लेखन

शॉर्ट शॉर्ट फिक्शन.

Submitted by केशवकूल on 1 May, 2024 - 13:39

कमीत कमी किती शब्दात लेखक कथा लिहू शकतो? मानवी भावनांची गुंतागुंत व्यक्त करण्यासाठी कमीत कमी किती शब्दांची गरज आहे? आता हे तर सर्वमान्य आहे कि शंभर शब्द पुरेसे आहेत.(कथा शंभरी), कथापन्नाशी वा कथापच्चीसी. असे प्रयोग करायला काय हरकत आहे? दहा शब्द? पुरेसे आहेत? अर्नेस्ट हेमिंग्वे ह्या महान कथा लेखकाने केवळ सहा शब्दात लिहिलेली ही अजरामर कथा. मराठीत भाषांतर करायची माझी हिम्मत नाही.
“For sale: baby shoes, never worn.”
ही कथा वाचून दहा वर्ष झाली. पण अजून ती आकलन झाली आहे असं वाटत नाही.
हे सहा शब्द वाचून तुमच्या मनात काय भाव दाटून येतात? मला काय वाटलं ते आधी मी इथे लिहितो.

विषय: 

हिट्स ऑफ नाइन्टी टू - पंकज भोसले - कथासंग्रह

Submitted by भरत. on 30 April, 2024 - 02:28

पंकज भोसले हे लोकसत्तेचे वरिष्ठ मुख्य उपसंपादक असा त्यांचा परिचय रोहन प्रकाशनच्या संकेतस्थळावर दिसतो. बुकमार्क या सदरात त्यांचे लेख नेहमी दिसतात. त्यावर नजर टाकली की ही पुस्तकं आपल्याला सहज मिळणं आणि मिळाली तरी वाचावीशी वाटणं कठीण आहे, असं मत व्हायचं. हेच त्यांच्या चित्रपट आणि संगीतविषयक लेखनाबद्दलही मला म्हणता येईल.
अशा लेखकाच्या कथासंग्रहाचं नाव हिट्स ऑफ नाइन्टी टू असावं, त्यात लव्ह एटीसिक्स नावाची कथा असावी हे पाहून नवल वाटलं आणि तो वाचनालयातून घरी आला.

अत्तराच्या कुपीतून दरवळणारा सुगंध. . .

Submitted by मार्गी on 28 April, 2024 - 00:23

रोजच्या जगण्याच्या धावपळीमध्ये आपण अनेकदा गोष्टी विसरून जातो. वर्तमानाच्या धामधुमीमध्ये जुन्या सुगंधी आठवणींचा दरवळ विसरून पुढे जातो. आणि मानवी स्वभावच असा आहे की, ज्या गोष्टी चांगल्या वाटतात त्या आपल्याला कमी लक्षात राहतात आणि जे खटकत असतं, जे त्रासदायक असतं तिकडेच जास्त लक्ष जातं. जे चांगलं आणि उत्तम होतं ते आपण लक्षात ठेवत नाही. आणि पुढे जाताना मागची वाटसुद्धा आपल्या नजरेसमोरून दिसेनाशी होती. आपली मुळं आणि आपला आरंभ आपल्या डोळ्यांसमोर नसतो. म्हणून अशाच नितांत सुंदर आठवणींच्या अत्तराच्या कुपीला उघडण्याचा हा प्रयत्न.

प्रशस्त वाडे वर्सेस ‘फ्लॅट संस्कृती’

Submitted by ब्लू कोलंबसे on 27 April, 2024 - 02:05

शहरात कॉलेजला शिकायला गेलो त्यानंतर ग्रामीण भागात आपणच राहत असलेल्या मित्रांच्या जुन्या वाड्यांचे महत्त्व समजलं आणि सौंदर्यदृष्टी आली. चौसोपी, दगडी, मराठी वाडे आवडू लागले आणि शहरांमधील त्याचवेळी वाढणारी सिमेंटच्या ठोकळ्यांची गर्दी बघून मन विषण्ण होऊ लागले. तेव्हाच बालमित्राबरोबर असा एक छोटासा संकल्पही करून झाला की, पैसे मिळतील तेव्हा दगडी, चौक असणारा, मस्त वाडा बांधायचा.

या संकल्पानंतर माझ्या जुन्या वाड्यांबद्दलच्या मतांमध्ये प्रचंड फरक पडत गेला. कालांतराने समजलं, वास्तुमध्ये आनंद नसतो तर तो राहणाऱ्या व्यक्तींच्या मनात असावा लागतो.

द्वेष : एक भय गूढकथा, भाग १२

Submitted by प्रथमेश काटे on 24 April, 2024 - 11:27

द्वे्ष : एक भय गूढकथा
भाग १२

तिचं किळसवाणं, अंगावर काटा आणणारं हास्य सुरूच होतं. एव्हाना घडलेल्या अघटीत प्रकाराची सोनाली अन् राजाभाऊंना चांगली कल्पना आली होती, अन् ते, विशेषतः सोनाली गर्भगळीत होऊन गेली होती. श्री स्थिर नजरेने, शांतपणे तिच्याकडे बघत होता. मग एकदम त्याच्या तोंडून जरबेच्या, खणखणीत आवाजातले शब्द बाहेर पडले.

" बास... हे पहा. तुम्ही कोण आहात याची मला चांगलीच कल्पना आहे‌ ; पण काही प्रश्न अजून अनुत्तरित आहेत. ज्यांची उत्तरे मला तुम्ही द्यायची आहेत. समजलात ? "

एक 'हकनाक' विवाह - विवाह चित्रपटाची पिसं (पूर्वार्ध)

Submitted by अस्मिता. on 23 April, 2024 - 22:30

अनेक महिन्यांपूर्वी लिहून अर्धवट सोडून दिला होता. आज थोडी डागडुजी करून प्रकाशित केला. फक्त करमणूकीसाठी लिहिला आहे, चूभूदेघे. Happy

----------------

विषय: 
शब्दखुणा: 

कोंदण

Submitted by SharmilaR on 21 April, 2024 - 04:29

कोंदण

हिरा तर देणारच नाहीस कधी
मग कोंदण तरी कशाला...?

माझी चिडचिड अन माझीच तक्रार...

कधीतरी आठवलं तटकन
दुःख कपड्यातलं चांगल्या
ही तर माझीच
कधीकाळची प्रार्थना

मागितल्यावर मिळतं ह्यावर
विश्वास होता बहुतेक अपार
पण ओंजळीत तर
होती ढीगभर लाज

सुख अन रेशमी कपडे
दोन्ही मागणं जमलंच नाही
फाटक्या आयुष्यात सुख असतं
हेही कधी पटलंच नाही.

आता सांभाळतेय मी
माझं भकास सोनेरी कोंदण
कुणाला कळू नं देता
त्याचं रिकामपण ||

शब्दखुणा: 

कैरीचं आंबट गोड पन्हं

Submitted by मनीमोहोर on 20 April, 2024 - 06:38

कैरीचं आंबट गोड पन्हं

चैत्र वैशाख महिन्यात होणारी उन्हाची काहिली आणि थंडगार पन्हं यांचं अगदी जवळच नातं आहे. पूर्वी शेजारी पाजारी सगळ्यांकडे चैत्र गौरीच हळदीकुंकू केलं जायचं आणि वेगवेगळ्या चवीच पन्हं खुप वेळा प्यायला मिळायचं. हल्ली हे हळदी कुंकू फार ठिकाणी होतं नसलं तरी गुढी पाडवा, रामनवमी किंवा एखादा खास रविवार अश्या निमित्ताने अजून ही घरोघरी चैत्रात पन्हं आवर्जून केलं जातं.

विषय: 

पुसटलेल्या वाटा

Submitted by हौशीलेखक on 13 April, 2024 - 09:02

शाल्मली: थँक्यू! तुम्ही एवढ आलात भेटायला. अगदी अचानक ग! आम्ही दोघंही घरात नव्हतो. मी नीलच्या शाळेतल्या फंक्शनला गेले होते, आणि शेखर जर्मनीत. शेजाऱ्यांचा फोन आला, मग लगेच शाळेतून तशीच गेले ना हॉस्पिटलमध्ये. पण डॉक्टर म्हणाले काही नाही करता येणार. खूपच मोठा अटॅक! आणि कल्पनाच नाही ग. आई होती तशी; दोघंही होते. पण काय ग, गाडी चालवता येत नाही ना दोघांना. तसे बाबा चालवायचे, मुंबईत काय, इंग्लंडमध्ये काय. पण इथे त्यांना जरा भिती वाटायची. म्हणायचे, 'तुम्ही एकतर उलट्या बाजूनी चालवता गाड्या, आणि वरती एवढ्या वेगानी.' आई ना? सावरतेय थोडी; नाही म्हटलं तरी एवढ्या वर्षांचा संसार ना.

विषय: 

ठमीची गोष्ट - भाग २ (अंतिम)

Submitted by हौशीलेखक on 11 April, 2024 - 17:31

दुसऱ्या दिवशी साडेचारच्या ठोक्याला हॉटेलच्या रिसेप्शनिस्टचा फोन, 'मिस्टार अँड मीसेश गूहो टू शी यू'. 'पाठव त्यांना वर', मोठं ऐटीत सांगितलं मी. बेल वाजल्यावर दार उघडलं. वयाच्या मानाने वजन भलतंच आटोक्यात, किंबहुना कमीच झालेलं असावं असं वाटलं; थकल्यासारखीही दिसत होती. पण चेहऱ्यावरचा मिश्किल भाव आणि चैतन्य मात्र तेच होतं. तेच खट्याळ डोळे, तशाच दोन्ही गालांवरच्या खळ्या! पूर्वीं केसांचं पोनीटेल असे, आता चांगला अस्सल बंगाली बौदी सारखा केसांचा चापूनचोपून घातलेला खोपा होता. अजूनही एवढे भरगच्च केस बघून माझा हात नकळत माझ्या डोक्याकडे जाणार होता - झाकून घ्यायला. 'ओरी बाब्बा!

विषय: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - लेखन