प्रेम

प्रेयसी (३/४)

Submitted by आर्त on 7 August, 2026 - 11:10

आमची ओळख एका अ‍ॅपवर झालेली आणि तिथेच तीन-चार वेळा संदेशव्यवहार झालेला. आज पहिल्यांदाच आमची प्रत्यक्षात भेट होणार होती. गेल्या दशकात अपयशी ठरलेल्या प्रेमानुभवांमुळे आपल्याला कधीच योग्य साथीदार मिळणार नाही, या विचाराने मन त्रासलेलं. तरीही आज आशेचा उमाळा जाणवत होता. चालता चालता वाटेत सतत तिचे फोटो डोळ्यासमोर येत होते. तिचं निरागस हास्य मनात ठाम मुक्काम मांडून बसलेलं. कानात संथ झुळूकेची मंद अलगुज वाजावी, तसे ते मला मनातल्या मनात ऐकू येत होतं. आपण ओळखत नसलेल्या व्यक्तीचा फोटो बघून नकळत आपल्या मनात त्या व्यक्तीची प्रतिमा बनते, तिला एक आवाज असतो, तिचे हावभाव असतात आणि तिला एक स्वभाव असतो.

शब्दखुणा: 

फ़क्त एक हाक...

Submitted by Narendra on 2 April, 2026 - 13:04

आकाशात उडणारे जेव्हां जमीनीवर चालू लागतात
आणी चक्क् माणसांशी बोलू लागतात...

खरं म्हणजे अशात् इतरांनाच आश्च्रर्य व्हावं
ह्यांना धरतीवर बघुन माणसांनीच घाबरावं
पण वर हेच उलट शिमगा करतात
म्हणे, हि माणसं आम्हाला घाबरवतात

आकाशी उडतांना तर सर्वच् जवळ होते
चंद्र, सुर्य, तारे नेहेमीच आटोक्यात होते
मग आता, आकाश सोडुन इथे काय भावलं?
हे पाखरु आज् जमीनीकडे कसं काय धावलं?

म्हणे, सुर्य लांबूनच गुलाबी वाटतो
जवळ जाता नुसताच् जाळतो
तारे आहेत लांबच-लांब रे सारे
चंद्र् ही एकच् आणी कितीतरी झुरणारे

शब्दखुणा: 

"Sleepless In Seattle"

Posted
6 months ago
शेवटचा प्रतिसाद
6 months ago

सॅम बाल्डविन (टॉम हँक्स) हा एक मध्यमवयीन पुरुष आपल्या पत्नीला गमावल्यानंतर आपल्या ७–८ वर्षांचा मुलगा जोनाहसोबत सिएटलला स्थलांतर करतो. पत्नीच्या मृत्यूला दीड वर्षांहून अधिक काळ उलटून गेला असतानाही सॅम अजूनही तिच्या आठवणीत हरवलेला असतो. आपल्या वडिलांसाठी नवी पत्नी आणि स्वतःसाठी नवी आई शोधण्याच्या उद्देशाने जोनाह एका रेडिओ शोला फोन करतो. त्या शोचं नाव असतं “Sleepless in Seattle”.

विषय: 
प्रकार: 

माझा किनारा

Submitted by अर्जुन ..✍️ on 19 February, 2026 - 08:18

उंबर्‍यावरील माप ओलांडून,
माझीच एक सावली होऊन आलीस,
माझ्या संसाराच्या वेलीवर,
सुखाचं फूल होऊन फुललीस.

दिवसाची सुरुवात तू,
अन् रात्रीचा अंतही तूच,
तुझ्याविना व्यर्थ आहे सारं,
असा माझा पूर्ण संसार तूच.

स्वभाव तुझा इतका प्रेमळ,
जणू अमृताची धार,
माझ्या अनेक चुका पचवूनही,
मला सावरणारी तूच माझा आधार.

संसाराच्या या व्यापात,
तू स्वतःला झोकून देतेस,
स्वप्न आमची फुलवताना,
स्वतःलाच मात्र विसरून जातेस.

द गर्लफ्रेंड..

Submitted by प्रथमेश काटे on 10 February, 2026 - 23:43

भाग १ - अनपेक्षित भेट (Chance Reunion)

त्या रम्य सायंकाळच्या वेळी, नीरज आपल्या मित्रांसोबत गप्पा मारत एका कॅफे मध्ये बसला होता.

"काय रे, आज खूप आनंदी दिसत आहेस." त्याचा मित्र रविने थट्टेच्या सुरात विचारलं.

"आठवडाभर ऑफिसमध्ये राब राब राबल्यानंतर, आज मित्रांसोबत एन्जॉय करायला मिळतंय, मग आनंद तर होणारच.

"हं. बरं मित्रांनो... आज आपल्यासोबत कोणीतरी सामील होणार आहे. कुणीतरी खास" रवि ने एकदम जाहीर केलं.

"खास? कोण?" नीरज ने आश्चर्याने विचारलं.

"पहा, ती आलीच ती." कॅफेच्या एन्ट्रन्स कडे पाहत रवि म्हणाला.

गोष्ट एका प्रेमाची!

Submitted by पराग र. लोणकर on 22 August, 2025 - 08:11

गोष्ट एका प्रेमाची!

पुस्तक बदलण्यासाठी वाचनालयात जाण्यासाठी प्रिया घराच्या बाहेर पडली आणि काही अंतरावरूनच तिला मोटरसायकलवरून राजा येताना दिसला. तिचा चेहरा एकदम खुलला. राजा जसा थोडा जवळ येऊ लागला तसं त्याच्या मागे बसलेली सोनाली प्रियाला दिसली आणि प्रियाचा चेहरा एकदम पडला. तिच्या अगदी जवळ येऊन राजाने मोटरसायकल थांबवली.

“काय लायब्ररीत का?” त्यानं हसत तिला विचारलं.

“होss येतोस का?” आपण काहीतरी वेड्यासारखा प्रश्न विचारला आहे, हे प्रियाला तो प्रश्न विचारताच लक्षात आलं.

“अगंs आम्ही पिक्चरला चाललोय.” राजा अगदी सहज तिला म्हणाला.

शब्दखुणा: 

तिच्या साठी

Submitted by शुभम खडसे on 26 March, 2025 - 08:31

तुझ्या डोळ्यात दिसली प्रेमाची आग
मन माझं राख झालं जी
तुझ्या सुंदर्श्या चेहऱ्याला जगाची नजर
जरा सांभाळून वाग जी

या तळमळत्या पायाला तू पैंजण घाल
या विचलित केसांना मागे तू सार
या तरसत्या कानांना दे डूलांच ओझं
या लखलखत्या ज्वानी ला दे अप्सरेची चाल

तुझ्या सुंदरतेची वाणी
मी रेखाटली शब्दातूनी

माझ्या मनातल्या कवीला तुझी साथ असू दे

शब्दखुणा: 

तू प्राणप्रिये...

Submitted by अनिकेत बालाजी येमेकर on 19 March, 2025 - 14:58

मी देह तरी तू प्राण प्रिये
हि बात आता तू जाण प्रिये
जणू एक तपस्वी जाण मला
मी स्मरतो ते तू ध्यान प्रिये

मज सृष्टी चा तू सूर्य जणू
मी दीपक एक लहान प्रिये
महासागर तू ग प्रेमाचा
मी मिथ्या अभिमान प्रिये

तुज ठाईच मन रमते माझे
तू जगण्याला आधार प्रिये
तुज विन अपुरा आहे मी
तुज संगे मी साकार प्रिये

प्रेम तुझे माझे...

Submitted by अनिकेत बालाजी येमेकर on 19 March, 2025 - 14:50

देह माझा, देह तुझा
आज आहे, उद्या नाही
परी प्रेम हे तुझे माझे,
कधी संपणार नाही

वृद्ध झालो जरी तू मी
परी प्रेम ते तरुण,
अन वाढत्या वयात
दाट होई ते अजून

जन्म दुसरा कोण पाही ?
तू मज मिळेल की नाही?
आज आहे तुझ्यासवे
उद्या होणार ते होई

जरी नभ कोसळले
जरी भूमी ही फाटली,
तुझ्या माझ्या या प्रेमाची
किरणे अनंत दाटली...

Pages

Subscribe to RSS - प्रेम