लेखन

काटा वजनाचा --४

Submitted by सुबोध खरे on 23 January, 2026 - 01:51

आतापर्यंत आपण वजन जास्त म्हणजे किती आणि ते का वाढते याची साधारण कारणे पाहिली.

काही लोक आपल्याला भरपूर खाताना दिसतात तरीही त्यांचे वजन वाढत नाही. याउलट बहुसंख्य स्थूल लोकांची एक तक्रार असते कि आम्ही एवढा डाएट करतो तरी आमचे वजन कमी होत नाही. या दोन्ही गोष्टीत थोडे फार तथ्य आहे याचे विवेचन.

विषय: 
शब्दखुणा: 

नकारात्मक संरक्षण धोरण

Submitted by अविनाश जोशी on 23 January, 2026 - 01:44

नकारात्मक संरक्षण धोरण
डोनाल्ड ट्रम्प यांनी डावोस येथे वारंवार सांगितले आहे की इराणवर हल्ला करण्याचे कोणतेही कारण नाही. इराणने क्रांतिकारकांना फाशी देण्याचा निर्णय रद्द केला आहे आणि सर्व काही ठीक असल्यासारखे दिसते. असे वाटते की ही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची एक रणनीती आहे, ज्याला “नकारात्मक संरक्षण धोरण” असे म्हणता येईल.
इतिहासात, रिचर्ड निक्सन यांनी इंडो-चायना प्रदेशावर हल्ला न करण्याचे सांगितले होते, पण लवकरच त्यांनी लाओस आणि कंबोडियावर हल्ले केले.

विषय: 

नकारात्मक संरक्षण धोरण

Submitted by अविनाश जोशी on 23 January, 2026 - 01:44

नकारात्मक संरक्षण धोरण
डोनाल्ड ट्रम्प यांनी डावोस येथे वारंवार सांगितले आहे की इराणवर हल्ला करण्याचे कोणतेही कारण नाही. इराणने क्रांतिकारकांना फाशी देण्याचा निर्णय रद्द केला आहे आणि सर्व काही ठीक असल्यासारखे दिसते. असे वाटते की ही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची एक रणनीती आहे, ज्याला “नकारात्मक संरक्षण धोरण” असे म्हणता येईल.
इतिहासात, रिचर्ड निक्सन यांनी इंडो-चायना प्रदेशावर हल्ला न करण्याचे सांगितले होते, पण लवकरच त्यांनी लाओस आणि कंबोडियावर हल्ले केले.

विषय: 

मनी वसे ते AI दिसे - भाग 2

Submitted by अविनाश जोशी on 22 January, 2026 - 03:10

मनी वसे ते AI दिसे - भाग 2
दुसऱ्या दिवशी सकाळी ब्रेकफास्ट टेबलवर सगळे जमले होते. समीर म्हणाला आता मी थोडक्यात तुम्हाला माझ्या प्लॅनिंगची माहिती सांगतो. पुढील दोन-तीन महिन्यातच माझा आय टी व्यवसाय मी हळू हळू बंद करून टाकणार आहे. इवेन्स्टमेंट म्हणून माझे तीस टक्के त्यात असतील पण एक-दीड वर्षातच मी त्याचे डेली काम पाहणार नाही.

विषय: 

काटा वजनाचा -३

Submitted by सुबोध खरे on 20 January, 2026 - 00:25

आता पर्यंत आपण पहिले कि वजन जास्त म्हणजे किती आणि कसे मोजायचे आणि जास्त वजनाचे तोटे काय आहेत.

आता आपण हे पाहणार आहोत कि काही लोकांचे वजन पटकन का वाढते आणि काही लोकांचे काहीही केले तरी का वाढत नाही.

प्रथम एक फार महत्त्वाची गोष्ट म्हणजे -- केवळ जास्त वजन म्हणजे जास्त चरबी नव्हे.

जास्त वजन परंतु कमी चरबी अशी माणसे असतात( खेळाडू धावपटू किंवा पिळदार शरीराची माणसे)

आणी याच्या उलट वजन बरोबर पण अंगावर चरबी जास्त अशा माणसांचे स्नायू आणी हाडांचे वजन कमी असते आणी शरीरात चरबी जास्त.

विषय: 
शब्दखुणा: 

काटा वजनाचा -२

Submitted by सुबोध खरे on 17 January, 2026 - 09:18

असे म्हणतात कि पोटाचा प्रश्न सुटला कि सुटलेल्या पोटाचा प्रश्न सुरु होतो.

तेंव्हा आपल्या पोटाचा घेर किती असावा हे अगोदर लिहिलेले आहे. भारतीय वंशाच्या लोकांसाठी कमरेचा जास्तीत जास्त घेर हा पुरुषांसाठी ३५ इंच आणी स्त्रियांसाठी ३१. ५ इंच हा आहे.हा घेर आपण जेथे प्यांट घालतो त्या कमरेच्या हाडाच्या जरासा वर मोजला पाहिजे आणी हा पोटाचा सर्वात (पुढे येणारा) पुरोगामी भाग यावर मोजला पाहिजे. यापेक्षा जास्त घेर असणार्यांना मधुमेह आणी हृदयविकार याचा जास्त धोका संभवतो.

जाता जाता -- पूर्वी लोक बर्याच दिवसांनी भेटले कि "उरा उरी" भेटत असत
आता "उदरा उदरी" भेटतात.

विषय: 
शब्दखुणा: 

इराणसमोरील पर्याय

Submitted by अविनाश जोशी on 17 January, 2026 - 01:48

इराणसमोरील पर्याय
डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला इशारा दिला आहे की, जर इराण त्यांच्या मागण्यांना मान्यता देणार नसेल तर अमेरिका बलप्रयोग करेल.
कुवेत, सौदी अरेबिया, जॉर्डन आणि सीरिया यांनी तक्रार केली आहे की इराणवर अशी कारवाई झाली तर त्याचे परिणाम त्यांच्या देशांपर्यंत पोहोचतील. तसेच मोठ्या प्रमाणावर निर्वासित त्यांच्या देशांमध्ये येतील.
इराणवर हल्ला करताना अमेरिकेची पुढील प्राधान्ये असतील:
• क्षेपणास्त्र प्रक्षेपण केंद्रांचा शोध घेऊन त्यांचा नाश करणे.
• अणुबॉम्ब व जैविक युद्धासाठी वापरल्या जाणाऱ्या सामूहिक विनाशाच्या शस्त्रांचा शोध घेऊन त्यांचा नाश करणे.

विषय: 

Pages

Subscribe to RSS - लेखन