काश्मीर सफरनामा - पूर्वतयारी
एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यातच हे प्रवासवर्णन मायबोलीवर टाकायचे होते पण पहिला भाग लिहिला त्याच दिवशी संध्याकाळी पहलगाम हल्ल्याची बातमी आली. अगदी एक आठवडा आधी आपण त्याच गावात होतो ह्या विचाराने अजूनही मनात धडकी भरते. हल्ल्यात बळी पडलेले तीनजण तर आपल्या डोंबिवलीतलेच होते हा आम्हा सर्वांसाठीच मोठा धक्का होता.
कान्यकुब्ज, मगध, गौड व वंग देशावर राज्य करणाऱ्या यशोवर्माच्या राज्याची पश्चिम उत्तर सीमा जालंधरजवळ होती. आणि त्याचा तळ हिस्सारजवळ स्थानेश्वर येथे पडला होता. स्थानेश्वर पूर्वापार काश्मीरच्या अधिपत्याखाली होते. कदाचित या सीमांवरून वाद होऊन ललितादित्य व यशोवर्मनमध्ये वादाची ठिणगी पडली व दिग्विजयासाठी ललितादित्याने आता यशोवर्मनच्या राज्याकडे नजर वळविली.
यशोवर्मनच्या पराभवाने त्याची अंकित सर्व राज्ये ललितादित्याच्या प्रभावाखाली आली. वंग देशानंतर ललितादित्याने आपला मोर्चा कलिंग देशाकडे वळवला व तो ही अंकित करून घेतला. तत्कालीन भारतातले हे सर्वात मोठे साम्राज्य बनले.
सिंध परिसरातला अरबांचा उपद्रव कमी झाला असला तरी तोखारिस्तानात बुध्दविहार, बौद्ध प्रतिमा नष्ट करणे, जबरदस्तीने
धर्मांतरे करवणे इत्यादी अरबी दहशत सुरु होती. त्यामुळे ललितादित्याने तोखारिस्तानवर हल्ला करून अरबांचा पाडाव केला.

(तोखारिस्तान - आत्ताचे बल्ख, अफगाणिस्तान)
मुक्तापीड सत्तेवर आला तोवर हिंदू आणि बौद्ध प्रभाव असला तरी काबूल, झाबूल तुर्कांच्या सत्तेखाली गेले होते. तोखारिस्थान (बल्ख) प्रांतांवर अरबी वर्चस्व निर्माण झाले होते. बिन कासीम मेला असला तरी अरबांनी सिंधमध्ये भक्कम पाय रोवला होता.
काश्मीरच्या आश्रयाला आलेल्या जयसिंहाने परतल्यावर खलिफाचे वर्चस्व स्वीकारून धर्मांतर केले होते व तो सिंधवर राज्य करत होता. चीनपासून काबुलकडे जाणाऱ्या व्यापारी मार्गांवर असणारी काश्मिरी सत्ता खिळखिळी झाली होती.