अमीट टॅटू

Submitted by निमिष_सोनार on 17 October, 2025 - 11:17

(Loreen या गायिकेच्या इंग्रजी Tattoo या माझ्या आवडीच्या गाण्याचा, मी केलेला मराठी भावानुवाद. हे त्या गाण्याचे शब्दशः भाषांतर नाही.)
(मूळ गाणे: https://music.youtube.com/watch?v=pbDKb311Zrg&si=UgvM3buFVpMTXYK3)

तू गेलास निघून दूर,
पण आठवण अजूनही उरली आहे,
तुझ्या स्पर्शाची रेघ,
अजूनही मनावर कोरली आहे.
हा वेदनेचा रंग गहिरा,
ही खूण डोळ्यांतील आसवांची आहे,
तुझे नाव माझ्या कोमल हृदयात,
रक्तासारखे भिनले आहे,

जणू माझ्या देहावरचा,
तू न पुसला जाणारा टॅटू आहेस...

तुझ्या प्रेमाचा श्वास,
अजूनही माझ्यात अविरत चालतो आहे.
विरहाच्या राखेतूनही,
आपला नवा सहवास जन्म घेतो आहे.
त्यापासून पळता येत नाही,
तो विसरता येत नाही,
बघावे तिथे तू दिसतोस,
तुला दूर सारता येत नाही.

जणू माझ्या देहावरचा,
तू न पुसला जाणारा टॅटू आहेस...

तूच माझी जखम आहेस,
पण तूच आहेस औषधही,
तू गेलास दूर तरीही,
जगणं तुझ्याशिवाय शक्य नाही.

माझ्या हृदयाचा प्रत्येक ठोका सांगतो,
तू इथेच आहेस,
तू तर माझ्या त्वचेवर गोंदलेलं,
अमीट सत्य आहे,

जणू माझ्या देहावरचा,
तू न पुसला जाणारा टॅटू आहेस...

Group content visibility: 
Public - accessible to all site users