--------------------------------------------------------------------------
मे २००५… MCA च्या ॲडमिशनचा तो दिवस… ❤️ भाग १
--------------------------------------------------------------------------
मे २००५ मध्ये MCA च्या ॲडमिशनच्या वेळी मी तुला पहिल्यांदा पाहिलं… आणि खरं सांगायचं तर, तुला पाहताक्षणीच माझं मन तुझ्यात हरवून गेलं.
ॲडमिशन फॉर्म भरताना तू माझ्याकडे पेन मागितलंस. मी तुला पेन दिलं. फॉर्म भरताना तू थोडीशी गोंधळलेली होतीस, काही गोष्टी तुला समजत नव्हत्या. मी तुला तो फॉर्म भरायला मदत केली. फॉर्म भरून झाल्यावर तू माझं पेन परत दिलंस आणि सहज विचारलंस,
आयसीयू मधल्या बेडवर तो निपचितपणे पडलेला. ग्लानीत होता. आजूबाजूची लगबग आणि आवाज अस्पष्टपणे जाणवत होते. साऱ्या शरीरभर प्राणांतिक ठणका पसरलेला. अचानक एक भयानक वेदना विजेसारखी चमकली. जिवाच्या आकांताने ओरडणार. तोच त्याची शुद्ध हरपली.
जाग आली तेंव्हा सभोवती अंधार होता. निरव शांतता होती. वेदना जाणवत नव्हती. कि आवाज जाणवत नव्हते. अचानक कोणाचीतरी चाहूल लागली. त्याने पाहिले. 'ती' होती. जवळच उभी. हो तीच. चेहऱ्यावर मंद हास्य. तेच डोळे. तोच पेहराव. दिसायला अजूनही तेंव्हासारखीच. तशीच. हि यावेळी आणि इथे? तो चमकला. कारण ती त्याच्या आयुष्यातून गेली त्याला कित्येक वर्षे होऊन गेली होती!
यावेळी 'लेखन उपक्रम : माझा पहिला विमानप्रवास' हे वाचून मनात आठवणींची खूप ढवळाढवळ झाली. कारण जेंव्हा हा प्रवास झाला तेंव्हाच त्याचे वर्णन लिहून भारतात आईवडिलांना पत्ररूपाने पाठवले होते. ते बराच खटाटोप करून शोधून काढले. ते यानिमित्ताने जसेच्या तसे इथे देणार आहे. आज इतक्या वर्षांनी/दशकांनी ते पुन्हा वाचताना मलाच भरून आले.
लेखन उपक्रम : माझा पहिला विमानप्रवास - रूपाली विशे- पाटील
मानवी मेंदूला सुखावणाऱ्या , मनात आनंद निर्माण करणाऱ्या संप्रेरकांची निर्मिती होऊ शकेल अश्या घटना पहिल्यांदा जेव्हा आयुष्यात घडतात तेव्हा त्या पहिल्या घडणाऱ्या घटनांचे अमाप कौतुक प्रत्येकालाच असतं.. आणि ते का असू नये..??
.. जसा पहिला पाऊस, पहिली नोकरी, पहिला पगार, पहिलं प्रेम, पहिलं बाळं... तसाच आयुष्यात घडणारा पहिला विमानप्रवास ...पहिल्याचा मान तसा थाटाचा आणि कौतुकाचा...!
आपण ५ नंबर प्लॅटफॉर्मवर वेळेत जावं, पण नेमकी शेवटच्या क्षणी अनाऊन्समेंट व्हावी आणि काही ॲक्षन घ्यायच्या आत आपली ट्रेन प्लॅटफॉर्म नंबर ३ वरुन निघून जावी.
तशा असतात काही गोष्टी... ठरवतो करायचय करायचय म्हणून, पण नाही जमत करायला काही ना काही कारणांनी.
मागच्या लेखात मी माझ्या आयुष्यात झालेल्या एका बदलाबद्दल लिहिलं होतं. मुलगा कॉलेजसाठी मुंबईला गेल्यानंतर माझ्या मुंबईच्या फेऱ्या सुरू झाल्या. त्या मुक्कामांत भावाच्या बायकोच्या आग्रहामुळे आधी गाऊन आणि नंतर पंजाबी ड्रेस घालण्याची सुरुवात कशी झाली, सुरुवातीला त्याबद्दल किती संकोच आणि भीती वाटत होती आणि मुंबईत हळूहळू सहज वाटू लागलेला तो बदल गावी परतल्यावर प्रत्यक्ष आयुष्यात आणणं किती कठीण होतं, हे सगळं त्या लेखात लिहिलं होतं.
रस : करूण/हास्य
अलंकार : अपेक्षा.. सॉरी.. उत्प्रेक्षा
यंदा पृथ्वीवर येण्यापूर्वी बाप्पांनी महागडे Noise Cancellation Headphones मागवले. भगवान शंकरांनी विचारलं, “काय रे, एवढा खर्च कशासाठी?”
बाप्पा वैतागून म्हणाले, “आरती पाच मिनिटं आणि डीजे पाच तास! गेल्या वर्षी ‘झिंगाट’ इतकं ऐकलं की माझा उंदीर दोन दिवस तिरका चालत होता आणि ‘मोरया’ऐवजी ‘झिंगाट... झिंगाट!’ म्हणत होता!”
दुसऱ्या दिवशी सगळ्या गणेशमूर्ती हेडफोन घालून प्रकट झाल्या. भक्त चक्रावले. विध्याधर बापट आनंदाने म्हणाले, “वा! निदान बाप्पांना तरी माझं म्हणणं पटलं!” पण लगेच हळहळले, “अरेरे, आता आपल्या प्रार्थना ऐकू जाणार कशा?”
नोकरीचा पहिला दिवस. तो उत्साहाने बॅज स्वाईप करून आत आला. सगळीकडे शुकशुकाट. तो गोंधळला. दिवस बरोबर होता. आज सुट्टीही नव्हती. सांगितलेल्या वेळीच आला होता. बॅजही चालत होता.
अचानक एक महिला सिक्युरिटी ऑफिसर त्याच्या दिशेने येताना दिसली.
'बाहेर निघा!' तिने फर्मान सोडले.
'अहो नोकरीचा पहिला दिवस. बॅज बघा, बॉसना बोलवा.'
'कोणीच नाहीये इथे!'
'म्हणजे? गेलेत कुठे सगळे?'