आत्मकथन

पुस्तकपरिचय (Educated : Tara Westover)

Submitted by ललिता-प्रीति on 12 February, 2024 - 00:46

अमेरिकेतल्या Idaho राज्यात राहणारं एक कुटुंब. नवरा-बायको आणि ७-८ मुलं. नवरा-बायको कट्टर Mormon पंथीय. या पंथाच्या लोकांचा आधुनिक जगावर, वैज्ञानिक प्रगतीवर अजिबात विश्वास नसतो. आधुनिक शिक्षण, वैद्यकीय उपचार इ. गोष्टी म्हणजे सैतानाशी सामना. त्यापासून दूर राहायचं. आयुष्यात येणारं प्रत्येक संकट देवाने परीक्षा घेण्यासाठी धाडलं असल्याप्रमाणे सहन करायचं. त्यातून जमेल तसं तरुन जगणं पुढे सुरू ठेवायचं. ही यांची रीत.
हे कुटुंबही तसंच. वडिलांचा भंगार व्यवसाय. सगळी मुलं तिथे पडेल ते अंगमेहनतीचं काम करण्यात तरबेज असतात. पण एकूण जीवनशैली पुरती रासवट.

ढवळाढवळ

Submitted by आशिका on 31 August, 2016 - 05:17

हुश्श, आज पार दमलो बुवा, त्या तिथे मेजवानीसाठी किती ते पदार्थ बनले होते, भारीच दमछाक झाली काम करुन, अंमळ टेकावे इथेच जरा... आई, आई गं....ऑ.. काय म्हणता? हो, हो माहिती आहे, ही जागा आमच्यासाठी नाही.हे एक संकेतस्थळ आहे.. पण मी इथे रितसर परवानगी घेऊन आलोय बरं का, तुम्हाला माझी कसलीही अडचण, त्रास होणार नाही याची गॅरें‍टी. मी फक्त आज, तुमच्याशी थोडंसं बोलायला आलोय, माझ्या मनीच्या काही गोष्टी तुमच्यासह वाटून घ्याव्यात म्हणून आलोय इथे, तुमच्याशी बोलायला, आता तुम्ही म्हणाल की इथेच कशाला कडमडलास? इतरत्र कुठे उभं केलं नसेल कुणी याला, तर याचं उत्तर 'हो' असंच आहे.

विषय: 
Subscribe to RSS - आत्मकथन