littlemoments

शशक- १- देवमाणूस - देवासारखा धावून आलेला माणूस! - छंदीफंदी

Submitted by छन्दिफन्दि on 28 August, 2025 - 01:19

सकाळी साडेसातची वेळ, रस्त्यावर शुकशुकाट. पाठीला बॅग लटकावून, हातात कंटेनर घेऊन ती घाईघाईने बस पकडायला निघालेली. EDचं सबमिशन होतं. रात्री अडीचपर्यंत जागून सगळी ड्रॉईंग्स पूर्ण केलेली - ती सगळी त्या कंटेनरमध्ये सुरक्षित होती. अचानक ठेचकाळली, हवेतल्या हवेत तिने स्वतःला सावरलं पण कॉन्टेनरच झाकण तिच्या हातात राहिलं आणि तो गेला गडगडत. काही कळायच्या आत कंटेनरने गटारात डुबकी मारलेली.
सगळी मेहनत त्या गटाराच्या पाण्यात गेलेली बघून जो काही धक्का बसला. तेव्हढ्यात अवचित आलेल्या एका माणसाने क्षणाचाही विलंब न करता, खाली वाकून कंटेनर काढून तिच्या हातात दिले. पाठमोरा तो तसाच पुढे निघाला..

विषय: 
शब्दखुणा: 

समांतर ( समांतरीश) चित्रपट/ लघु चित्रपट यांचे परीक्षण/ समीक्षा/ परिचय..

Submitted by छन्दिफन्दि on 29 July, 2025 - 01:32

“स्नो फ्लॉवर “ (Snow Flower ) गजेंद्र अहिरे यांचा चित्रपट बघायला मिळाला.. चित्रपट खूप सुंदर झाला आहे.

विषय: 

भाग दुसरा: मुंबई स्पिरिट : एक मौल्यवान पैलू !

Submitted by छन्दिफन्दि on 26 July, 2025 - 02:24

२६ जुलै २००५, मुंबई,

भाग पहिला: वीस वर्षांपूर्वी, आजच्या दिवशी ...

Submitted by छन्दिफन्दि on 26 July, 2025 - 02:19

२६ जुलै २००५, मुंबई.

दुपारच्या चहानंतर बातम्या येऊ लागल्या की कुठे कुठे पाणी भरतयं, लोकल्स उशिरा धावतायत (लोकल्स म्हणजे तेव्हा तरी मुंबईची जीवनवाहिनीच होती). तोवर दिवसभर आत एसीत बसून कॉम्पुटरमध्ये डोकं खुपसलेल्या आम्हाला बाहेर कोसळणाऱ्या पावसाची सुतराम कल्पना नव्हती. पटापट सगळं आवरून लॉग ऑफ करून खाली येऊन बघते तो, आज जो तो बस पकडण्याच्या घाईत होता. रस्ताभर कंपनी बसच्या मोठ्या रांगा लागलेल्या. मी ही माझी नेहेमीची बस हेरून सीट पटकावली. हां हां म्हणत काही मिनिटांतच बस भरून, निघाली सुद्धा.

एक शांतीप्रिय अवलिया... नितीन सोनावणे!

Submitted by छन्दिफन्दि on 14 March, 2025 - 19:36

MMBA च्या संक्रांतीच्या कार्यक्रमात त्यांनी एका तरुणाला स्टेज वर बोलावलं. नितीन सोनावणे, शिक्षणाने इंजिनिअर आणि काय करतात - चालतात.. पडलात ना बुचकळ्यात!
हा माणूस गेली सात-आठ वर्ष चालतोय, म्हणजे त्याने अनेक देशा-विदेशात हजारो मैल पदभ्रमंती केली आहे. आणि आता तो सॅन फ्रान्सिसको ते वॉशिंग्टन डीसी, तीन ते साडेतीन हजार मैल, ही यात्रा पायी करणार आहे.

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - littlemoments