"तुझ्या नवऱ्याला मी एका बाईबरोबर लक्ष्मीरोडला पाहिलं आज शॉपींग करताना, लक्ष दे बरका त्याच्याकडे, आज जरा गडबड आहे. उद्या निवांत बोलते तुझ्याशी."
गाडेबाईनी दिपाला काल फोनवर असे काही सांगितल्याने तिच्या पायाखालची जमीन सरकली होती. आज सकाळपासूनच घरातल्या भांड्यांचा आवाज वाढला होता. मुलांनी अमुक भाजी नको म्हटल्यावर "जे केले आहे ते खा गुपचूप" असा सज्जड दम भरला गेला होता.
"आम्हीच मर मर मरायचं, आम्हाला कुठं शॉपींगला न्या म्हटलं तर लय कामं निघत्याय ऑफिसची. त्या सटवीबरोबर बरं वेळच वेळ असतो हिंडायला"
डिसक्लेमर - मी व्यवसाय म्हणुन टॅरो वाचत नाही ना मित्र-मैत्रिणींकरता रीडींग देते. मी टॅरो स्वतःपुरते वापरते. त्यातून मला निखळ आनंद मिळतो. ज्यांना टॅरो वगैरे गोष्टी भंपक वाटतात, सायकॉसिस वाटतात त्या सर्व तज्ञ मंडळींना, विद्वान मंडळींना लांबूनच कोपरापासून नमस्कार. नका वाचू.
लेख विस्कळीत आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
शाळेत असताना नुकतंच वर्तमानपत्र वाचायला सुरूवात केलेली तेव्हां आणिबाणी, इंदिरा गांधी, संजय गांधी, मोरारजी देसाई, जयप्रकाश नारायण ही नावं हेडींगमधे वाचून माहिती व्हायला सुरूवात झाली होती. हेडींग शाळेत सांगावी लागत. वरच्या यत्तेत गेल्यावर टिव्ही आला. तेव्हां आंधी, किस्सा कुर्सी का ही नावं माहिती झाली. यावर सतत काही ना काही कॉण्ट्रोवर्सी चालू असे. कॉलेजला पोहोचल्यावर इलस्ट्रेटेड वीकली वगैरे मधून बंदीचे संदर्भ येत. तेव्हां अर्थातच ही जुनी गोष्ट झाली होती, पण पडसाद उमटत होते, ते आजतागायत चालू आहे. आता क्षीण झाले आहेत संदर्भ.
अलिप्त, स्वमग्न | ऐसी ज्यांची ख्याती
पडीक असती | ऐ x वर ||१||
कुटुंबवत्सल | मनाने मोकळे
म म व लोटले | मा x वरी ||२||
उर्वरित गुण- | -दोषांनी भरले
तयांनी गाठले | मिx त्वरे ||३||
नेमका पर्याय | पा/सी/बो मधून
घ्यावा निवडून | फुल्ली साठी ||४||
आता तुम्ही सांगा | संस्थळ कोणते
तुम्हा आवडते ? | लाजू नका ! ||५||
"विशेषणे ना वापरता
कविता येईल का लिहिता?"
मी त्याला हे विचारता
"प्रयत्न करतो," तो वदला!
"छंद, वृत्त , लय, गेयता
फाट्यावर मारून कविता
येईल का तुजला लिहिता?"
मी त्याला हे विचारता
"प्रयत्न करतो", तो वदला!
"हद्दपार कवी कायमचा
करून मग कोणा कविता
येईल का सांगा लिहिता?"
मी त्याला हे विचारता
जरा थांबला, घुटमळला
"कवितेतच उत्तर देतो
मीच विचारून हे मजला"..
..AI AIसे पुटपुटला
नवे काव्य आऊटपुटला
पात्र म्हणजे प्रोटॅगनिस्ट अशा अर्थाने पात्र.
तर याच्यामध्ये एकतर पात्र आहे, दुसरा पात्राच्या डोक्यातला आवाज आहे आणि तिसरा मी आहे. असे तीन जण आहेत.
मला पात्राला गोव्याला पाठवायचं आहे. काही नाही. सहजच. जेनझी लेखक पात्राला धरमशाला ला पाठवतात. एलएसडीचे वगैरे नाद असतात त्यांना. मी मिलेनियल. 'दिल चाहता है'नं आमच्या पिढीला गोव्याची वाट दाखवली. माझी मजल तिथपर्यंतच.
माय मराठीचे पांग
त्यांनी परवा फेडले
उच्चारांची ऐसी तैसी
त्यांना कोणी ना रोखले
श्रद्धांजलीचा कागद
त्यात आधी होती भेळ
त्यात फॉन्ट होता छोटा
मग झाला थोडा घोळ
दास डोंगरीचा जनां
सांगून कधीचा गेला,
"दिसामाजी काही तरी
जन लिहीत हो चला,"
जन चला हो वाचत
प्रसंगी, नि अखंडित"
उपदेश मनोमनी
पटे, गेलो मी वाचत
काही बाही वाचलेले
अवचित सुचलेले
लिहिण्याच्या आळसाने
सालो-साल साचलेले
असा सगळा मामला
म्हटले लिहीन चला
सुदैवाने सोमि तेव्हा
आयुष्यात उगवला
कायप्पाच्या विद्यापीठी
एकनिष्ठ मी स्नातक
छद्मविज्ञानाचा भोक्ता
ध्येय माझे: फेकाफेक
फॉरवर्ड चा वक्र बाण
माझ्या भात्यामध्ये आला
मग स्वतः लिहिण्याचा
बेत ढगांमध्ये गेला
मोरोपंतांनी त्यांच्या कर्णपर्व काव्यात भीम आणि दु:शासन यांच्या द्वंद्वयुद्धाच्या प्रसंगी वर्णन करताना खालील आर्या लिहिली आहे.
धावति अन्योन्यावरि ते दोघे आठवूनी अपकार
जाणो ते मदमत्त क्रोधोद्धत दंपतीच अपकार
याचा अर्थ पुढीलप्रमाणे- मदाने मातलेले आणि रागाने उद्धट झालेले हत्ती जसे एकमेकांवर धावून जातात, तसे ते दोघे (भीम आणि दुःशासन) परस्परांनी केलेले अपकार आठवून एकमेकांवर चढाईने धावून जाऊ लागले.
आता प्रश्न असा की वरील अर्थात हत्ती हा शब्द कसा येऊ शकतो ते तुम्हाला सांगता येईल का?
दोन मराठी कोडी देत आहे.
१. तळ्याकाठची फेरी - राधा चढावर मिनिटाला ७० मीटर चालते, उताराला मिनिटाला १३० मीटर चालते आणि सपाटीवर मिनिटाला ९१ मीटर चालते. राधाच्या घराजवळ एक तळे आहे. त्या तळ्याच्या सभोवतालीच्या गोल रस्त्यामधे चढ, उतार, आणि सपाटी असे तिन्ही प्रकार आहेत. रोज सकाळी त्या रस्त्यावरून दिलेल्या गतीने राधा दोन फेर्या मारते. पण त्यापैकी एक फेरी मारून झाली की ती त्याच पावली परत फिरून उलटी दुसरी फेरी मारते. रस्त्याची एकूण लांबी ५४६० मीटर धरली तर दोन फेर्या मारायला राधाला एकूण किती वेळ लागतो?