चित्रपट
नेटफ्लिक्सवरचा "Materialists"
सहज नेटफ्लिक्सवर "Materialists" दिसला, नवा आहे म्हणून लावला. हिंदीतून. पहिल्या काही मिनिटातच त्याने मनाची पकड घेतली. चित्रपटाचा विषय आणि डायलॉग चांगले आहेत. हिंदी डबिंग चांगले आहे. यात फिफ्टी शेड्स ट्रायलॉजी वाली डकोटा जॉन्सन आहे. पण, आधीच सांगतो. तिचे "तसले" रूप यात नाही. यात ती साधी सोज्वळ आहे. विशिष्ट प्रकारचा हेयर कट करून चार्मिंग दिसण्याचा प्रयत्न तिने केला आहे, पण अन्यथा माझ्या निकषानुसार ती सुंदर नाही. तिच्याऐवजी कुणीतरी दुसरी अभिनेत्री घ्यायला हवी होती. तिच्या त्वचेवर कसलेतरी छोटे छोटे डाग सदृश काहीतरी आहेत. अनेक पाश्चात्य ऍक्ट्रेसच्या त्वचेवर कमी अधिक प्रमाणात असेच डाग दिसतात.
तिसरी कसम
गुलफ़ामचा शब्दशः अर्थ तर गुलाबासारखी कांती असलेला. बोलीभाषेत तो वापरतात कोमल, नाजूक या अर्थाने.
तिसरी कसम ऊर्फ मारे गए गुलफ़ाम ही कहाणीही अशीच. फुलासारख्या निरागस मनाच्या माणसाची. आयुष्यात पहिल्यांदा
गुलाब पाहिलेल्याने त्याच्या सुगंधाने हरखून जावं आणि अचानक काटा रुतून भानावर यावं याची कहाणी
आवरजूssन बघावी अशी मराठी शॉर्ट फिल्म - LOVE by Chance
एखाद्या शॉर्ट फिल्मवर असे स्वतंत्रपणे लिहेन असे वाटले नव्हते. पण काय करणार... फारच आवडली 
एक स्पेशालिस्ट आणि एक ग्रेटेस्ट शोमन : दोघांच्या ड्रीम प्रोजेक्टपैकी कुठला चित्रपट उजवा ?
(चिकवा वर लिहून पोस्टचं बटण दाबायचाच अवकाश होता, पण मग तिथे अधिक चर्चा नको म्हणूनत स्वतंत्र धागा सादर करत आहे. )
गणपती बप्प वर आय० ने बनवलेले पूर्ण गाणे
मित्रानी
तसे हे गाणे खुप आधी बनवलेले होते
थोडे काम कराय चे होते पण राहुन गेले
तुमचे प्रतिसाद नकी कळवा
च्यानेल ला लाइक आणि सुब स्क्राइब नक्के करा
आमीर खान : एक अष्टपैलू व्यक्तीमत्व
परकीय भाषेतील "हिंदी/मराठी डब" चित्रपट
परकीय भाषेतील चित्रपटांचा मायबोलीवर धागा असावा. पण बरेचदा माझ्यासारख्यांना त्याचा काही फायदा होत नाही. कारण सर्वांनाच परकीय भाषेतील संवाद कळत नाहीत. तसेच चित्रपट बघताना सोबत सबटायटल वाचणे त्रासदायक ठरते. ते देखील बरेचदा इंग्लिशमध्येच असल्याने सर्वांनाच ते कळत नाहीत किंवा पटपट वाचणे जमत नाहीत. त्यामुळे बरेच जण हिंदीमध्ये डब केलेल्या चित्रपटांना प्राधान्य देतात. काही मराठीत देखील असतात. पण त्या डबिंगचा दर्जा तितका चांगला नसल्याने म्हणून म्हणा तितकी मजा येत नाही. सुधारणा झाली तर आवडेल.
असो,
तर अश्या सर्व चित्रपट प्रेमींसाठी हा धागा.
आले जेम्स गनच्या मना, पुन्हा सुपरमॅन जन्मला!
11 जुलै 2025 रोजी रिलीज झालेला सुपरमॅन हा एक अमेरिकन सुपरहिरो चित्रपट आहे. हा चित्रपट डीसी युनिव्हर्स (DCU) चा पहिला चित्रपट आहे आणि सुपरमॅन चित्रपट मालिकेचा दुसरा रिबूट आहे. जेम्स गन यांनी दिग्दर्शन आणि लेखन केले आहे. कलाकारांची लिस्ट तुम्ही इंटरनेटवरून नंतर सविस्तर बघा. मी आयनॉक्समध्ये मुलगा आणि मुलीसह बघितला.
चित्रपट कसा वाटला १२
२००० झाले पण