गद्यलेखन

गेले करायचे राहून- कविन

Submitted by कविन on 23 September, 2026 - 05:48

आपण ५ नंबर प्लॅटफॉर्मवर वेळेत जावं, पण नेमकी शेवटच्या क्षणी अनाऊन्समेंट व्हावी आणि काही ॲक्षन घ्यायच्या आत आपली ट्रेन प्लॅटफॉर्म नंबर ३ वरुन निघून जावी.
तशा असतात काही गोष्टी... ठरवतो करायचय करायचय म्हणून, पण नाही जमत करायला काही ना काही कारणांनी.

दाराच्या पलीकडचं नातं

Submitted by छायाप्रभा on 22 September, 2026 - 06:29

मागच्या लेखात मी माझ्या आयुष्यात झालेल्या एका बदलाबद्दल लिहिलं होतं. मुलगा कॉलेजसाठी मुंबईला गेल्यानंतर माझ्या मुंबईच्या फेऱ्या सुरू झाल्या. त्या मुक्कामांत भावाच्या बायकोच्या आग्रहामुळे आधी गाऊन आणि नंतर पंजाबी ड्रेस घालण्याची सुरुवात कशी झाली, सुरुवातीला त्याबद्दल किती संकोच आणि भीती वाटत होती आणि मुंबईत हळूहळू सहज वाटू लागलेला तो बदल गावी परतल्यावर प्रत्यक्ष आयुष्यात आणणं किती कठीण होतं, हे सगळं त्या लेखात लिहिलं होतं.

शशक स्पर्धा - ओबामा - बाप्पाचे हेडफोन! (अद्भुत आणि करुण)

Submitted by ओबामा on 22 September, 2026 - 01:02

यंदा पृथ्वीवर येण्यापूर्वी बाप्पांनी महागडे Noise Cancellation Headphones मागवले. भगवान शंकरांनी विचारलं, “काय रे, एवढा खर्च कशासाठी?”

बाप्पा वैतागून म्हणाले, “आरती पाच मिनिटं आणि डीजे पाच तास! गेल्या वर्षी ‘झिंगाट’ इतकं ऐकलं की माझा उंदीर दोन दिवस तिरका चालत होता आणि ‘मोरया’ऐवजी ‘झिंगाट... झिंगाट!’ म्हणत होता!”

दुसऱ्या दिवशी सगळ्या गणेशमूर्ती हेडफोन घालून प्रकट झाल्या. भक्त चक्रावले. विध्याधर बापट आनंदाने म्हणाले, “वा! निदान बाप्पांना तरी माझं म्हणणं पटलं!” पण लगेच हळहळले, “अरेरे, आता आपल्या प्रार्थना ऐकू जाणार कशा?”

शशक स्पर्धा - चीकू - बिग बॉस

Submitted by चीकू on 21 September, 2026 - 18:51

नोकरीचा पहिला दिवस. तो उत्साहाने बॅज स्वाईप करून आत आला. सगळीकडे शुकशुकाट. तो गोंधळला. दिवस बरोबर होता. आज सुट्टीही नव्हती. सांगितलेल्या वेळीच आला होता. बॅजही चालत होता.

अचानक एक महिला सिक्युरिटी ऑफिसर त्याच्या दिशेने येताना दिसली.

'बाहेर निघा!' तिने फर्मान सोडले.

'अहो नोकरीचा पहिला दिवस. बॅज बघा, बॉसना बोलवा.'

'कोणीच नाहीये इथे!'

'म्हणजे? गेलेत कुठे सगळे?'

शब्द झाले मोती ३

Submitted by शब्दमेघ on 20 September, 2026 - 15:38

शब्द झाले मोती : ३

जवळजवळ १८ वर्षांनंतर मायबोलीवरती पुन्हा लिहायला आलो आहे...

मधल्या काळात लिहीत नव्हतो, असं नाही...
पण इथे नव्हतो.

“शब्द झाले मोती” लिहायला घेतलं, त्यालाही आता १०-११ वर्षे झाली.

“शब्द झाले मोती” म्हणजे मला जे वाटतं, तेव्हा जसं वाटतं, तसंच माझं मन मी लिहितो...
कुठलाही आडपडदा नाही.
डायरी जणू माझी...

आता मागे वळून पाहताना वाटतं,
माणूस तिशीतून चाळिशीकडे येताना किती स्थित्यंतरांतून जातो...

या भागात मात्र मला चाळिशीतल्या माझ्या मनाला उमटणारे भाव शब्दांत उतरवायचे आहेत.
जसं वाटेल, तसं लिहिणार आहे...

शब्दखुणा: 

शशक स्पर्धा - प्राचीन - विषाणू

Submitted by प्राचीन on 20 September, 2026 - 13:56

आजारांचे विषाणू वावदूकपणे बढाया मारीत होते.
फ्लू. - "मी किती जुन्या काळापासून हैदोस घालत आलोय. अश्शी पटापट माणसं मरायची.."
कांजण्या - "आम्ही भारी चिवट .. एक जरी पुटकुळी दिसली तरी लोक घाबरतात आणि बरं होत असतानाही खाजेने करतो बेजार नि मिळत नाही शेजार.."
गोवर गर्विष्ठपणे बोलला , "तुमची मजल किती दिवस असते ? मी बघा..अंगभर पुरळ नि ताप मुदतीचा, माझा मुक्काम म्हणजे
ऱ्हास शक्तीचा"
गालगुंडाने गाल फुगवून निषेध व्यक्त केला.
एड्स आपल्या निवडक प्रभावक्षमतेच्या जाणिवेने आणि नैतिक निकषाच्या नेणिवेने निमूटपणे बसलेला.

शशक स्पर्धा - खुशालराव - सावली - करुण रस + भय - उपमा + रुपक अलंकार

Submitted by खुशालराव on 20 September, 2026 - 03:41

आज तो आपल्या आराम खुर्चीवर बसून बाहेर पाहत होता, कडूलिंबाच्या झाडाची पाने वाऱ्यावर डोक्यावर घागर घेऊन ओळीत चाललेल्या स्त्रीयांप्रमाने तालात हेलकावे घेत होती.

बाहेर पडलेल्या तडख उन्हात ती कडूलिंबाची सावली त्याला तिच्या प्रेमाची आठवण करून देत होती तिनेही त्याच्या कोमल मनावर तिच्या प्रेमाची सावली धरली होती..

तो स्वतःला वारंवार आपण रागाच्या भरात हे करायला नको होतं हेच म्हणत होता, हे सगळे स्वप्न आहे आणि आत्ता आपण झोपेतून जागे होणार हे त्याचे मन त्याला सारखे सांगत होते पण तस होत नव्हते.

समोर तिचे निष्प्राण कलेवर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.

शशक स्पर्धा - प्राचीन - एकांत

Submitted by प्राचीन on 19 September, 2026 - 13:45

भणाणणारा वारा, सोबतीला तिचा लडिवाळ लपंडाव.. सभोवताली सुरम्य सृष्टी..
"छे! बायनॉक्युलर आणायला हवी होती.."
"कशाला ?"
"दूरच्या डोंगरावरची साईटसीईंग करायला गं!"
"मग मोबाईल आहे ना.."
"नाही.. तूच मगाशी काढून बाजूला ठेवलास ना, दोघांत तिसरा नको म्हणून?"
"हो तर.. इथे दूरदर्शन करायला आलायस का.. जवळ ही प्रिया असताना.."

Pages

Subscribe to RSS - गद्यलेखन