
१) जर हे त्याचे शरीर आहे , तर ती त्या शरीराचा आत्मा आहे.
२) त्यांची आठवण मला येत नाही ! कारण आठवण्यासाठी पहिला त्यांचा विसर पडावा लागतो.
३) झाडाला काय माहीत की त्याच्या सावलीत विसावणारा माणूस एक लाकूडतोड्या आहे.
४) ते भेटत नाहीत, ते वेगळे ही होत नाहीत.त्यांच अस्तित्व आणि नातं जमीन आणि आकाशा सारखे आहे .जवळीक खूप आहे, पण नातेसंबंध नाहीत.
५) दोघांनी एकमेकांना पाहिले. अनेक वर्षांनंतर ते भेटत होते.दोघांच्याही डोळ्यांत चमक होती, पण एका डोळ्यांत वृद्धत्व आणि थकवा होता, तर दुसऱ्याच्या डोळ्यांत जग जिंकण्याचा आत्मविश्वास.वृद्धाने त्या तरुणाकडे जाण्यासाठी पाय उचलले, वृद्धाचा तोल गेला,पायाखाली जमीनच लागली नाही.तरुणाने पटकन लपकून उघड्या हातांनी वृद्धाला सांभाळत मिठीत घेतले. दोघेही भावूक झाले होते,डोळ्यांत आनंदाचे अश्रू दाटले होते.
शनिवार, ११/०१/२०२५, २०:५२ वाजता.
अजय सरदेसाई (मेघ)
दुसरी व तिसरी फार फार आवडली.
दुसरी व तिसरी फार फार आवडली.
लघुकथांपेक्षा विचार जास्त
लघुकथांपेक्षा विचार जास्त वाटले विशेष करून पहिले चार.
तिसरा आवडला...
दुसरा आधी ऐकला आहे.
चौथ्या मध्ये जमीन आणि यांच्यामध्ये जवळी कशी आहे ते कळलं नाही.
चालता चालता ठेच लागली,
चालता चालता ठेच लागली, अंगठ्यातून रक्त आणि दगडाच्या डोळ्यात पाणी आलं.
चालता चालता ठेच लागली,
चालता चालता ठेच लागली, अंगठ्यातून रक्त आणि दगडाच्या डोळ्यात पाणी आलं.
चालता चालता ठेच लागली, अंगठ्यातून रक्त आणि दगडूच्या डोळ्यात पाणी आलं.
चालता चालता ठेच लागली आणि दगड
चालता चालता ठेच लागली आणि दगड सरकला. पाण्याचे छोटेसे कारंजे वर आले. आणि एक म्हण उदयास आली.
छान.
छान.
महत्तम या शब्दात महत् + तम झाल्याने त्त येतो. त्याच्या विरुद्धार्थी शब्दात लघु + तम झाल्याने त्त येत नाही. लघुतम असा शब्द आहे.
खिडकीतून मी आत गेलो, ती
खिडकीतून मी आत गेलो, ती माझ्या नी मी तिच्या मिठीत!
तिच्या भावाने पाहिले, दुसऱ्या दिवशी माझे प्रेत मिठीत.
अशा कथा असतात.
अशा कथा असतात. उदाहरणार्थ
For sale: Baby shoes, never worn - Arnest Hemingway
पृथ्वीवरचा शेवटचा माणूस घरात एकटाच बसलेला असतानाच दारावर थाप पडली.
हपा तुम्हाला तिलोत्तमा शोम माहिती असेलच.
या पंचकातील खरी कथा पाचवी आहे
या पंचकातील खरी कथा पाचवी आहे कारण ती माझ्या जवळची आहे. एक डोळ्यांना दिसलेले दृश्य.घडलेले म्हणणार नाही पण असं घडू शकेल याची शक्यता आहे.
पण आता पर्यंत आलेल्या प्रतिक्रियांत एक ही प्रतिक्रिया त्या शेवटच्या ५ व्या गोष्टी बद्दल नाही याची जरा बोच आहे.असो. प्रत्येकाची पाहण्याची नजर ही वेगळी असतेच असते.
या पंचकातील खरी कथा पाचवी आहे
या पंचकातील खरी कथा पाचवी आहे कारण ती माझ्या जवळची आहे. एक डोळ्यांना दिसलेले दृश्य.घडलेले म्हणणार नाही पण असं घडू शकेल याची शक्यता आहे.
पण आता पर्यंत आलेल्या प्रतिक्रियांत एक ही प्रतिक्रिया त्या शेवटच्या ५ व्या गोष्टी बद्दल नाही याची जरा बोच आहे.असो. प्रत्येकाची पाहण्याची नजर ही वेगळी असतेच असते.
ही कथा तुमच्या जवळची आहे हे
ही कथा तुमच्या जवळची आहे हे वाचकांना कसं समजणार ? समजा कुणाला ती आवडली असती आणि पहिल्या चारातली तुमच्या जवळची असती म्हणजे मग ? वाचकांना काय आवडेल हे त्यांच्यावर सोडून द्यावं. इथे कधी कधी चांगल्या लेखनाला सुद्धा शून्य प्रतिसाद नसतात. तुम्हाला चांगले प्रतिसाद मिळाले आहेत.
हपा घु दीर्घ मानून घ्या.
हपा घु दीर्घ मानून घ्या.
पंचकातील खरी कथा पाचवी आहे
पंचकातील खरी कथा पाचवी आहे
>>>> हो ते कळते. चांगली झाली आहे.
अशा कथा असतात. उदाहरणार्थ
For sale: Baby shoes, never worn - Arnest Hemingway
>>>
हो माहीत आहे. Microfictions
तुम्ही दिलेले उदाहरण , हेमिंग्वे ची ही कथा आधी ही येऊन गेली होती.
यामध्ये त्या छोट्याशा वाक्याने मूळ अनुज या शब्दावर अनेक पाॅसेबिलिटीज तयार होतात आणि वाचक ते स्वतःच्या डोक्यात पूर्ण
करते. त्यात धक्का तंत्रही आहे. Unused या एका शब्दाने ती कथा बनते.. possibilities तयार होतात.. म्हणू ती सगळ्यात असूनही (?) powerful आहे.
त्यांच्या शेवटच्या कथेत ते आहे.
बाकी चारमध्ये कुठलाही धक्का, आनंद, किंवा पोसिबिलिटीज दिसत नाहीत
जस्ट अ thought..
त्यांना समजलं बोकलत हा एक
त्यांना समजलं बोकलत हा एक देवाचा अवतार आहे पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती.