भटकंती

उगवत्या सूर्याचा देश - जपान ४

Submitted by उपाशी बोका on 16 October, 2026 - 14:07

लेख अपूर्ण...

आज आम्ही टोक्योहून हिरोशिमाला जाणार होतो. त्यासाठी सकाळी ८:३० ची शिनकान्सेन (बुलेट ट्रेन) ही टोक्यो सेंट्रल स्टेशनहून पकडायची होती. पण टोक्यो सेंट्रल स्टेशन अतिशय गुंतागुंतीचे आहे हे ऐकून होतो आणि सामान घेऊन शिनकान्सेनचा प्लॅटफॉर्म शोधून ट्रेन पकडणे, ही कसरत करण्याऐवजी आम्ही सरळ टॅक्सी करून सकाळी टोक्यो सेंट्रल स्टेशनला साधारण ७:४५ ला पोहोचलो. शिंजुकुहून टोक्यो सेंट्रल स्टेशन फारसे दूर नाही, सकाळी साधारण २० मिनिटे लागली. (१७०० ते २००० येन)

शब्दखुणा: 

उगवत्या सूर्याचा देश - जपान २

Submitted by उपाशी बोका on 15 October, 2026 - 00:12

भाग १

टोक्योमध्ये सर्वात प्रसिद्ध प्रेक्षणीय स्थळ म्हणजे सेन्सोजी (Sensō-ji). हे टोक्योमधील सर्वात प्राचीन, बुद्धाचे देऊळ (temple) आहे. गर्दी टाळण्यासाठी या ठिकाणी तुम्ही सकाळी लवकर, म्हणजे ७-७:३० च्या सुमारास, जायला हवे असे म्हणतात. प्रवास झाल्यामुळे आम्ही दुसर्‍या दिवशी थोडे उशीरा म्हणजे ८:३० च्या सुमारास पोहोचलो. पण हे ठिकाण इतके प्रसिद्ध आहे की माझ्या मते सकाळीपण बरीच गर्दी असते. (कदाचित नंतर अजून जास्त होत असेल).

शब्दखुणा: 

उगवत्या सूर्याचा देश - जपान १

Submitted by उपाशी बोका on 14 October, 2026 - 20:20

निवृत्त झाल्यापासून नेहमी कुठेनाकुठे भटकायचा विचार चालूच असतो. त्यामुळे जमेल तेव्हा जपानला जायचे होते. एकदा अचानक तिकिटाचे डील समोर आले आणि मी लगेच तिकिट काढून टाकले. आम्ही साधारणतः १२-१४ दिवसांसाठी प्रवास करतो, कारण २ आठवड्याच्यावर वेळ गेला की बायकोला कंटाळा येऊ लागतो आणि घराचे वेध लागतात. सुरुवातीला केसरी, वीणा वर्ल्ड यांच्याकडे चौकशी केली, पण त्यांचा कार्यक्रम मला तितकासा पसंत पडला नाही कारण आम्हाला संपूर्ण जपानी पद्धतीच्या घरात म्हणजे Ryokan मध्ये रहायचे होते, जे टूर कंपनीत शक्य न्हवते.

शब्दखुणा: 

सफर ग्रँड कॅनियनची: Part 4: The Spectacular South Rim – The Beginning! (Concluding)

Submitted by AD75 on 14 October, 2026 - 15:01
Matther Point: Grand Canyon South Rim

सफर:ग्रँड कॅनियनची: Part 3 – West Rim – The Western Wonder!
लिंक: https://www.maayboli.com/node/89065

Pictures: https://photos.app.goo.gl/RvGN2occYWY5sNQu5

सफर ग्रँड कॅनियनची: Part 3 – West Rim – The Western Wonder!

Submitted by AD75 on 7 October, 2026 - 00:52

सफर ग्रँड कॅनियनची: भाग 2: The Thrilling Tuweep! https://www.maayboli.com/node/89061
Pictures: https://photos.app.goo.gl/qFEXeMLcbibqYMb99

(टिप: हे लिखाण वाचताना वर दिलेल्या फोटो लिंक वर टिचकी मारा, फोटो बाओबर तुम्हाला हा प्रवास अधिक चांगल्या प्रकारे समजेल आणि त्याचा आनंद द्विगुणित होईल. हे प्रवासवर्णन फोटोंना अनुसरूनच लिहिले आहे, ज्यामुळे प्रत्येक ओळीतील प्रसंग तुम्हाला थेट फोटोशी जोडता येईल.)

शब्दखुणा: 

लेखन उपक्रम : माझा पहिला विमान प्रवास : सामो

Submitted by सामो on 24 September, 2026 - 10:05

२००३ - मे महीना.
माझा इन्टर्व्ह्यु देउन झालेला होता. रोज सकाळी उठले की धावत जाउन ईमेल चेक करणे - का तर अमेरिकेतून तोवर रिप्लाय आलेला असतो. आणि काहीतरी २५ की २६ मेला उत्तर आले. 'सिलेक्टेड' - अमुक इतका पगार. लवकरात लवकर जॉइन व्हायचे आहे - २८ मे ला
नंतरचे २-३ दिवस प्रचंड धामधुमीचे गेले. प्रोफेशनल कपडे, प्रवासाच्या बॅग्स, डॉलर्स तर होते कारण नवरा जहाजावर जात असे. घरात युरो पासून केन, डॉलर सगळ्या करन्सीजच्या नोटा , नाणी असत.

विषय: 

सफर ग्रँड कॅनियनची: भाग १ - Sea World

Submitted by AD75 on 17 September, 2026 - 00:11

दोन हजार आठ साली जेव्हा मी पहिल्यांदा अमेरिकेत आलो तेव्हा माझ्या वडिलांनी मला निक्षून सांगितलं होतं की ग्रँड कॅनियन आणि नायगारा पाहील्या शिवाय भारतात परत येऊ नको. नायगारा पाहून झाला, तो ही चांगला दोनदा पाहिला. पण ग्रँड कॅनियन बाबत मी काही इतका सिरीयस नव्हतो. प्रोजेक्ट पूर्ण होत आलं होतं, भारतात निघायची तारीखही दोन महिन्यांवर आली. बाबा म्हणाले "तू कसही कर पण ग्रँड कॅनियनला जाऊनच ये, अरे जगातलं नैसर्गिक आश्चर्य आहे". शेवट भारतात यायच्या पंधरा दिवस आधी मी ग्रँड कॅनियन पाहून आलो, अगदी एकटा, माझ्याबरोबर अक्षरश: कोणीही नव्हतं.

शब्दखुणा: 

प्रवास (२/४)

Submitted by आर्त on 29 July, 2026 - 06:55

“…हताश होऊ नकोस. जीवन एक प्रवास आहे बघ”, असं म्हणायचं, चहाचा शेवटचा घोट घ्यायचा, पीडिताच्या पाठीवर थाप द्यायची आणि निघून जायचं. संभाषणाला स्वल्पविरामकडून तडकाफडकी पूर्णविरामाकडे नेण्यासाठी हे वाक्य अगदी सहज वापरले जाते - ‘जीवन एक प्रवास आहे’. पण जितक्या सहजपणे हे वापरले जाते, तितके हे समजायला सोपे आहे का?

जीवनाचा प्रवास म्हटलं की मला आठवण होते ती ‘बृहदारण्यक उपनिषदा’तील प्रसिद्ध प्रार्थनेची

ॐ असतो मा सद्गमय ।
तमसो मा ज्योतिर्गमय ।
मृत्योर्मा अमृतं गमय ॥
ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ॥

Pages

Subscribe to RSS - भटकंती