संस्कृती
BMM 2026 - अधिवेशन संकल्पना गीत: दहा दिशांतून जमले सारे, संस्कृतीचे हे सांगाती!
परिशिष्ट - विजेते सूची - प्रवेशिका यादी
मायबोली गणेशोत्सव २०१८ - श्री गणेश प्रतिष्ठापना

अथर्वशीर्ष हा उपनिषदाचा एक भाग असून ते दहा ऋचांमध्ये विभागलेले आहे. सर्व स्तुती स्तोत्रांची असते तशीच अथर्वशीर्षातील ऋचा विशिष्ट हेतूने रचलेली आहे. सुरवातीच्या ऋचांमध्ये गणेशाच्या अधिदैविक रुपाचे वर्णन आढळते. वक्त्याचे, श्रोत्याचे तसेच दाता, धाता, आचार्य, शिष्य इत्यादींचे रक्षण करण्यासाठी काही ऋचा आहेत. तसेच शेवटी गणपतींच्या ‘व्रातपति, गणपति, प्रमथपति, लम्बोदर, एकदन्त, विघ्ननाशक, शिवतनय तथा वरदमूर्ति’ या आठ नावांना नमस्कार करुन अथर्वशीर्षाची फलश्रुती सांगीतली आहे.
गर्जा महाराष्ट्र माझा!
आज महाराष्ट्र दिन.
महाराष्ट्र राज्य स्थापनेचा वर्धापनदिन.
१ मे १९६० या महाराष्ट्र स्थापना दिनासंबंधीची ही चित्रफीत
जय जय महाराष्ट्र माझा या गीताला नुकतंच राज्यगीत घोषित करण्यात आलं.
बीएमएम २०२६ अधिवेशनासाठी सिअॅटल सज्ज!

सिॲटलमध्ये होणाऱ्या BMM 2026 स्नेहसंमेलनाची तयारी आता जोरात सुरू आहे!
श्रीमती शिल्पा कर्वे यांनी तयार केलेल्या अधिवेशनाच्या बोधचिन्हात भारताबाहेर राहूनही मराठी संस्कृती जपणाऱ्या आपल्या मराठमोळ्या अस्मितेला “म” या मूळाक्षराच्या प्रतीकातून सुंदर अभिव्यक्ती देण्यात आली आहे.
“म” — मराठीतला, मातीतला, माणसातला, मनामनांतला, मायबोलीतला, मौजेतला, मनोरंजनातला, मेजवानीतला आणि मैत्रीतला!
गावातली लोकशाही
गावं बदलत आहेत.
पूर्वीचं संथ वातावरण राहिलं नाही असं म्हणतात. लोक गावच्या पूर्वीच्या रूपाची चर्चा करतात. सगळे गुण्यागोविंदाने रहायचे असे म्हणतात.
पण खरंच असं आहे का?
सध्या गावागावात विविध पक्षात तरूण भरती होत आहेत. पूर्वी एकच पक्ष असायचा. त्यामुळं एक नेता असे. त्याचं घराणं असे. हे घराणं संस्थानिकाप्रमाणे असायचं. काही गावात पाटील आणि देशमुख असे प्रबळ गट असत. काही गावात तणाव असे. पण निवडणुका वगळता गावचं जीवन एरव्ही शांत असे.
आपण सिलेक्टीव संवेदनशील बनत चाललो आहोत का?
निमित्त झाले आहे परवाच पार पडलेल्या एका कौटुंबिक मेळाव्याचे.
सध्याचा सगळ्यात चर्चिला जाणारा विषय म्हणजे इराण युद्ध, त्यावर सगळ्यांचे बोलणे झाले, मग गाडी वळली गॅस टंचाईकडे. आलेले लोक वेगवेगळ्या शहरातील होते, त्यामुळे तुमच्याकडे काय? आमच्याकडे काय चे बोलणे झाले. बहुतेकाांनी काही प्रॉब्लेम नाही आहे असे सांगितले.
पण पेपर मध्ये तर फोटो बातम्या येत आहेत म्हटले तर हा सगळा ऑपोझीशन चा प्लान आहे, उगाच कोणत्यातरी कोपऱ्यात घडलेल्या गोष्टी ते बोंबलून सांगतात असे एक नातेवाईक म्हणाले.
शुक-सारिका
शुक-सारिका
वरदा बुक्सचे प्रकाशक ह अ भावे यांच्या दरबारी आमची हजेरी अधून मधून असायची. एकदा त्यांना आंतरजालीय वाद व गमतीजमती याबाबत गप्पा मारत माहिती देत होतो. तेवढ्यात त्यांना पुस्तक मागणीचा फोन आला.ग्राहक अधिक माहिती विचारत होता. "शुक म्हणजे पोपट, सारिका म्हणजे मैना. ....."भावे नीरगाठउकलतंत्राने फोड करून फोनवर सांगत होते
बोधकथा : राज - कुक्कुट
खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे.
त्या वेळी जपानमधे एक सम्राट होता. हा सम्राट शक्तिशाली होता आणि त्याला युद्धाची एव्हढी भूक होती कि फावल्या वेळेतही तो कोंबड्यांच्या झुंजी बघत असे. त्यासाठी त्याच्याकडे अनेक जातींचे हिंस्त्र आणि युद्धकुशल कोंबडे होते. त्यांना त्याने राजयोद्ध्यांचा दर्जा दिला होता. त्यांची उत्तम बडदास्त ठेवली जाई.

