उगवत्या सूर्याचा देश - जपान ४

Submitted by उपाशी बोका on 16 October, 2026 - 14:07

लेख अपूर्ण...

आज आम्ही टोक्योहून हिरोशिमाला जाणार होतो. त्यासाठी सकाळी ८:३० ची शिनकान्सेन (बुलेट ट्रेन) ही टोक्यो सेंट्रल स्टेशनहून पकडायची होती. पण टोक्यो सेंट्रल स्टेशन अतिशय गुंतागुंतीचे आहे हे ऐकून होतो आणि सामान घेऊन शिनकान्सेनचा प्लॅटफॉर्म शोधून ट्रेन पकडणे, ही कसरत करण्याऐवजी आम्ही सरळ टॅक्सी करून सकाळी टोक्यो सेंट्रल स्टेशनला साधारण ७:४५ ला पोहोचलो. शिंजुकुहून टोक्यो सेंट्रल स्टेशन फारसे दूर नाही, सकाळी साधारण २० मिनिटे लागली. (१७०० ते २००० येन)

शिनकान्सेन बुकिंगसाठी smartEX हे ॲप उत्तम आहे, पण ते फक्त JR East मध्ये चालते, JR West मध्ये नाही. त्यामुळे तोक्यो- हिरोशिमासाठी (१९,६०० येन) मी ॲप वापरले, तरीपण हिरोशिमाहून क्योटोला जाताना मी प्रत्यक्ष जाऊन तिकीट काढले. शक्य असेल तेव्हा in-person तिकीट काढणे उत्तम. (मी JR Pass काढला न्हवता, कारण तो फायद्याचा ठरत न्हवता.) आमची Nozomi शिवकान्सेन ही पूर्णपणे reserved seats ची होती, पण काहीकाही प्रकारच्या शिवकान्सेनमध्ये २-४ डबे unreserved seats पण असतात.

शिनकान्सेन बरोबर ४ तासात हिरोशिमाला पोहोचली. ही अतिशय सुंदर आणि वेगवान गाडी आहे, पण वेग अजिबात जाणवत नाही. ट्रेनच्या डाव्या बाजूला बसले तर साधारण ३५-४० मिनिटांनी माऊंट फुजी दिसू शकतो, पण ढगाळ वातावरण असल्याने आम्हाला दिसला नाही. हिरोशिमाला हॉटेल स्टेशनच्या अगदी शेजारीच होते, त्यामुळे त्रास झाला नाही. जपानमध्ये साधारण ३ वाजता सगळीकडे चेकइन होते, पण आम्हाला १ वाजताच रूम मिळाल्याने सोईस्कर पडले.

इथे जपान मधील लोक किती आपुलकीने मदत करतात याचा अनुभव आला. मला Suica card मध्ये पैसे भरायचे होते (हे एक प्रकाराचे डेबिट कार्ड आहे, जे जपानमध्ये बहुतेक सर्व ट्रान्सपोर्टेशन साठी वापरता येते, शिवाय दुकानांमध्ये खरेदी करताना पण वापरता येते.) तर मी कार्ड मध्ये पैसे भरायचे मशीन शोधत होतो, तर हॉटेलमधील एक कर्मचारी मला सांगत होती की अमक्या अमक्या ठिकाणी काम होईल. पण नंतर ती स्वतः ते मशीन दाखवायला आमच्यासोबत स्टेशनवरील मशीनपर्यंत आली. दुर्दैवाने ते मशीन बंद होते, तर टुरिस्ट ऑफिसमध्ये घेऊन गेली. तिथे माझे काम होईपर्यंत थांबली आणि ते मशीन दुरुस्त करा, असे पण तिने सांगितले. आपल्या देशाचे नाव खराब होऊ नये आणि पर्यटकांना मदत करण्यासाठी म्हणून इतका आटापिटा करणाऱ्या जपानी लोकांचे अजूनही असे सुखद अनुभव नंतर आले.

20260925-082153
20260925-141124
20260925-141439
20260925-141537
20260925-141627
20260925-141711
20260925-141728
20260925-144907
20260925-145641
20260925-150128
20260925-150447
20260925-150545
20260925-151430
20260925-151947
20260925-152402
20260925-160953
20260925-161537
20260925-162001
20260925-162409
20260925-162843
20260925-163012

( क्रमशः )

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users