालेला. आज पहिल्यांदाच आमची प्रत्यक्षात भेट होणार होती. गेल्या दशकात अपयशी ठरलेल्या प्रेमानुभवांमुळे आपल्याला कधीच योग्य साथीदार मिळणार नाही, या विचाराने मन त्रासलेलं. तरीही आज आशेचा उमाळा जाणवत होता. चालता चालता वाटेत सतत तिचे फोटो डोळ्यासमोर येत होते. तिचं निरागस हास्य मनात ठाम मुक्काम मांडून बसलेलं. कानात संथ झुळूकेची मंद अलगुज वाजावी, तसे ते मला मनातल्या मनात ऐकू येत होतं. आपण ओळखत नसलेल्या व्यक्तीचा फोटो बघून नकळत आपल्या मनात त्या व्यक्तीची प्रतिमा बनते, तिला एक आवाज असतो, तिचे हावभाव असतात आणि तिला एक स्वभाव असतो.

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - लेखन