लेखन

हा गंध जिवाला लावी पिसे ....

Submitted by अनिंद्य on 18 October, 2025 - 04:04

हा गंध जिवाला लावी पिसे ......

एक मिनिट. मूळ गाण्याचे बोल वेगळे आहेत हे माहिती आहे. पण ‘छंद जिवाला लावी पिसे’ ऐवजी ‘गंध जिवाला लावी पिसे’ लिहिले तरी फार काही बिघडते का? गंध सुद्धा जिवाला पिसे लावतो आणि तोच छंद असेल तर तुमच्या कुंडलीत कनकगन्ध नामक योग आहे असे खुशाल समजावे.

विषय: 

नौसैनिकांची चलाखी

Submitted by सुबोध खरे on 17 October, 2025 - 03:33

नौदलात काम करत असताना अनेक हुशार आणि चलाख नौसैनिकांबरोबर काम करण्याचा प्रसंग आला. सैन्याची कोणतीही शाखा म्हटली की शौर्य, शिस्त, उत्तम निर्णयक्षमता इत्यादी गुणांचे अधिकारी व सैनिक सर्वसामान्य नागरिकांच्या डोळ्यासमोर येतात. सैन्यातील कडक शिस्त तर सुपरिचित आहे,

पण सैन्यदलातही शेवटी तुमच्या-आमच्यातीलच व्यक्ती काम करतात ना? तर, अशा व्यक्तींकडून कधी कधी मजेशीर, चलाख किस्सेही घडतात. त्यातील काही निवडक किस्से -

विषय: 
शब्दखुणा: 

पाचोळा

Submitted by विमुक्त on 15 October, 2025 - 05:04

गारवा हवेत येता
रंगाचा पारा चढतो
निष्पर्ण होण्याआधी
वर्ण तरूचा खुलतो...

पाना पानांवर लावून
उबदार रंगाचे अस्तर
देण्या थंडीला उत्तर
प्रत्येक तरूवर तत्पर...

सुंदर नटल्या पानाला
अल्लड समीर छेडतो
वाहून सोबत पानाला
अलवार धरेवर सोडतो...

हळूहळू धरा मग सजते
लेवून सुवर्ण पर्णराशी
देवून दान, हसे झाड
जरी असे ते उपाशी

स्थितप्रज्ञ तो तरू
दिसे तेजस संन्याशी
प्रतीक्षेत वसंताच्या
सोबत पाचोळा पायाशी...

विमुक्त
१५/१०/२०२५

विषय: 

अमेरिकन दादागिरी भाग एक

Submitted by अविनाश जोशी on 9 October, 2025 - 03:47

अमेरिकन दादागिरी भाग एक
सध्या अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प याची ज्या तऱ्हेनी अमेरिकन दादागिरी चालली आहे ती अमेरिकेच्या सर्व थोर परंपरांना धरूनच आहे. आपल्याला फक्त व्हिएतनाम किंवा फारतर क्युबा आठवतो. परंतु वीस ते पंचवीस देशात तरी अनेक अमेरिकन अध्यक्षांनी असे पराक्रम केले आहेत . बहुतेक ठिकाणी बंड घडवून आणायचे आणि बंडाला पैसे पुरवायचे आणि नंतर देशाला मदत म्हणून सैन्य घुसवायचा किंवा अमेरिकन लोकांची गळचेपी होत आहे म्हणून त्या देशात घुसायचे हा प्रकार कित्येक दशके चालू आहे.

विषय: 

नाव सुचवा

Submitted by अविनाश जोशी on 6 October, 2025 - 07:52

नाव सुचवा
चित्रपटामध्ये बऱ्याच गंमती जमती चालू असतात. फिल्म इन्स्टिट्युट सुरु झाल्यावर प्रत्येकास एक शॉर्ट फिल्म करावी लागते. त्या त्या कोर्सेचे विद्यार्थी तेथे जॉब्स करतात. जया भहादूरीची 'सुमन' नावाची एक शॉर्ट फिल्म होती. कथानक साधे होते. ती एक पौगोंडा अवस्थेतील मुलगी असते. सूर पारंब्या खेळणे , झाडावर चढणे अशा गोष्टीत रममाण होत असते. एकदा तिला अचानक आपल्यातल्या स्त्री ची जाणीव होते आणि तिची वृत्तीच बदलते. उत्कट अभिनयामुळे ती एक चांगली फिल्म होती. परंतु त्यातील काही दृशांमुळे तिचे प्रदर्शन थांबवले गेले.

विषय: 

समुद्रच आहे एक विशाल जाळं

Submitted by अश्विनी कंठी on 3 October, 2025 - 23:15

ही एक दीर्घ कविता आहे.
एका समुद्रात राहणाऱ्या निळ्या पोटाच्या काळ्या मासोळीची ही गोष्ट आहे. या मासोळीचे मनोविश्व मोठे विलक्षण आहे. वाचायला लागल्यावर एकसलग वाचत रमून जावे अशी ही गोष्ट.
या मासोळीला सारखे वाटत असते की ती इतरांपेक्षा वेगळी आहे. तिच्या मते प्रत्येकजण जरी आपापल्या जागी वेगळा असला तरी मी या सगळ्यापेक्षा वेगळी आहे. प्रत्येकाचे दिसणे वेगळे असते, चाकोरीतले जगणे वेगळे असते. या मासोळीचे मात्र आजूबाजूच्या विश्वात मन रमत नाही. तिला चाकोरी नकोशी झाली आहे. तिचे ठाम मत आहे की आपण चाकोरीत अडकून पडायलाच पुनः पुनः जन्म घेत असतो. तिला या सगळ्यातून बाहेर पडायचे आहे.

बालक पालक

Submitted by देवू१५ on 3 October, 2025 - 04:33

आपल्या घरातील गप्पा, शेजारच्या छोट्या गोष्टी, रस्त्यावर घडलेली एखादी घटना— यात किती मजेशीर किस्से दडलेले असतात, नाही का? या छोट्याशा प्रसंगात विनोदही असतो, शिकवणही असते आणि जीवन हलकंफुलकं करण्याची ताकदही असते. असेच काही लहान मुलांचे निरागस किस्से.

पिझ्झा

घराचा दरवाजा वाजला म्हणून आईने दरवाजा उघडला.

शेजारची अंकिता, पाच वर्षाची चुणचुणीत मुलगी, पाठीवर दफ्तर घेऊन दारात उभी.

अंकिता : आंटी मम्मी येईपर्यंत तुमच्याकडे बसू का?

आई : ये, आत बस. पण तुझी मम्मी कुठे गेली ?

अंकिता : मम्मी मैत्रिणीकडे गेली, भिशीसाठी.

विषय: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - लेखन