एन एक्सटीरिअर पॉईंट...

Submitted by छन्दिफन्दि on 27 April, 2025 - 22:20

चित्र बघून उमटलेली ही एक सूक्ष्मकथा..

आजच्या ह्या डिजिटल युगात जवळ येतायत अस वाटत असतानाच, आपली आपली म्हणताना, न कळत दुरावत जाणारी एक धूसर हुरहूर लागून जाते..
...

“चहाची तीच चव, तोच वास आणि तस्साच रंग. आई कसं ग जमतं तुला…?“ आईने आणलेल्या चकलीचा तुकडा तोंडांत टाकत निमाने आईला विचारलं.
ते चौघेही - तिचं पूर्ण कुटुंब - रविवार दुपारच्या चहाच्या गप्पा टाकत होते.. सगळं अगदी तस्सच.. जणू शारदा निवासातच होते ते.
गेला आठवडाभर मंडळींच्या स्वागतासाठी केलेली यातायात सार्थकी लागली म्हणून निमानं समाधानाने मोठा श्वास घेतला आणि परत त्यांच्या गप्पात सामील झाली.

“ सान्वी, अगं पाठवलय ते, बघा जरा दोघी आणि सांगा. “ , बाबा म्हणत होता. कशाविषयी बोलतायत ते न कळून निमानं पटकन त्यांच्या चौघांच्या फॅमिली ग्रुपवर चेक केलं.
“अरे बाबा काय पाठवलयसं? मला तर काहीच दिसत नाहीये..”
“निमा, तुला नाही ग..सान्वी, आपल्या त्या दुसऱ्या तिघांच्या ग्रूपवर बघ”, इति बाबा.
निमाचा चेहरा खरकन उतरला.
वर्तुळातल्या वर्तुळातील सर्वात आतल्या वर्तुळातून ती बाहेर फेकली गेली होती - एक एक्सटिरियर पॉईंट झाली होती त्या तिघांच्या घट्ट वर्तुळा बाहेरचा..

PC: Amita Vartak Vaidya

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान कथा...
पोहोचली
पण हे असे मनाला लाऊन घेऊ नये आजच्या काळात.
आमच्याकडे आमच्या बायकोचा माहेरचा एक ग्रुप आहे त्यात मी आहे.
अजून एक ग्रुप आहे त्यात मी नाही.
अजून एक ग्रुप आहे त्यात मी आहे, पण बायकोचा भाऊच नाही.
अजून एक ग्रुप आहे ज्यात मी बायको आणि तिच्या बहिणी आहेत पण तिचे आईवडील भाऊ नाहीत.
अजून एक ग्रुप आहे ज्यात त्या तिघी बहिणीच आहेत.
माझ्या मुलीला नंबर मिळाला तेव्हा तिला त्यांच्यात यायचे होते तेव्हा त्यांनी अजून एक ग्रुप काढून तिला घेतले पण आपला तिघींचा वेगळा ग्रूप तसाच ठेवला.
आता मोजा किती गुंतागुंतीचे वर्तुळ करून ठेवले आहेत Happy

याउलट माझ्या बाजूच्या फॅमिलीचा मात्र साधा सरळ एकच ग्रूप आहे. कारण मी एकुलता एक आहे Happy

पण ती का नाही ग्रुप मधे.
आधीच माझ्यापेक्षा आईबाबा तिच्यावर जास्त प्रेम करतात असं बऱ्याच मुलींना वाटतं.... अन असं अचानक आपण डावल्ल्या गेल्याचं कळलं की किती वाईट वाटतं..

पण ती का नाही ग्रुप मधे.
आधीच माझ्यापेक्षा आईबाबा तिच्यावर जास्त प्रेम करतात असं बऱ्याच मुलींना वाटतं.... अन असं अचानक आपण डावल्ल्या गेल्याचं कळलं की किती वाईट वाटतं..
नवीन Submitted by SharmilaR on 28 April, 2025 - 13:17

म्हणूनच त्या क्षणीच इतर तिघांशी चर्चा केल्यास, स्पष्ट विचारल्यास कोणाच्याच मनात काही शंका राहणार नाही, परंतु शंका समाधान करून न घेता कुढत राहण्याने आयुष्यभर निमालाच त्रास होणार आणि त्यांच्याच नात्यात कटुता निर्माण होणार.
कदाचित निमा पुढे संधी मिळेल तेंव्हा तेंव्हा त्यांना यावरून टोमणे देखील मारत राहील आणि त्या तिघांना नंतर काही संदर्भ न लागल्याने ते पण दुखावतील.

कथा आवडली
कथा ही कथेसारखी घ्यावी. कथेतल्या पात्रांच्या वागण्यांवर आपले निकष लावून टीका टिपण्णी करू नये , त्यांना सल्ले देऊ नयेत अशा अर्थाचे प्रतिसाद मायबोलीवरच वाचल्याचं आठवतं.

सगळ्यांना वाचलीत आणि प्रतिक्रिया अभिप्राय दिलात त्याबद्दल धन्यवाद :).

आम्ही साधारण कॉलेजमध्ये असताना असेल, आमच्याकडे एका कार्यक्रमाची निमंत्रणपत्रिका आली होती. त्या यजमानांना लिखाणाची खूप आवड होती.. त्यामुळे ती पत्रिका होती फारच अलंकारिक भाषेत लिहिली होती.
सुरुवातीलाच वर्तुळातील वर्तुळातील वर्तुळ असे काहीस लिहिल होतं.. आणि त्यानंतर अतिशय अलंकारिक भाषेतील गोड स्वरातील निमंत्रण .
हे कुटुंब असं समाजातील बऱ्याच प्रतिष्ठित लोकांशी ओळखी संबंध राखून होतं. त्यामुळे त्यांच्याकडे थोडाफार पण ती पंक्ती प्रपंचही चाले.

त्यामुळे गमतीने आमची चिडवाचिडवी सुरू झाली, अरे यांच्या इतक्यावर्तुळांमध्ये आपण कुठल्या बरोबर वर्तुळात आहोत वगैरे वगैरे..
आणि चक्क आईच्या माहेरचे असूनही आई सुद्धा आमच्यात सामील झाली..

हे चित्र बघितल्यावर कित्येक वर्षापूर्वीचा तो प्रसंग आहे ते निमंत्रण पत्रिका आठवली. आणि "आपण कोणत्या बरं वर्तुळात असू?" या प्रश्नातून असंच काहीसं हे सुचलेलं.

***
ऋन्मेऽऽष, मोठ्या फॅमिलीत किंवा गोतावळ्यातच अशी बरीच वर्तुळ असतात.. त्यांचे नातेसंबंधही बरेच क्लिष्ट असतात असे बघितलय.

अज्ञान बालक, प्रत्यक्ष आयुष्यात मनात काही न ठेवता बोलून मोकळ झालेला नेहमीच चांगला.. पण बऱ्याच जणांना ते जमत नाही.
किल्मिष राहिली की त्यातून तेढ निर्माण होते.

शर्मिला
तुमच्या प्रतिसादावरून मला 'लिटल वुमेन' मधील एक प्रसंग आठवला. एकोणिसावे शतक, एडिटर त्या लेखिकेला सांगतो तू मला पुढच्या वेळी गिफ्ट आणशील तर त्या गोष्टीचा शेवट सुखद असला पाहिजे, आणि नायि के च लग्न झालं पाहिजे. परिकथा आवडतात.

ह्या कथेचे २-३ (वाढवलेले अंत सुचले आहेत... वेळ मिळाला की टाकते... टाईप करून.

ह्या काही सुचलेल्या कथेनंतरच्या कथुकल्या. .

१.
तेवढ्यात बेल वाजते, आणि सान्वी दाराकडे पळते.
दोन माणसं एक प्रचंड मोठा खोका घेऊन आत येतात..
" सरप्राइज.... बघ आवडतय का?"
आई-बाबाही हसत त्या खोक्याभोवती जमतात..
निमा पूर्ण गोंधळून जाते.. "ओह, तर यासाठी होता तो वेगळा ग्रुप..! " स्वतः वरच थोडी वैतागत ती बॉक्स उघडायला पुढे होते..

***
२.
"टिंग टाँग..."
निमा दार उघडते. दारात अनोळखी , (पण हँडसम) तरुणाला बघून, " कोण आपण..? "असे विचारणार तेव्हढ्यात पटकन आई पुढे येत म्हणते, " निमिष, अरे ये ये.."
" ओह ! आता कळलं त्या वेगळ्या ग्रुपचं कारण.. गेल्या काही महिन्यांपासून धोशा लावूनही आपण लक्ष देत नाही म्हटल्यावर हे यांचे इकडे हे फिक्सिंग सुरू झालेल वाटतं.. " पुटपुटतच निमा त्या तिघांच्या मागून दिवाणखान्यात जाते.
***

३. थोडी खट्टू होऊन ती पसारा आवरायला आतमध्ये जाते. उभ्या करून ठेवायला ती बॅगेच्या चेन लावायला घेते.. एक कागद चीनमध्ये अडकतो..
तो सोडवून ती बाहेर काढून बघते.. आणि त्याच पावली बाहेरच्या खोलीत परत जाते..
" का नाही सांगितलंत मला ? का माझ्यापासून लपवून ठेवलत? सान्वी तू सुद्धा...? बाबा आता कसं वाटतंय तुला..?" ,
निमाचा आवाज आणि डोळे दोन्ही भरून आले असतात.

छंदीफंदि, बरोबर जमल्या आहेत शेवट कथा.
माझ्या डोक्यात सुद्धा ते लग्नाचे आलेले कारण आमच्याकडे असे घडले आहे Happy
अर्थात तो ग्रुप टेम्पररी होता. काम झाले बंद केला.