समाज

वटवृक्ष!

Submitted by मार्गी on 18 April, 2024 - 02:09

आज १८ एप्रिल. माझे आजोबा तीर्थस्वरूप नारायणराव वेलणकर अर्थात् नाना आजोबा जाऊन १४ वर्षं झाली. त्यांच्याबद्दलच्या आठवणी शब्दबद्ध करण्याचा हा प्रयत्न. वस्तुत: आजोबांबद्दल नातवाने बोलणं म्हणजे एखाद्या नवोदित कलाकाराने हरिप्रसाद चौरासियांसारख्या बुजुर्ग व्यक्तीबद्दल बोलणं आहे! कारण आम्ही नातवांनी जे आजोबा पाहिले ते त्यांचं शेवटच्या टप्प्यातलं रूप होतं. अस्ताला जाणार्‍या मंदप्रभ सूर्याला बघणं होतं. त्या तुलनेत मुलगा- वडील हे नातं जास्त जवळचं आणि अनेक गोष्टी दीर्घ काळ समान प्रकारे अनुभवणारं. एकमेकांना जवळून अनुभवण्याची संधी‌ देणारं.

रामचरितमानस- बालिका कांड

Submitted by Revati1980 on 9 April, 2024 - 03:19

त्या दिवशी नेहमीप्रमाणे तू फेबू उघडलस आणि कुणाकुणाचे फ्रेंड रिक्वेस्ट आलेत ते बघितलंस. एका रिक्वेस्टवर तुझी नजर खिळली. रामचरित मानस शर्मा. हँडसम बॉय, आय टी इंजिनिअर. सिंगल. वोव! हॉबिज बघितलेस. बॉलिवूड, शेरो शायरी, टी वी आर्टीस्ट, म्युझिक लवर, गिटार प्लेअर, त्याने लिहिले होते. एक शेर ही लिहिला होता, “मंजिल मिल ही जायेगी भटकते ही सही, गुमराह तो वो है जो घर से निकलते ही नहीं.” सुभानल्ला, तू मनात म्हणालीस. तू त्याची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारलीस. जरा वेळाने त्याचा मेसेज आला, थँक्यू. थँक्यू कशाला? तू विचारलं, मला तू मित्र म्हणून स्वीकारलं ना, त्यासाठी, त्याने उत्तर दिले.

नाम नामेति नामेति - दोन

Submitted by Revati1980 on 31 March, 2024 - 08:20

रेवतीबेन, तमे जे कह्यु के ब्राह्मणांनी देवदेवतेची, क्षत्रियांनी वीरता दिसेल अशी, वैश्यांनी संपत्तीदर्शक नावे ठेवावीत असं सांगितलं ते मला काय पटलं नाही. शिवाय शूद्र यांच्याबद्दल तुम्ही बोललाच नाहीत. त्यांनी काय पाप केलंय?

खरच की, अहो शुद्रानी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांची नावं ठेवावीत की. पाप बीप काही लागत नाही.

असं कसं शक्य आहे? एका बाजूला तुम्ही म्हणता ब्राह्मणांनी देवदेवतेची , क्षत्रियांनी वीरता दिसेल अशी, वैश्यांनी संपत्ती दर्शक नावे ठेवावीत आणि दुसऱ्या बाजूला शुद्रानी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांची नावं ठेवावीत. कुछ हजम नहीं हो रहा है.

धुळवड की रंगपंचमी?

Submitted by WallE on 25 March, 2024 - 04:14

मित्र आणि मैत्रिणींनो,
सगळ्यांना होळीच्या शुभेच्छा :). काल होलिका दहन झाले आणि आज धुळवड. रस्त्यावर, सोसायटी, इत्यादी ठिकाणी रंगबिरंगी आणि प्रसन्न चेहरे दिसले. आमच्या सोसायटीमध्ये नेहमीप्रमाणे बालगोपाल मंडळीने पाणी, रंग, पिचकारी घेऊन धुळवडीच्या मनसोक्त आनंद घेतला तर मोठ्यांनी एकमेकांना रंग लावून शुभेच्छा दिल्या. बऱ्याच घरात आज पुरणपोळीचा बेत असतो पण आमच्याकडे मात्र आज श्रीखंड पुरीचा बेत असतो. श्रीखंडपुरी वर ताव मारून डोळे जड झाले आहेत आणि रणरणत्या उन्हात कूलर सुरू करून मस्त वामकुक्षी घेण्याचा बेत आहे.

नाम नामेति नामेति

Submitted by Revati1980 on 24 March, 2024 - 02:06

नाम नामेति नामेति

" नाव काय ठरलं शेवटी मुलीचं?"

" एकदम यूनिक ठेवलंय,अवीरा."

" अवीरा? काय अर्थ होतो या नावाचा?"

" बहादुर, ब्रेव, स्ट्रॉंग, कॉन्फिडेंशियल; कसं वाटलं नाव?"

"अवीरा म्हणजे बहादुर, ब्रेव, स्ट्रॉंग, कॉन्फिडेंशियल हा अर्थ तुम्ही कुठे शोधलात ?"

" गुगल बाबा आहे ना, मॉम जंक्शन नावाची एक साईट आहे तिथे मिळाले हे नाव. चांगलं नाव आहे ना?"

हे नाव हिंदू आहे?
१०० टक्के .का?

विषय: 

भुरा - शरद बाविस्कर - मयूरेश चव्हाण कृत परिचय

Submitted by भरत. on 19 March, 2024 - 08:41

.‘व्यवस्था सगळ्यांना समान संधी देत नाही, ती कधीच शंभर टक्के न्याय्य वा पारदर्शक नसते.’ किंवा ‘व्यवस्था मानवी जीवनाची अपरिहार्यता आहे मात्र तिचे निरंकुश होणे म्हणजे स्वातंत्र्यावर टाच’ या केवळ लेखकाची उक्ती अथवा कथन नसून अनुभव आहे. ग्रामीण भागातील शिक्षण आणि शिक्षणाबाबतची उदासीनता भुरा या पुस्तकातील काळाशी तुलना करता सध्याला अधिक गंभीर आहे. आजही यातून कोणी अग्निदिव्य देऊन बाहेर पडला तर तो इतरत्र अडकावा म्हणून अनेक गंड त्याची पाठ सोडू शकणार नाहीत अशा पुढच्या व्यवस्था आहेत. कितीही वाचायची आवड असली तरी तशी व्यवस्था आजही फार कमी नशीबवंतांना उपलब्ध आहे.

विषय: 
शब्दखुणा: 

शो मस्ट गो ऑन

Submitted by प्रतिक रमेश चां... on 19 March, 2024 - 02:44

‘. . . it was really nice working with you guys.’ मेल ची शेवटची लाईन टाईप करून त्याने ‘Draft’ सेव्ह केला. आज ऑफिस ला गेल्या गेल्या मॅनेजर च्या तोंडावर ‘Resign’ फेकून मारायचं असा विचार करून नीरज ने बाईक स्टार्ट केली. इतक्या दिवस ‘मी रिजाईन का करू?’ असा विचार करणारा ‘मी रिजाईन का करू नये?’ या प्रश्नाच्या उत्तरादाखल गाडीचा एक-एक गियर टाकत होता आणि प्रत्येक ब्रेक सोबत एक कचकचून शिवी हासडत होता. कारण काय तर वर्क प्रेशर, मॅनेजर चे बोलणे, वीकेंड ला मिटींग्स व काम, त्यामुळे बिघडलेला ‘वर्क-लाईफ बॅलन्स’ आणि या सर्वांमुळे आलेले ‘Frustration’. पण आज एवढं चिडण्याचे कारण निराळंच होत.

विषय: 

" क.. क्क..किरन....."

Submitted by Revati1980 on 18 March, 2024 - 03:18

"तू हां कर......या ना कर.....तू है मेरी किरन....." प्रत्येक किरण, अंकिता, निकिता, मनाली, रुपाली, दीपाली, राखी, पाखी प्रत्येक अब्दुलला हवीच. तू हो म्हण किंवा नाही म्हण, तू माझीच. "डर" चित्रपटात सायकिक राहुल मेहरा, किरणचा नवरा, सुनील मल्होत्रा, जो भारतीय नौदलाचा अधिकारी आहे, त्याला ठार मारतो. या चित्रपटाचा नायक भारतीय लष्कराचा देशभक्त अधिकारी नाही , तर एक मनोरुग्ण, तोतरा, स्वतःशी बोलणारा , सायको किलर नायक आहे. काय संदेश देतोय हा सिनेमा? भारतीय सैनिकांपेक्षा, मनोरुग्ण,तोतरे, स्वतःशीच बोलणारे , सायको किलर्स जास्त प्रेमळ आणि चांगले असतात. बेटर अँड हॉटर लव्हर्स. इज इट ?

विषय: 

रिल्स रिपब्लिक

Submitted by Revati1980 on 10 February, 2024 - 07:37

" सनी लिओनीचा चेहरा तुमचा आदर्श असेल तर तुमच्या मुली फक्त सनी लिओनी बनण्याचेच स्वप्न बघतील " . : तस्लिमा नसरीन.

विषय: 

Pages

Subscribe to RSS - समाज