Tinytale

दिवाळी त्यांचीही...!

Submitted by छन्दिफन्दि on 14 October, 2025 - 20:30

दिवाळी त्यांचीही.,.

दिवाळी अगदी तोंडावर येऊन ठेपली, सगळीकडे एकच उत्साह संचारलेला- दिवे, पणत्या, रोषणाईचे सामान, भरजरी, रंगीबिरंगी कपडे, नानाविविध मिठाया ह्यांनी सजेलेली दुकाने आणि त्यात करंजीत सारण दाबून भरावे तशी खचाखच भरलेली माणसे!

त्या उत्साही वातावरणातही दिवसेंदिवर हिची बेचैनी, हृदयातील धडधड वाढत चाललेली.
आज तर कळस झाला होता, पोटातला गोळा इतका मोठा झालेला, डोकं तर फुटतंय की काय असंच वाटायला लागलेलं.
कारणही तसचं होतं,
आज पगाराचा आणि (अर्थात) बोनसचा दिवस..
मात्र तिच्या नाही तर तिच्या घरातल्या सर्व मदतनिसांच्या…!

***

विषय: 

एन एक्सटीरिअर पॉईंट...

Submitted by छन्दिफन्दि on 27 April, 2025 - 22:20

चित्र बघून उमटलेली ही एक सूक्ष्मकथा..

आजच्या ह्या डिजिटल युगात जवळ येतायत अस वाटत असतानाच, आपली आपली म्हणताना, न कळत दुरावत जाणारी एक धूसर हुरहूर लागून जाते..
...

“चहाची तीच चव, तोच वास आणि तस्साच रंग. आई कसं ग जमतं तुला…?“ आईने आणलेल्या चकलीचा तुकडा तोंडांत टाकत निमाने आईला विचारलं.
ते चौघेही - तिचं पूर्ण कुटुंब - रविवार दुपारच्या चहाच्या गप्पा टाकत होते.. सगळं अगदी तस्सच.. जणू शारदा निवासातच होते ते.
गेला आठवडाभर मंडळींच्या स्वागतासाठी केलेली यातायात सार्थकी लागली म्हणून निमानं समाधानाने मोठा श्वास घेतला आणि परत त्यांच्या गप्पात सामील झाली.

विषय: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - Tinytale