आता पर्यंत आपण पहिले कि वजन जास्त म्हणजे किती आणि कसे मोजायचे आणि जास्त वजनाचे तोटे काय आहेत.
आता आपण हे पाहणार आहोत कि काही लोकांचे वजन पटकन का वाढते आणि काही लोकांचे काहीही केले तरी का वाढत नाही.
प्रथम एक फार महत्त्वाची गोष्ट म्हणजे -- केवळ जास्त वजन म्हणजे जास्त चरबी नव्हे.
जास्त वजन परंतु कमी चरबी अशी माणसे असतात( खेळाडू धावपटू किंवा पिळदार शरीराची माणसे)
आणी याच्या उलट वजन बरोबर पण अंगावर चरबी जास्त अशा माणसांचे स्नायू आणी हाडांचे वजन कमी असते आणी शरीरात चरबी जास्त.
असे म्हणतात कि पोटाचा प्रश्न सुटला कि सुटलेल्या पोटाचा प्रश्न सुरु होतो.
तेंव्हा आपल्या पोटाचा घेर किती असावा हे अगोदर लिहिलेले आहे. भारतीय वंशाच्या लोकांसाठी कमरेचा जास्तीत जास्त घेर हा पुरुषांसाठी ३५ इंच आणी स्त्रियांसाठी ३१. ५ इंच हा आहे.हा घेर आपण जेथे प्यांट घालतो त्या कमरेच्या हाडाच्या जरासा वर मोजला पाहिजे आणी हा पोटाचा सर्वात (पुढे येणारा) पुरोगामी भाग यावर मोजला पाहिजे. यापेक्षा जास्त घेर असणार्यांना मधुमेह आणी हृदयविकार याचा जास्त धोका संभवतो.
जाता जाता -- पूर्वी लोक बर्याच दिवसांनी भेटले कि "उरा उरी" भेटत असत
आता "उदरा उदरी" भेटतात.
इराणसमोरील पर्याय
डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला इशारा दिला आहे की, जर इराण त्यांच्या मागण्यांना मान्यता देणार नसेल तर अमेरिका बलप्रयोग करेल.
कुवेत, सौदी अरेबिया, जॉर्डन आणि सीरिया यांनी तक्रार केली आहे की इराणवर अशी कारवाई झाली तर त्याचे परिणाम त्यांच्या देशांपर्यंत पोहोचतील. तसेच मोठ्या प्रमाणावर निर्वासित त्यांच्या देशांमध्ये येतील.
इराणवर हल्ला करताना अमेरिकेची पुढील प्राधान्ये असतील:
• क्षेपणास्त्र प्रक्षेपण केंद्रांचा शोध घेऊन त्यांचा नाश करणे.
• अणुबॉम्ब व जैविक युद्धासाठी वापरल्या जाणाऱ्या सामूहिक विनाशाच्या शस्त्रांचा शोध घेऊन त्यांचा नाश करणे.
मतला
शब्द माझेच होते, पण अर्थ बदलून गेले
तू गप्प राहिलीस, वादच विरून गेले
खूप काही सांगायचं होतं, ओठांवरच राहून गेले
डोळ्यांत पाहिलं तुझ्या, नि शब्द परतून गेले
मी डोळ्यांत शोधत राहिलो स्वतःची ओळख जुनी
तुझ्या एका नजरेत सगळे प्रश्न गळून गेले
वेळेच्या प्रवाहात सर्व काही वाहून गेले
माझ्याच पाऊलखुणांचे मार्ग बदलून गेले
शांततेने शिकवलं तू किती मोठं असतं मौन
जळजळीत शब्द सारे हळूहळू जळून गेले
मक्ता
मेघ म्हणे — सावलीसारखं नातं होतं आपलं
प्रकाशात दोघेही वेगळे दिसून गेले
माझ्याकडे एक १५ वर्षाची दहावी तील मुलगी ६ महिने पाळी आली नाही यासाठी सोनोग्राफी करण्यासाठी आली होती. तिचे वजन होते ९६ किलो. तिचे वडील सांगत होते डॉक्टर तुम्हीच तिला काहीतरी सांगा.
अशीच १७ वर्षांची दुसरी मुलगी ( बारावीतील) आली होती. तिचे वजन ८७ किलो होते. पाळीची अनियमितता यासाठी.
तिची आई मला कौतुकाने सांगत होती तिचे पप्पा तिचे फार लाड करतात. तिला रोज दोन वडापाव आणून देतात.
एक तिसरी मुलगी गरोदर असताना येत होती. गरोदर होण्यापूर्वी तिचे वजन होते १०९ किलो आणि नवव्या महिन्यात वजन होते १३३ किलो.
इस्लामी नाटोचा धोका
भारतासमोर “इस्लामिक नाटो”सारख्या एका नव्या समस्येचे आव्हान उभे राहू शकते. पाकिस्तान आणि सौदी अरेबिया यांच्यात असा करार आहे की कोणत्याही एका देशावर हल्ला झाल्यास दुसरा देश मदतीसाठी पुढे येईल. सौदी अरेबिया आणि तुर्किस्तानही अशाच प्रकारच्या करारात प्रवेश करत आहेत. जर हे तिघांचे त्रिकूट अस्तित्वात आले, तर ते भारतासाठी नक्कीच मोठी डोकेदुखी ठरेल.
त्रिभुवनात सारे म्हणती, तू
आहेस सज्जनांचा सज्जन
असे कसे मग युधिष्ठिरा रे
द्यूतसभेत सुटले संतुलन?
तशी खरेतर नावाला ती
असंख्य तुजला नाती होती
सांग द्रौपदी, हाकेला तव
किती त्यातली आली होती?
एका स्त्रीच्या अब्रूपेक्षाही
थोर होता का तुझा घमंड?
डोळे बंद करण्याऐवजी
कर्णा, उघडले नाहीस तोंड?
डोळस असुनही बुद्धीस तुझ्या
अंध करून गेली वासना
कळला अधिकार पण न कळली
तयाची मर्यादा, दुर्योधना!
०९.०१.२०२६
रॉबर्ट हास म्हणुन एक कवि आहेत. त्यांचा आवडता एक हायकु आहे. हा हायकु बाशो म्हणुन कोणी लिहीलेला आहे. बर्याच वर्षांपूर्वी हा माझ्या वाचनात आला होता आणि मला त्याची अर्थसंगती लागत नव्हती. पुढे काही वर्षांनी मी भारतवारी केली आणि पुण्याच्या व मुंबईच्या अनेक भागांतून पायी चालत असतानाच, जुन्या पुण्यामुंबईस मिस केले. एक लाँगिंग, काहीतरी निसटलय आणि त्या मुळे आलेली अपूर्णत्वाची, फसवणुकीची भावना मी अनुभवली आणि मग जेव्हा हा हायकु वाचला तेव्हा मला त्याची अर्थसंगती लागली. एका वेगळ्या प्रकाशात हा हायकु मला कळला.
.
Even in Kyoto,
hearing cuckoo's cry,