सकाळी साडेसातची वेळ, रस्त्यावर शुकशुकाट. पाठीला बॅग लटकावून, हातात कंटेनर घेऊन ती घाईघाईने बस पकडायला निघालेली. EDचं सबमिशन होतं. रात्री अडीचपर्यंत जागून सगळी ड्रॉईंग्स पूर्ण केलेली - ती सगळी त्या कंटेनरमध्ये सुरक्षित होती. अचानक ठेचकाळली, हवेतल्या हवेत तिने स्वतःला सावरलं पण कॉन्टेनरच झाकण तिच्या हातात राहिलं आणि तो गेला गडगडत. काही कळायच्या आत कंटेनरने गटारात डुबकी मारलेली.
सगळी मेहनत त्या गटाराच्या पाण्यात गेलेली बघून जो काही धक्का बसला. तेव्हढ्यात अवचित आलेल्या एका माणसाने क्षणाचाही विलंब न करता, खाली वाकून कंटेनर काढून तिच्या हातात दिले. पाठमोरा तो तसाच पुढे निघाला..
आणि तिने विस्मयचकित नजरेने त्याच्याकडे पाहीले त्याच वेळी डोळ्यातील एक अश्रू गालांवर ओघळला.
***
तळटीप:: ही एक सत्यघटनेवर आधारित आहे. त्या माणसाने माझ्या मैत्रिणीची कित्येक तासांची मेहनत वाचवली होती.
***
शब्दार्थ
ED - Engineering Drawing
कंटेनर
दोन उपक्रम एक प्रवेशिका.
दोन उपक्रम एक प्रवेशिका.
Brilliant!!
चांगली आहे. आवडली.
चांगली आहे. आवडली.
खूप आवडली.
खूप आवडली.
मी विचारणारच होते ईडी काय?
मी विचारणारच होते ईडी काय? मग कंटेनर पाहिला तेव्हा समजलं(खरेच विसरले की का वय झालय?)
आजकाल भलतेच अर्थ आधी डोक्यात येतात.
आवडली
आवडली
चांगली आहे. आवडली. >>> +१
चांगली आहे. आवडली. >>> +१
मस्त.. आवडली.. आणि महत्त्वाचे
मस्त.. आवडली.. आणि महत्त्वाचे म्हणजे फार रिलेट झाली.
कित्येक तासांची मेहनत >>> तासाची?? दिवसांची.. रात्रीची.. महिन्यांची.. स्पेशली आमच्या सिव्हिल इंजिनिअरिंगला.. असे दोन चार किस्से झाले आहेत. काहीना परत मिळाले काहीना नाही.
मी स्वतः तर इतके वेळा विसरलो आहे अशा सगळ्याच गोष्टी की हिशोब नाही. पण मी वस्तू विसरतो हे सगळ्यांना माहीत असल्याने मित्रच चार शिव्या घालून मी विसरलेल्या वस्तू आठवणीने उचलायचे.
आता गेले ते दिवस. आता तसे मित्र नाहीत सोबत. म्हणून दोन बॅग असल्या की त्यातील एक विसरू नये यासाठी मी त्यांची एकमेकांना गाठ मारून ठेवतो
वा कल्पना भारीए! दोन्ही
वा कल्पना भारीए! दोन्ही उपक्रम साध्य केलेत!
आवडली!
चांगली आहे. आवडली. >>> +१
चांगली आहे. आवडली. >>> +१
खरच देवासारखा धावुन आला.
खरच देवासारखा धावुन आला. केवढी मेहनत असेल.
रानभुली, कुमार१, sharmilaR,
रानभुली, कुमार१, sharmilaR, झंपी, मंजूताई, जाई , ऋन्मेऽऽष, निकु धन्यवाद!
दोन उपक्रम एक प्रवेशिका. >>
हे आवडलं रानभूली
कित्येक तासांची मेहनत >>> तासाची?? दिवसांची.. रात्रीची.. >>> हम्म खरंय. ताशी - person hours मध्ये डोक चालत.
दोन बागांच्या गाठी .. चांगली कल्पना. पण विसरलात तर दोन्ही राहू शकतात.
आजकाल भलतेच अर्थ आधी डोक्यात येतात>>>
l know
म्हणून खालती दोन्ही टाकलं