गद्यलेखन

शशक स्पर्धा - झेलम - वार (शांत रस, श्लेष अलंकार)

Submitted by झेलम on 17 September, 2026 - 17:58

“अरे मधू असा काय घुटमळतो आहेस बाहेर? आत ये. सत्यनारायणाचं दर्शन घे आणि जेवायला बस’. पहिल्यांदाच देशमुखांकडे आलेला मधू त्यांचे शब्द ऐकून भानावर आला.

मागे एका घरी तो नादात आत पानावर जाऊन बसला तेव्हा वारावरच्या मुलांची सोय बाहेर आहे असं सांगून त्याला भरल्या ताटावरून उठवलं होतं. वय लहान असलं तरी अपमानाचा तो वार मधू विसरला नव्हता.

“सूनबाई हा मधू. आपल्याच गावच्या शाळेत शिकतो. तुम्ही जबाबदारी मागत होता ना? मधू शाळेत जाण्याआधी आपल्याकडे जेवायला येईल. त्याचं जेवणखाण व्यवस्थित होतंय हे बघाल तुम्ही? घ्याल ही जबाबदारी?

शशक - प्राचीन - कालवा

Submitted by प्राचीन on 17 September, 2026 - 14:29

शशक - कालवा अलंकार - अनुप्रास, श्लेष ;रस - सौम्य हास्य /(उपहास)

वांझ

Submitted by मिरिंडा on 17 September, 2026 - 13:56

साठ सत्तर वर्षांपूर्वीची गोष्ट. आमची एक मावशी होती. तिचं खरं नावं माहिती नाही. तिला आम्ही "बयो मावशी" म्हणायचो. ती आमच्या आईच्या चुलत बहिणीची मुलगी. ती दिसायला फार सुंदर अशी नव्हती. वय साधारण तिशीच्या पुढे. विटक्या तपकिरी रंगाची, अंगाने बारीक, साडेपाच फुटाच्या आसपास उंची, मोठ्या डोळ्यांची तरतरीत नाकाची आणि लहानसरं जिवणी असणारी, हसतमुख, आम्हा लहान मुलांशी गोड बोलणारी, एरवी अगदीच कमी बोलणारी. ती सतत काही ना काही कामात असायची. दुपारी केव्हातरी मागच्या ओटीवर पडायची. घरात विधवा आई, बयोचा मोठा भाऊ नारायणदादा पण होता. तो थोडा तिरसट होता. तो घरात असला की आम्ही चुपचाप बसायचो.

शशक स्पर्धा - धनवंती - घाट ( शृंगार / भय रस / उपमा अलंकार )

Submitted by धनवन्ती on 15 September, 2026 - 14:47

" लवकर निघूया म्हणून किती वेळा सांगतेय. आता तू बरोबर मध्यरात्री मला त्याच घाटातून नेणार", तन्वी माझ्याशेजारी बसून तणतणतेय. चिडली की तिचे देशी गुलाबाच्या नाजूक पाकळ्यांचे गुलाबी ओठ थरथरतात आणि मी खुळावतो, पार वेडावतो. तिचा राग काढण्यात तर आपण एकदम माहीर.. जितकी चिडेल तितकीच उत्कट.. धबधब्यासारखी झोकून देते..
" सांडासारखा दणकट नवरा सोबत असताना त्या घाटाला काय घाबरतेस? भूतबीत बाता सगळ्या, एकदम झूठ.." ती अस्वस्थ, चुळबुळत गप्प, मी अजूनच बेदरकार, गाडी एकदम F1...
अचानक गाडीसमोर कोणीतरी की काहीतरी.. ????

शशक स्पर्धा - झेलम - भूक (करूण रस, उपमा अलंकार)

Submitted by झेलम on 15 September, 2026 - 14:05

समोर दिसणाऱ्या भज्यांकडे तो आशाळभूत नजरेने बघत राहिला.

गेले दोन दिवस तो भज्यांच्या गाडीसमोरून जात होता. एकदा हिय्या करून चोरी करायचं ठरवलं तेवढ्यात भजी तळणाऱ्या भैय्याचं त्याच्याकडे लक्ष गेलं. कसाबसा हरणाच्या वेगाने भैय्याच्या तावडीतून सुटला तो.

उन्हाळ्यात आटलेल्या विहीरीगत फडताळातले डबे रिकामे झाले होते म्हणून असं दारोदार फिरावं लागत होतं त्याला. उपवासामुळे त्याचं शरीर काडीसारखं झालं होते. सकाळपासून पोटात अन्नाचा कण नव्हता. भूक आता वणव्यासारखी शरीरभर पसरत होती.

तहानलेल्याला वाळवंटात पाण्याचा तलाव दिसावा तसं ती भजी बघून त्याला वाटलं.

राजवाड्यातले बालपण (समाप्त)

Submitted by -शर्वरी- on 13 September, 2026 - 19:32

राजवाड्यातले बालपण (१)
https://www.maayboli.com/node/88793

राजवाड्यातले बालपण(२)
https://www.maayboli.com/node/88807

भाग ३

राजवाड्यातले बालपण (१)

Submitted by -शर्वरी- on 11 September, 2026 - 03:25

प्रत्येकाने मनात एक घर जपले असते. लहान असतानाचे. माझेही आहे. त्या लहानग्या वयात खुप मोठे, सुरक्षित आणि उबदार वाटणारे, उतरत्या छपराचे, कौलारू घर. स्वप्नातल्या घरासारखे. त्याहूनही सुंदर. माझ्यासारख्या अशक्त, बुजऱ्या मुलीला राजवाड्यातील समृद्ध बालपण देणारे.

माझी गोष्ट - एका बदलाची सुरुवात

Submitted by छायाप्रभा on 8 September, 2026 - 02:56

ही माझ्या आयुष्यात घडलेली गोष्ट आहे
माझं माहेर आणि सासर दोन्ही तळकोकणातलं. माहेरी ज्या वातावरणात वाढले, त्याहून फार वेगळं वातावरण सासरी नव्हतं. घरच्या रीती, सणवार, माणसांची ये-जा आणि बायकांच्या वाट्याला येणाऱ्या जबाबदाऱ्या, सगळं परिचयाचंच होतं. त्यामुळे सासरच्या एकत्र कुटुंबात रुळायला मला फार वेळ लागला नाही. हळूहळू त्या घरातली माणसं, त्यांच्या आवडीनिवडी आणि रोजची कामं हेच माझं जग झालं.

Pages

Subscribe to RSS - गद्यलेखन