भटकंती

न्यूझीलंड डायरी...१४.उंच उंच नेवूया मैत्रीची गुढी..

Submitted by हेमंत नाईक. on 27 January, 2026 - 20:48

१४.उंच उंच नेवूया मैत्रीची गुढी..
..हेमंत नाईक

आज २०२४ चा चैत्र शुद्ध प्रतिपदा.. गुढीपाडवा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!!

आज सकाळी जरा लवकरच फिरायला गेलो, मराठी नववर्षदिनाचा सर्वप्रथम सूर्योदय बघण्यासाठी पिजन माऊंटन या चि. सौरभ च्या घरापासून जेमतेम पाचशे मिटर वर पिजन माउंटन या असलेल्या उंच अशा टेकडीवजा मृत ज्वालामुखीच्या पर्वत शिखरावर. येथे सभोंवती ग्रीनरी आणि उंचावर बसून सभोवतालाचा निसर्ग बघताना मजा येते.

थंडगार वारे बोचरे होते त्यामुळे जाकीट टोपी वगैरे पूर्ण बंदोबस्त मी आधीच केला होता.

न्यूझीलंड डायरी.. १३. एकटा

Submitted by हेमंत नाईक. on 24 January, 2026 - 23:58

१३. एकटा

इथले अप्रतिम निसर्गाचे फोटो पाहून एका मित्राने सुंदर अभिप्राय दिला,

"तुझ्या कॅमेराची लेन्स सुंदर आहे तेवढीच सुंदर डोळयांचीही लेन्स आहे. "

खरं सांगू तर,

"इथला निसर्ग इतका सुंदर आहे की अगदी डोळे मिटून देखील फोटो काढले तरी एका पेक्षा एक सुंदरच येतात."

रोटोरुआ येथे दोन दिवस फिरत असताना शेवटी निघताना काही वस्तु घेण्यासाठी काउन्ट डाऊन या सुपर शॉप ला गेलो असताना इथल्या सौंदर्यालाही डावी बाजू आहे हे नकळत कळलं.

न्यूझीलंड डायरी...१२ आज पाव जमीपे नही थे मेरे!!

Submitted by हेमंत नाईक. on 20 January, 2026 - 04:08

१२ आज पाव जमीपे नही थे मेरे!!
हेमंत नाईक

कोण म्हणतं घडयाळ मग जात नाही?
आज इथं न्यूझीलंडला एप्रिलच्या पहिल्या रविवारी, यंदा ७ एप्रिल ला तिन वाजता चक्क एक तास घड्याळ मागे केले जात आणि काटा दोन वर मागे फिरवला गेला .

हे सार डे लाईट अडजस्टमेन्ट साठी असतें. तसेच सप्टेंबरला शेवटच्या रविवारी मध्ये घड्याळ एक तास पुढे केले जाते.

जे देश विषवृत्ता पासून खूप दूर आहेत तेथे ही अडजस्टमेन्ट केली जाते.

न्यूझीलंड डायरी.. ११. पॉलीनेशीअन स्पा!

Submitted by हेमंत नाईक. on 17 January, 2026 - 23:41

*११.पॉलीनेशिअन स्पा*
..हेमंत नाईक
०६.०४.२४

रोटोरुआमध्ये उगवणारे प्रत्येक गरम खनिज झरे येथील मुळ रहिवासी माओरीने ओळखले आणि नाव दिले.
पाण्याला वाईरीकी म्हणून ओळखले जाते, हे स्वतःच उच्च सन्मानाचे शब्द आहे. याचा अर्थ देवतांचे पाणी असा आहे जरी त्याचा अर्थ गरम पाण्याचा झरा असा केला जातो. या पाण्याला माओरी खजिना मानतात.

रोज सकाळी अंघोळ करताना आपण पवित्र मानलेल्या सात नद्यांना त्या पाण्यात येण्याचे आवाहन करणारा श्लोक म्हणतो.

गङ्गे च यमुने चैव गोदावरि सरस्वति । नर्मदे सिन्धु कावेरि जलेऽस्मिन् संनिधिं कुरु ॥

न्यूझीलंड डायरी.. १०. फायर ऑफ रिंग्स!"

Submitted by हेमंत नाईक. on 15 January, 2026 - 22:31

*१० रिंग ऑफ फायर*
✍️हेमंत नाईक
०५.०४.२४

रोटरूआ हे १५ देशातून जाणाऱ्या पॅसिफिक समुद्रा लगतच्या " रिंग ऑफ फायर " या खूप साऱ्या ज्वालामुखीने ऍक्टिव्ह असलेल्या भागावर वसले आहे.

जगात होणारे ९० टक्के भुकपं या ४०००० किमी पसरलेल्या ज्वालामुखीना जोडणाऱ्या लाईनीलगत म्हणजेच फायर ऑफ रिंग्स वर होत असतात.

ज्वालामुखी ने कोन शेपचे पर्वत तयार होतात पण खूप मोठे इरप्शन झाले की मॅगमा कोलॅप्स होतॊ आणि कॅलडेरा फॉर्म होतो. सुमारे २,३०,००० वर्षापूर्वीच्या , मोठा २२ किमी कलडेरा तयार करणाऱ्या, ज्वालामुखीच्या या इरप्शनमुळे हा भुभाग तयार झालेला आहे.

न्यूझीलंड डायरी... ९. रन द ल्यूज विदाउट फ्युएल!!

Submitted by हेमंत नाईक. on 14 January, 2026 - 19:30

९ रन द ल्यूज विदाउट फ्युएल!!
..हेमंत नाईक

वैयक्तिक न्यूझीलंड येथे फिरण्यास येणारे कमी आहेत बहुदा ट्रॅव्हल कंपनी वा इथं मुलं असली तर त्यांच्या बरोबर फिरतात. बहुतेक वेळा इंटर्नरीत नॉर्थ आयलंड मधील ऑकलंड रोटोरुआ होबिटन सेट, वैटामोचे ग्लो वर्म केव्ह आणि मग ओक्लॅण्ड स्काय टॉवर बघून झाले की फ्लाईटने साऊथ आयलंड येथे जाऊन न्यूझीलंडची ऍडव्हेचर कपिटल क्वीन्सटाउन, नयनरम्य मिलफोर्ड साऊंड, वनाका, फॉक्स ग्लसीअर आणि मग शेवटी ग्रेमाऊथ ते क्राईस्टचर्च हा जगातील एक सुंदर रेल्वे प्रवास करून ही ट्रिप पूर्ण करतात.

न्यूझीलंड डायरी... *८.पुरोगामी आनंदी न्यूझीलंड..

Submitted by हेमंत नाईक. on 14 January, 2026 - 02:21

८.पुरोगामी आनंदी न्यूझीलंड
.. हेमंत नाईक

शहानवाजने तेथे लेडीज आणि जेन्टस हॉस्टेल एक असतात का? याची विचारणा केली आणि एक नकळत विषय मिळाला आज लिहिण्यासाठीचा.

हॉस्टेल बहुतेक ठिकाणी मुलं मुलींसाठी एकच असतात पण रूम्स वेगवेगळ्या असतात.. रूम पार्टनरही नसतात बहुतेक सिंगल रूमच असतात. हॉस्टेल एक हॉटेल सारखेच असते. फारच कमी ठिकाणी लेडीज हॉस्टेल वेगळे आहेत.जगात सर्वात प्रथम महिलांना १८९३ साला मतदानाचा हक्क देणारे पासून स्त्री पुरुष समानतेचे पुरस्कर्ते न्यूझीलंड हे महिलांसाठीही खूप सुरक्षीत आहे.

न्यूझीलंड डायरी ६. सापशिडी

Submitted by हेमंत नाईक. on 10 January, 2026 - 01:20

६.सापशिडी!!
...हेमंत नाईक

चि. सौरभच्या हाफ मून बे या ऑकलंडच्या उत्तम वसाहतीत असलेल्या घरापासून चार समुद्र किनारे जवळ असल्याने माझा फेरफटका या किनाऱ्यावर आलटून पलटून रोज असतो. चि. कियान व चि.कबीरची आजी माझी सौभाग्यवती मात्र अधून मधून बरोबर येते.

फक्त ऑकलंड येथे नव्हे तर या देशात सर्वं ठिकाणी पळण्यासाठी, फिरण्यासाठी, सायकलिंगसाठी असे दुतारफा हिरवळ असलेले चार पाच फुटाचे काँक्रीटचे वोक वे आहेत. सभोंवती मात्र हिरवेगार नीट कट केलेले लॉन शोभून दिसते.त्यापैकी आजचा हा समुद्रकिनारी लागत जाणारा रोटरी मार्ग, गोलाकार आणि अतिसुंदर आहे.

न्यूझीलंड डायरी... ५. विस हजाराचा कांदा!!

Submitted by हेमंत नाईक. on 8 January, 2026 - 05:04

५.विस हजाराचा कांदा!!
"Now we are descending down.."
ही उदघोषणा पायलट कडून ऑकलंड २५० किमी अंतरावर असताना झाली ३५००० फुट उंचीवर उडणारे विमान हळूहळू खाली येऊ लागले. ढगाची दाट थर असल्याने प्रत्यक्षात जमिनीचे दर्शन मात्र मात्र विमान ३००० फुटावर असल्यावर येते.

येथे तिसऱ्या वेळेस येत असलो तरी यावेळी खिडकी जवळ सीट असल्याने सुंदर देशाचे एरियल विहंगम दृश्य पाहण्यासाठी खिडकी उघडून ठेवली.दुपारी १.२० मी. अरायव्हल असले तरी सुमारे पंचवीस मिनिटे लवकर पोहचणार होतो.

शेवटच्या ढगाचा पडदा दूर होताच...

नववर्षाच्या स्वागताला पुणे मुंबई एक्स्प्रेस वर ४५ किमीची कोंडी

Submitted by राज अज्ञानी on 7 January, 2026 - 09:31

एक दूरचे ओळखीचे गृहस्थ सांगत होते कि ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी या दोन्ही दिवशी मुंबई पुणे एक्स्रेस वे जाम झाला होता. गुगल मधे मुंबई पुणे ट्रेफिक जाम / वाहतूक कोंडी असे की वर्डस सर्च म्हणून दिले कि दिसते कि पुणे मुंबई एक्सप्रेस वे वर कोंडी ही नित्याचीच बाब झाली आहे. पण नववर्षाच्या स्वागताला एव्हढा मोठा प्रकार झालाय यावर विश्वास बसला नाही. कारण कुठेही यासंबंधाने ( मला तरी) ऐकू आले नाही कि वाचनात असे काही आले नाही. कुणाचाच विश्वास बसला नाही. कारण जर कुठे बातमी नाही तर यांना ४५ किमी जाम आहे हे गाडीत बसून कसे समजले हा प्रश्न होता.

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - भटकंती