अवांतर

सर्वात सुंदर भारतीय अभिनेत्री २०२५–२६

Submitted by ऋन्मेऽऽष on 21 August, 2025 - 10:30

IMDb च्या जगातील टॉप १० सर्वात सुंदर अभिनेत्रींमध्ये (२०२५-२०२६) स्थान मिळवणारी क्रिती सॅनन ही एकमेव भारतीय अभिनेत्री ठरली आहे.

सौंदर्य, प्रतिभा आणि जागतिक प्रभावाचा सन्मान करणाऱ्या या यादीत क्रिती सॅनन ने पाचवे स्थान पटकावले आहे.

2021 साली तिला मिमी या चित्रपटासाठी सर्वोत्तम अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.

------------------

बातमी संपली.

विषय: 
शब्दखुणा: 

सुखाच्या हिंदोळ्यावर..

Submitted by शिवानी बलकुंदी on 4 August, 2025 - 06:38

“मावशी, तू घरी आहेस का? मी आज तुझ्याकडे जेवायला येतो आहे,” किंवा “मावशी तू माझ्या सोबत शॉपींग ला चल न, तुझी चॉईस आई पेक्षा चांगली आहे.” किंवा “आई, तुला मावशी सारखा चिवडा करताच येत नाही.” अशी हक्क गाजवणारी, कौतुक करणारी भाचे मंडळी असणे हे माझे भाग्यच आहे असं मला कायम वाटत आले आहे.

विषय: 
शब्दखुणा: 

भाग दुसरा: मुंबई स्पिरिट : एक मौल्यवान पैलू !

Submitted by छन्दिफन्दि on 26 July, 2025 - 02:24

२६ जुलै २००५, मुंबई,

भाग पहिला: वीस वर्षांपूर्वी, आजच्या दिवशी ...

Submitted by छन्दिफन्दि on 26 July, 2025 - 02:19

२६ जुलै २००५, मुंबई.

दुपारच्या चहानंतर बातम्या येऊ लागल्या की कुठे कुठे पाणी भरतयं, लोकल्स उशिरा धावतायत (लोकल्स म्हणजे तेव्हा तरी मुंबईची जीवनवाहिनीच होती). तोवर दिवसभर आत एसीत बसून कॉम्पुटरमध्ये डोकं खुपसलेल्या आम्हाला बाहेर कोसळणाऱ्या पावसाची सुतराम कल्पना नव्हती. पटापट सगळं आवरून लॉग ऑफ करून खाली येऊन बघते तो, आज जो तो बस पकडण्याच्या घाईत होता. रस्ताभर कंपनी बसच्या मोठ्या रांगा लागलेल्या. मी ही माझी नेहेमीची बस हेरून सीट पटकावली. हां हां म्हणत काही मिनिटांतच बस भरून, निघाली सुद्धा.

विक्रम आणि वेताळ: सिंहाचे मस्तक

Submitted by sagar sb on 3 July, 2025 - 03:00

एकदा वेताळाने राजा विक्रमादित्यला आपल्या खांद्यावर घेऊन जाताना विचारले, "हे राजा, मी तुला एक कथा सांगतो आणि त्यावर आधारित एक प्रश्न विचारतो. जर तू त्याचे उत्तर जाणूनही दिले नाहीस, तर तुझ्या डोक्याचे शंभर तुकडे होतील. आणि जर तू उत्तर दिले आणि ते चुकीचे असेल, तर मी परत माझ्या झाडावर जाऊन बसेन."
विक्रमाने वेताळाचे म्हणणे ऐकले आणि त्याला घेऊन पुढे चालू लागला. वेताळ कथा सांगू लागला:

विषय: 

रम्य ते बालपण

Submitted by शिवानी बलकुंदी on 2 July, 2025 - 06:29

लहान असताना अनेकदा आपण मोठ्यांकडून “आमच्या वेळी नव्हतं असं काही” हे वाक्य ऐकत आलो. आता तेच वाक्य नकळत आपण आपल्या मुलांना पण म्हणत असतो. तसं पहिलं तर हे खरंच आहे नाही का. आपल्या लहानपणीच्या कितीतरी किंबहुना अनेक गोष्टी, वस्तु, आपले जीवनमान खूप म्हणजे खूपच बदलले अहे. त्यातीलच एक म्हणजे मुलांचे खेळ. आताची मुले जे खेळ खेळतात ते बघून हे प्रकर्षाने जाणवते. मुलं आता स्विमिंग, बॅडमिंटन, क्रिकेट, बास्केटबॉल, टेबलटेनीस, जिम्नॅस्टिक्स अशा खेळांच्या वर्गांना सकाळी किंवा संध्याकाळी जातात किंवा क्लब जॉइन करतात.

विषय: 
शब्दखुणा: 

क्रिकेट वेडे कुटुंब - (व्हिडिओसह)

Submitted by ऋन्मेऽऽष on 28 June, 2025 - 10:42

वाचायचा कंटाळा असल्यास थेट व्हिडिओ बघू शकता.
व्हिडिओची लिंक -
https://jmp.sh/p3yq45mA

पण असे नुसते बघण्यात मजा नाही,
लेख वाचल्यावरच त्यातील भावना कळतील.
-------------------------------------------------------

क्रिकेट वेडे कुटुंब !

विषय: 

अवकाश

Submitted by शिवानी बलकुंदी on 12 June, 2025 - 06:36

संक्रांत म्हणजे जसे तिळगूळ तसेच संक्रांत म्हणजे पतंग. रंगबिरंगी पतंगांनी भरून गेलेले आकाश बघण्यात एक वेगळीच मजा आहे.
मधूनच एखादी आरोळी, ओ काsssss ट ,
अधूनमधून मुलांचा गलका, पतंग पकडण्या साठीची धडपड, आणि ती हाती आली की झालेला आनंद आणि उत्साह. जणू एखादे रत्न च हाती लागले आहे.
आकाश असेच सगळ्याच पतंगांना आपल्यात सामावून घेते. नुसते सामावूनच घेत नाही तर त्यांना दिमाखाने व डौलाने वरवर जायला मदत देखील करते.
माणसाच्या मनाला देखील या पतंगा सारखेच डौलाने वरवर जायला खूप आवडते. कधी उंच उंच जायला, कधी वाऱ्या सोबत डोलायला तर कधी नुसते च पक्षांसारखे सारखे विहरायला.

विषय: 
शब्दखुणा: 

एक घरगुती प्रश्न

Submitted by सदा_भाऊ on 1 June, 2025 - 10:38

तुम्हाला तुमचं घर भाड्याने द्यायचं आहे? तुम्ही घरमालक आहात का? एक फुकटचा सल्ला.. नको, ताबडतोब घर विका! भाड्याच्या फंदातच पडू नका. उगाच मनस्ताप! स्वानुभवाचे बोल आहेत. तरीपण धाडसी निर्णय घेताय? माझ्या लाख लाख शुभेच्छा!

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - अवांतर