बदलावेसे वाटणारे पाश्चात्य एटीकेट्स नियम!

Submitted by ऋन्मेऽऽष on 27 October, 2025 - 15:56

एकूणच सोशल मीडियावर आणि मायबोलीवर सध्या रेस्टॉरंटमध्ये कुठे बसावे, कसे वागावे, काय घालावे याची घमासान चर्चा चालू आहे.

दूर कुठेतरी दिल्लीत एक शर्मा आडनावाची हिंदीभाषिक महिला आपली मराठमोळी कोल्हापुरी चप्पल घालते याचा अभिमान बाळगायचा सोडून...
आणि जेव्हा ती खुर्चीवर मांडी घालून बसते तेव्हा "दिल्लीचेही तख्त (पक्षी– खुर्ची) राखते कोल्हापुरी चप्पल माझी" असे गर्वाने म्हणायचे सोडून..
आपली मराठी माणसे इंडियन पीनल सेक्शन कोड घेऊन तिलाच नियम शिकवत आहेत.
त्याचवेळी परंपरा बचावपक्षाचे वकील सुद्धा एआय वापरून नवनवीन कायद्याची कलमे हुडकून आणत आहेत.

अश्यात कोणीतरी म्हणतेय की तुम्ही इथे भांडत आहात आणि तिथे त्या बाईने मूव्ह ऑन सुद्धा केले असेल (कसे करतात लोकं देव जाणे, इथे पाचवीतले पहिले प्रेम विसरले जात नाहीये)

आणि अजून कोणीतरी म्हणतेय की धागाकर्ता मोघम लिहून धागा काढतो, लोकांना चर्चेला लावतो.. (आता यात काय वाईट आहे समजत नाही, उगाच ते "धंद्याला लावतो" अश्या टोनमध्ये का लोकं लिहितात खरेच कळत नाही) ..
आणि स्वतः मात्र मजा बघतो. खरेच त्याला काही पडली असेल तर त्याने कंझ्युमर कोर्ट किंवा तत्सम अथॉरिटिकडे तक्रार करावी..

पण जिथे माझ्या स्वतःच्या घरचे लाईट बिल, मेंटेनन्स, माझ्या मोबाईलचे बिल, अगदी माझा इन्कम टॅक्स रिटर्न सुद्धा जिथे माझी बायको भरते तिथे दुसऱ्या बाईला त्रासात बघून मी तक्रार करायला धावलो तर घरी किती मार पडेल विचार करा..

म्हणून म्हटले ते करूया जे मला जमते.
आपण धागा काढुया आणि भारतातील मॉल, रेस्टॉरंट, पब, बार, डान्सबार, डिस्को, अम्युजमेंट पार्क, थिएटर, मल्टीप्लेक्स सारख्या पब्लिकप्लेस मध्ये असलेल्या खाजगी जागातील जाचक नियमांचे संकलन करूया.... आणि मग बघूया सर्वानुमते किंवा बहुमते पुढे काय करता येईल ते.

सुरुवातीचे चार आणे मी टाकतो.
पहिले गाऱ्हाणे माझे मांडतो.

१) इंग्लिश विंग्लिश

मला आजकालच्या या उच्चभ्रू पंचतारांकित, फाईन डाईन रेस्टॉरंट आणि मॉल अश्या सर्वच जागी एक मोठा प्रॉब्लेम जाणवतो. तो म्हणजे तिथले वेटर, मॅनेजर, सेल्समन, सेल्सगर्ल, टेलिफोन ऑपरेटर, सर्विस प्रोव्हायडर, रिसेप्शनिस्ट, डोअरकिपर, सिक्युरिटी गार्ड म्हणजे तिथला कुठल्याही श्रेणीचा कर्मचारी गरज नसताना इंग्लिश फाडायला सुरुवात करतो. आणि मग माझ्यासारखे ज्यांना चांगले इंग्लिश जमत नाही त्यांचा प्रॉब्लेम होतो.

खरे तर आपण पैसे मोजत असतो. म्हणून आपण त्यांच्यापेक्षा स्मार्ट दिसणे अपेक्षित असते. पण त्यांना तितक्याच उत्स्फूर्तपणे इंग्लिशमध्ये उत्तर देता आले नाही तर आपण बावळट ठरतो. म्हणजे मी तरी ठरतो. या कारणामुळे मी बरेचदा बायकोला पुढे ढकलतो. आणि ती सुद्धा या संधीचा फायदा उचलत दुप्पट पैसे खर्च करून मोकळी होते.

बरे आपण चेहऱ्याने काही गोरेचिट्टे फॉरेनर दिसतो अशातला भाग नाही. हे लोकं बस्स कपडे बघून एखाद्याशी इंग्लिशच बोलायचे हा अंदाज लावतात. म्हणजे पारंपरिक कपडे घातले तर यांचे ड्रेस कोडचे संकेत तुटणार, आधुनिक घातले तर हे इंग्लिश झाडणार.
थोडक्यात इकडे अपमान तर तिकडे घोर अपमान. माझ्यासारख्याने करावे तरी काय?

२) माय जेवण माय स्टाईल!

हा मुद्दा समजून घ्यायला जरा भूतकाळात फेरी मारून वर्तमानात येऊया.

पिझ्झा मी कॉलेजला असताना पहिल्यांदा खाल्ला. तेव्हा भारतात नव्यानेच आला होता. म्हणजे आमच्या मध्यमवर्गीय घरात तरी इतका पोहोचला नव्हता. पिझ्झा म्हणजे चीझ लावलेली भाकरी असले विनोद सुद्धा मार्केटमध्ये आले नव्हते तेव्हाचा तो काळ. आम्ही चार मित्र वर्गणी काढून एका मोठ्या रेस्टॉरंटमध्ये पिझ्झा खायला गेलो होतो.

कशाची चव काय असेल याची सुतराम कल्पना नसल्याने आणि आम्ही मेनूकार्ड चारदा वाचूनही त्यात ओळखीचे काही न दिसल्याने आम्ही चार प्रकारचे चार पिझ्झे मागवून प्रत्येकाची एकेक फोड खायचे ठरवले. हो, नवीन नवीन असताना आम्ही पेरूची फोड सारखे पिझ्याची फोडच म्हणायचो. इतके ते नवखे प्रकरण होते. पण इथे ते महत्वाचे नाही. तर जिथे आमची पटापट नावे वाचायची बोंब होती. तिथे वेटरने फाडफाड इंग्लिश झाडत आमची ऑर्डर सर्व्ह केली. आणि सोबत काटासुरी ठेवले.

झाली का पंचाईत! मेडिकलला गेले की चाकूने बेडके कापावी लागतात जे आवडत नसल्याने आम्ही इंजीनियरिंगला आलो असे लोकांना फुशारक्या मारून सांगणारी हुशार पोरे आम्ही.. या लौकिकाला बट्टा लागतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. काटा कुठल्या हातात धरायचा, आणि सुरी कुठल्या दिशेने चालवायची इथपासून सुरुवात होती. पण सुदैवाने आमच्यात एक अमोल पालेकर निघाला त्यामुळे आम्हा बाकी तिघांचा असरानी होता होता वाचला.

त्या दिवशी कष्टाने आम्ही तो पिझ्झा संपवला खरा, पण खाण्यातली मजा काही आली नाही. कष्ट करून कमवा आणि त्या पैश्याचे खातानाही पुन्हा कष्टच करा. रोज इतके कष्ट करावे लागले तर एक दिवस आपणच नष्ट होऊ असे वाटले.

पण ॲम्बियन्स बॉस ॲम्बियन्स!
यासाठीच तर खर्च केला जातो हे लक्षात आले. तसे अगदी युरेका युरेका झाले. त्यानंतर ज्या कोणी रेखा सुरेखा माझ्या आयुष्यात आल्या त्यांना घेऊन एकदातरी मी तिथे जायचोच. ऍक्च्युली एकदाच जायचो. तेवढेच बजेट असायचे. गर्लफ्रेंडच्या सहवासाचा आनंद पुरेपूर लुटायचो पण खाण्यातली मजा शून्य व्हायची. अन्नावरची वासना उडून जाणे हा शब्दप्रयोग कुठून आला असावा हे तेव्हा मला उमगले. कारण एक वासना पूर्ण व्हायची तर दुसरी उडून जायची.

मग कधीतरी कॉलेज संपल्यावर जॉब लागला. आठवड्याला पिझ्झा खाणे परवडायच्या वयात पोहोचलो. पण काटासुरी मेहनतीची भीती कायम असल्याने खायचो मात्र नाही. अश्यात आईने तिच्या मैत्रिणीसोबत रेस्टॉरंटमध्ये भेटीचा प्लान बनवला. सोबत मैत्रिणीची मुलगी सुद्धा होती. जिला माझी मैत्रीण बनवायचा या दोन मैत्रिणींचा प्लान होता. ती मुलगी अमेरिकेत शिक्षण घेऊन आलेली होती. त्यामुळे त्यांनी भेटीचे रेस्टॉरंट तिच्या शिक्षणाला साजेसेच ठरवले होते.

अरे हो, उगाच निराशावादी सस्पेन्स ताणायला नको म्हणून आधीच क्लिअर करतो, आमचे काही जमले नाही. आणि जमणार नाही हे दोघांनाही तेव्हाच समजले जेव्हा मी मेनूकार्ड वाचायलाच पंधरा मिनिटे घेतली. (ती मुलगी सुंदरही कमालीची होती ते ही एक कारण होते म्हणा)

पण पंधरा मिनिटे खर्चून मी तेच केले जे मी दर दुसऱ्या उडुपी हॉटेलमध्ये पूर्ण मेनूकार्ड नजरेखालून घातल्यावर करतो. म्हणजे तिथे मसाला डोसा मागवतो. इथे पिझ्झा मागवला. इंग्लिश का येत नसेना, पोरगी का पटत नसेना, पण सन्मान वाचवणे सुद्धा गरजेचे असते. म्हणूनच मालिका २-० ने हरल्यावर देखील आपला रोहीत शर्मा व्हाईटवॉश वाचवत शतक मारतो तेव्हा आनंद होतो.

आपल्याला काटासुरीने पिझ्झा खाता येतो हे दाखवून द्यायची हीच ती वेळ होती. पण मी काटासुरी साफसूफ करून, व्यवस्थित पोजिशन घेत, पहिलाच घास तोडायला घेणार, इतक्यात समोर पाहिले तर दोन्ही मायलेकी तोंडाचा मोठा आ वासून हातानेच वदनी कवळ घेऊन सुरू झाल्या होत्या. माझ्या हातात असलेली सुरी उंचावून तशीच स्वतःच्या छातीत खुपसून घ्यावीशी वाटली. ती अमेरिका रिटर्न मुलगी मस्त आपल्या आईसोबत हातानेच मचमच करत पिझ्झा खात होती. आणि मी मात्र दिखाव्याच्या आधुनिक संस्कारात गुरफटलो होतो.
ज्याला पूर्ण इंजिनिअरिंगमध्ये कधी एकही एटीकेटी लागली नव्हती त्याला त्या दिवशी एटीकेट्सचा घोडा लागला होता.

एक तो दिवस आणि एक आजचा दिवस. जगात ज्या ज्या गोष्टी हाताने खाणे शक्य आहेत त्या त्या मी आता हातानेच खातो.

पुढे मग कधीतरी कुठेतरी वाचले. की आपण अन्नग्रहण करताना आपल्या जास्तीत जास्त इंद्रियांना अन्नाचे सुख मिळायला हवे तरच खाण्याची मजा वाढते. जसे डोळ्यांनी आपण खाद्यपदार्थांच्या सजावटीचा आनंद लुटतो, नाकाने त्याचा छान वास घेतो, कानाने तळलेल्या पदार्थाचा चरचर आवाज ऐकतो, तोंडाने अर्थातच चव घेतो. राहता राहिले पाचवे इंद्रिय म्हणजेच स्पर्श! पण हाताने खायचे टाळून आपण त्या आनंदाला मुकतो.

स्पेशली गरमागरम वरणभात हाताने खाणाऱ्यांची तर किव करावी तितके कमी. असे मी आता इथे लिहिताच निम्म्याहून अधिक जणांना ते पटेल. पण आमच्या ऑफिसमध्ये एक मी वगळता मला अपवादाने सुद्धा कोणी असा दिसला नाही जो लंचला राईसप्लेट मधील डाळभात हाताने खातो. माझ्यासोबत जेवायला बसणाऱ्यांना सुद्धा हा मोह कधी होत नाही याचे आश्चर्य वाटते. चपाती भाजी हाताने संपवतात, पण नंतर डाळभातासोबत चमच्याने सुरू होतात. त्यांना खरेच हाताने डाळभात खाण्यातला आनंद कळत नाही की ऑफिसमध्ये कुठेही लिखित स्वरूपात नसलेले अदृश्य नियम ते पाळत असतात कल्पना नाही. पण नशीब माझ्या हाताने डाळभात खाण्यावर कोणी ऑब्जेक्शन घेत नाही. ज्या दिवशी घेतील त्या दिवशीच मी रिजाईन करून नवीन जॉब शोधायला घेईन.

पण बाहेर एखाद्या पंचतारांकित फाईन डाईनमध्ये मात्र तो आक्षेप घेतला जाणार नाही याची मला खात्री नाही. एखाद्याला माझ्या हाताने खाण्याची किळस वाटली तर त्याचा अधिकार कदाचित आधी जपला जाईल. डाळभात हा आपला भारतीय पदार्थ आहे आणि वर्षानुवर्षे तो आपण हातानेच खात आलोय हे विसरले जाईल. कारण आपण स्वतःला उच्चभ्रू म्हणवून घेण्यासाठी आता पाश्चात्य एटीकेट्स स्वीकारले आहेत.

ज्या गोष्टी आपल्याकडे एखाद्या झुडुपामागे किंवा बागेतील बंद पडलेल्या लाईटीखालील बाकड्यावर बसून छत्रीच्या आडोश्यात केल्या जातात त्या पाश्चात्य देशात चारचौघात कोणाची भीड न बाळगता होतात. तेव्हा ज्या लोकांना असे बिनधास्त तोंडात तोंड जाताना पाहून ते मॉडर्न आणि क्यूट वाटते त्यांनाच एखाद्याचा हात जेवताना तोंडात जाताना बघणे ऑकवर्ड वाटत असेल तर ते एटीकेट्स म्हणून स्वीकारावे लागते.

क्रिकेट हा मूळ गोऱ्यांचा, ब्रिटिशांचा खेळ आहे. जिथे चेंडूची लकाकी कायम राहावी म्हणून संघातले सारे जण आळीपाळीने त्याला थुंकी लाऊन चोळतात. पण ते म्हणे हायजिन पाळतात आणि आपल्या भारतीयांना त्याची काही पडली नसते...

अच्छा ऐका ना,
थांबू का इथेच..
झोप आली आहे
पुढचे प्रतिसादात लिहितो ना...
शुभ रात्री !

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्यासारख्याने करावे तरी काय? >> एव्हढा मोठा प्रश्न कशाला आहे हा ? तुला हव्या त्या भाषेमधे बोलू शकतोस कि. समज कि मायबोलीवर नवा बाफ उघडला आहे (शाखा/स्वजो/सई/हिट्मॅन्/चुम्मा/ धोनी इ.) ह्यांच्यावर नि हो सुरू. समोरचा बघून घेईल कुठल्या भाषेत उत्तर द्यायचे ते. मी भारतात आलो कि महाराष्ट्रामधे सरळ मराठी मधे बोलतो. समोरचाही मग तोडक्या फोडक्या का होईना मराठीमधे बोललाच आहे. जेंव्हा नाहि बोलला तेंव्हाही मी मराठीमधे बोललोय नि कुठेही अडचण आलेली आठवत नाही.

पण बाहेर एखाद्या पंचतारांकित फाईन डाईनमध्ये मात्र तो आक्षेप घेतला जाणार नाही याची मला खात्री नाही >> पंचतारांकित फाईन डाईनमध्ये जर डाळभात ठेवला असेल तर तो नॉव्हेल्टी आयटम असेल तेंव्हा हाताने खाल्लेस म्हणून तुला कोणी हटकणार नाही. आणी हटकलेच तर तूही बाणेदारपणे स्वतःचे पंचतारांकित फाईन डाईन उघड जिथे डाळभात हातानेच खावा लागेल असा नियम कर.

वाहतुकीचे सिग्नल असणे.
हेल्मेट सक्ती
मुळात काही नियम असणे आणि ते पाळायची सक्ती असणे
पैशाने कायदा विकत घेता न येणे
कायद्यासमोर सगळे समान असणे
आणि
लोकशाही.
हे सगळे बदलायचे निकराचे प्रयत्न चालू आहेतच.

नेमका विषय काय आहे ? मागच्या धाग्यावर मला कोण कोण काय काय बोलले हा कि शीर्षकात दिलेला ? Lol
शेवटपर्यंत वाचल्यास काही इनाम / पुरस्कार आहे का ? Wink

चर्चाप्रस्तावाचे धागे ललित लेखनात न काढता चालू घडामोडी नावाचा विभाग तेथे काढा. एडमिनने सोय करून दिली आहे तशी Happy

असामी,
तुम्ही सणसणीत अपवाद आहात. अश्या ठिकाणी समोरच्याच्या इंग्लिश संभाषणाला दाद न देता आवर्जून मराठी बोलणारे मला फारसे दिसले नाहीत.
पण समोरच्याला मराठी येतच नसेल तर हिंदी मध्ये बोलायला मला काही प्रॉब्लेम नाही. पण इंग्लिश आवरा..

<<<<<< पंचतारांकित फाईन डाईनमध्ये जर डाळभात ठेवला असेल तर तो नॉव्हेल्टी आयटम असेल तेंव्हा हाताने खाल्लेस म्हणून तुला कोणी हटकणार नाही.
>>>>>>>>

Novelty items are objects that are new, unusual, or humorous and often serve little to no practical purpose.

आपल्याच राज्यात डाळ भात नॉव्हेल्टी आयटम Happy

<<<<< हे सगळे बदलायचे निकराचे प्रयत्न चालू आहेतच.
>>>>>>

अमितव,
change is the only thing that is always present and a fundamental aspect of existence.

आयुष्यात कधीही हे असेच असते, हे असेच चालते, हे असेच राहणार आणि आणि हेच योग्य आहे समजून स्वीकारू नये. आपल्याला जे पटत नाही ते बदलायचा प्रयत्न कायम असावा Happy

कल्चरल झटके आहेत हो, बाकी काही नाही
बर्म्युडा घालून अमेरिकेन लोक हापिसात जाऊ शकतात
आणि ब्रिटनमध्ये फॉर्मल पेहराव न घालता कोणी हापिसात गेले
तर बाकी लोक भुवया उंचावून पाहतात.

आपल्यासारख्या देशांत पब्लिक या दोन्हींत विभागले गेले आहे. त्यामुळे असे प्रसंग घडतात.

अतुल हो,
कारण आपण नियम अनुकरण करून बनवले आणि लादले आहेत. स्वतःच्या विचारांचा आणि परंपरांचा आदर करून किंवा अभिमान बाळगून नाही. त्यामुळे नियम पाळतानाची कम्फर्ट लेव्हल आढळत नाही.
अमेरिकन लोकं कॅज्युअल कपड्यांमध्ये कम्फर्टेबल असतात, तर ब्रिटिशांना आपल्या कडक शिस्तीचा अभिमान असतो. एकाला ठराविक कपड्यांचे नियम लागले तरी ते जुमानणार नाही तर एकाला कुठलेही नियम लावले नाही तरी ते स्वतःहून अभिमानाने आपला पोशाखच घालणार... पण आपले काय

अतुल संपूर्ण प्रतिसादाला अनुमोदन.

अजून एक भर घालावीशी वाटेल. कुठल्याही संस्थेचे नियम त्या देशाच्या कायद्याला छेद देऊ शकत नाहीत. (मागच्या पानावरून पुढे) मी स्वतः परंपराप्रिय आहे कि नाही, संस्कृती रक्षक आहे कि नाही हे महत्वाचे नाही.
इथे अनेकांनी म्हटले असेल कि मी तुझ्याशी असहमत असलो/ले तरी तुझ्या अभिव्यक्तिस्वातंत्र्यासाठी प्राणही देईन.
पण ही वाक्यं निव्वळ सुभाषितं ठरतात. त्यावर अंमल कुणी करत नाही.

त्या बाईच्या हक्काचे रक्षण करण्यासाठी फक्त पाठिंबा दिला असता तरी चालले असते. याचा अर्थ पाठिंबा देणाऱ्यांनी कोल्हापूरी चप्पल घाला किंवा मांडी घालून बसा असा फतवा काढला आहे असा अर्थ होत नाही.
मी मुद्दाम म्हणून अशा ठिकाणी वेगळे वागणार नाही. .

तरी पण जी शिस्त इथे पाळावी असा नियम आहे तो नियम मुळातच चुकीचा आहे असे माझे मत कायम असेल आणि कुणाला त्याबद्दल न्याय मागावासा वाटला तर माझा पाठिंबा असेल. आणि पण जी बाजू (माझ्या मते) न्याय्य आहे ती कितीही ट्रोल झाली किंवा लोकप्रिय नसली तरी तिच्या पाठीशी ठामपणे उभी राहीन.

फक्त धागा लेखकाने चीप करून ठेवलंय त्या प्रमाणे नवीन कायदे नाहीत तर अस्तित्वात असलेल्या कायद्यानुसारच.

तसेच एखादा कायदा जर जगण्याचा अधिकार हिरावून घेत असेल तर त्या लढ्याला माझा पाठिंबा असेल. उदा समलैंगिक लोकांना जाचक असलेला ब्रिटीशकालीन कायदा जो संविधानाच्या कलमांचा भंग करत होता.

हेल्मेट न घालणे हा काही कुणाचा मुलभूत अधिकार नाही. पण एखाद्याला हेल्मेट मुळे मेडिकल प्रॉब्लेम असेल तर त्याच्यावर सक्ती नको याला माझा पाठिंबा असेल. तशी दुरूस्ती कायद्यात झाली आहे. पण त्या व्यक्तीने शक्य असेल तर दुचाकी वापरू नये असे मला वाटते. अर्थात कार घेण्याची ऐपत नसेल आणि सार्वजनिक वाहतूक सेवा गैरसोयीची असेल तर त्या व्यक्तीला बेशिस्त म्हणण्याऐवजी त्याला स्वतःचे वाहन न वापरता आरामात सार्वजनिक वाहनाने जाण्याचा अधिकार मिळत नाही हे वाईट आहे असे म्हणेन. त्याचबरोबर सरकार कुठलेही असले तरी एव्हढ्या मोठ्या लोकसंख्येच्या मुलभूत अधिकारांचे रक्षण करणे शक्य नाही याचीही कल्पना आहे.
पुन्हा कुणी म्हणेल कि मग सरकारने मोजक्या शहरात सर्व संधी निर्माण केल्याचा हा परिणाम आहे, तर हे सुद्धा बरोबरच आहे असे म्हणेन

गुंतागुंतीच्या प्रश्नात एक ते एक नियम पाळले नाहीत ही एकच टेप लावून कुणाला जज्ज करणार नाही.

या चर्चेत हेल्मेट ट्रॅफिक नियम किंवा इतर कुठले सुरक्षिततेचे नियम आणू नये असे वाटते.
कारण ते पाळायचेच असतात. माझी मर्जी, माझी आवड, माझे विचार, अशी कारणे ते न पाळण्यासाठी लागू होत नाही.

दिल्लीचेही तख्त (पक्षी– खुर्ची) राखते कोल्हापुरी चप्पल माझी

हे हास्यास्पद आहे. एखाद्या मराठी मुलाने/ मुलीने राष्ट्रिय स्तरावरचा पुरस्कार मिळवला व तिथे कोल्हापुरी चप्पल घालून स्वीकारला तर मलाही अभिमान वाटेल. हा प्रकार केवळ attention seeking साठी होता.

> त्या बाईच्या हक्काचे रक्षण करण्यासाठी फक्त पाठिंबा दिला असता तरी चालले असते.
तिथे आलेल्या अन्य गिर्‍हाइकांच्या hygienic and aesthetic ambiance च्या हक्काचे काय ?

समजा तुम्ही पुण्याच्या एका हॉटेल मध्ये मॅनेजर अहात, तिथे 'केस विंचरू नये' अशी पाटी आहे. मुंबईवरून आलेली एक सोमी influencer तिथेच केस विंचरू लागली व ' आमच्या मुंबईत चालतय', ' आमच्या घरी चालतय' अशी हुज्जत घालू लागली तर ? तुम्ही काय भूमिका घ्याल ? केस विंचरणे हा तिचा हक्क आहे का ?

ताज मध्ये खुर्चीत मांडी घालुन बसु नये अशी पाटी लावली आहे का?
पाटी लावायच्या आधीच कसे काय कुणाला हटकु शकतात?
आधीच पाटी लावली असती तर ती बाई पाटी पाहुन परतली असती किंवा मांडी घालुन बसली नसती किंवा बसली असती तर मॅनेजरने मॅनेजरने म्हटले असते "काय डोळे फुटलेत की काय? एवढा जाड भिंगाचा चष्मा लावलाय तरी दिसत नाही का पाटीवर काय लिहिलंय? खाली करा पाय!" आणि त्या बाईने "घ्या केले खाली पाय, आता आणा माझी ऑर्डर लौकर" म्हटले असते आणि यावर घमासान चर्चा न होता देशाचा बहुमूल्य वेळ वाचला असता.

मानव, तुमचं आपलं काहीही हा!
पाटी असती तर ती कुठल्या भाषेत आहे, आणि भारताच्या संविधानात किती भाषा अधिकृत आहेत त्या सगळ्या भाषांत का नाही वरुन रणकंदन केलं नसतं असं वाटलंच कसं तुम्हाला? इंग्रजी हिंदी बांग्ला तमिळ तेलगू मध्ये असती तर मराठीची गळचेपी!!! मराठी खतरे मे! मग उर्दु का नाही किंवा का आहे. मग फक्त संस्कृत मध्ये ठेवा.
ते सगळं केलं की मद्राशांच्या कुठल्या सवयी आपण आत्मसात कराव्या वरुन एक धागा तर झालाच पाहिजे!
बाकी तुम्हाला बघुन बरं वाटलं! Happy

तिथे आलेल्या अन्य गिर्‍हाइकांच्या hygienic and aesthetic ambiance च्या हक्काचे काय ? >> बाहुबली पार्ट २ आला ओ विकू, तुम्ही अजून बाहुबली को कटप्पा ने क्युं मारा चंच उत्तर शोधताय. Wink

मानव >>> चप्पल नको असेल तरी बाहेर पाटी असते. दारावर अडवायला हवं होतं. मॅनेजरने पण जेवण झाल्यानंतर नम्रपणे सांगितलं असतं तर बिघडलं नसतं. शेवटी तो व्हिडीओ बघितला. त्यात तो म्हणाला ना "यहां रीच लोग आते है, उनमेसे किसीने ऑब्जेक्शन लिया है " . यातलं रीच लोग हे टाळायला पाहीजे होतं.

एक नातेवाईक एअरफोर्स मधे होते. त्यांनी सांगितलं कि पूर्वी तिन्ही दलांमधे एक नियम होता "सायकल पर आनेवाले गेट मे उतर कर चले"
हा नियम पूर्वीच्या लोकांनी बिनबोभाट पाळला. कारण असे नियम पाळणे हे त्यांच्या हुषारीचे प्रतिक होते. पण नवीन पिढी प्रश्न विचारते. एअर फोर्समधे पूर्वी सुशिक्षित जवानांचा भरणा जास्त असे. त्यांनी हा नियम खूप आधी काढून टाकला. आर्मीने एव्हढ्यात काढला. हा नियम का होता ? कारण सायकलवरून येणारे काळे (भारतीय) असत आणि मोटरसायकल आणि कार मधून गोरे येत. त्यांचा आब राखण्यासाठी ही प्रथा होती.
असे नियम बिनडोकपणे पाळणे चालू द्यायचे का ? शिस्त आहे तर पाळा, पण त्यामागचे लॉजिक नको का विचारायला ?

शाळेत शिकवलेलं ते बरोबरच असतं अशी मानसिकता असते. त्यातून बाहेर पडायला वेळ लागतो. शक्यतो इतिहासाच्या बाबतीत. तसंच ज्या गोष्टी चालत आलेल्या आहेत त्यांच्या बाबतीत मेंटल ब्लॉक तयार होतो.

पूर्वी ताज सारख्या हॉटेल मधे कोण जात असेल ? त्या वेळचा रीच क्लास जो बहुतांश ब्रिटीश धार्जिणा होता. आपली प्रगती व्हायची असेल तर ब्रिटीशांची शाबासककी मिळावी म्हणून यांच्या एका पिढीने घरी डायनिंग टेबल, कटलरी असं चालू केलं. त्यांचे एटीकेट्स आपलेसे केले. ब्रिटीश गेल्यानंतर ही मंडळी आर्थिक सम्राट झाली. त्यांनी तेच एटीकेटस कायम ठेवले. या वर्तुळात बाहेरच्या कुणाचा शिरकाव होत नव्हता. यांना एलिट क्लास नाव मिळालं. मग हे ब्रिटीशांप्रमाणे इतरांना नावं ठेवणे, नाकं मुरडणे करू लागले. आता यांची मर्जी सांभाळण्यासाठी इतरांनी ते एटीकेट्स आपलेसे केले. तेच सिनेमात आले. मग घरोघरी डायनिंग टेबल्स आले. तरी लोक मांडी घालून जेवतातच. बुफे हा एक प्रकार, उभ्याने जेवण करणं कितपत शास्त्रीय आहे माहिती नाही. पण भयंकर अडचणीचा प्रकार असून तो आपलासा केला. कारण पुन्हा तेच.

या सायकॉलॉजीमुळे फाईव्ह स्टारच्या एटीकेट्स वर शंका घेण हे डाऊन मार्केट आहे असं वाटतं. आता मोठ्या प्रमाणावर मध्यमवर्गीयांकडे पैसा आला आहे. ज्या बाईमुळे वाद उफाळून आला आहे तिच्या कंपनीची व्हॅल्यू २२६ कोटी आणि तिची स्वतःची संपत्ती १२५ यकोटींची आहे. टाईम्स ऑफ इंडीयामधे ती बिझनेस अ‍ॅडव्हायजर आहे, झी मधे ती खूप मोठ्या पदावर आहे. टिव्ही १८ आणि अजून एका वाहिनीत पण ती डायरेक्टर किंवा तत्सम पदावर आहे. तिच्या योर स्टोरी डॉट कॉम वर आंत्र्यप्योनर्सची स्टोरी असते. रतन टाटांनी त्यात गुंतवणूक केली आहे. ती काही गर्भश्रीमंत नाही. असे अनेक लोक आता अशा ठिकाणी जातात. त्यांना हे नियम बिन्डोक वाटतात.

क्राऊन / क्वीन शी निष्ठा हा उल्लेख सापडला नाही. सापडला तर त्यावर पण बोलू.

मानव, तुमचं आपलं काहीही हा!

'इथे नवरा बायको ने कचा कचा भांडू नये' अशी पाटी असते का ? एखाद्या जोडप्याने तसे केले तर त्यांना निघून जा असे सांगतीलच ना ?

१) एखाद्या मराठी मुलाने/ मुलीने राष्ट्रिय स्तरावरचा पुरस्कार मिळवला व तिथे कोल्हापुरी चप्पल घालून स्वीकारला तर मलाही अभिमान वाटेल.

२) तिथे आलेल्या अन्य गिर्‍हाइकांच्या hygienic and aesthetic ambiance च्या हक्काचे काय ?

>>>>>

म्हणजे राष्ट्रीय पुरस्कार समारंभाला जमलेल्या लोकांच्या hygienic and aesthetic ambiance ची काही पडली नाही.

तसेच कोल्हापुरी चप्पल घालणारी व्यक्ती मराठी असेल तर ते अभिमानास्पद कृत्य..त्यात स्टंट नाही. पण ती बाई दिल्लीची होती तर स्टंट.

>>>>>>>म्हणजे राष्ट्रीय पुरस्कार समारंभाला जमलेल्या लोकांच्या
लोक त्या समारंभांना जेवायला येतात, तिथे बसून जेवतात ही नवीनच माहीती कळली मला.

<<<<
तिच्या कंपनीची व्हॅल्यू २२६ कोटी आणि तिची स्वतःची संपत्ती १२५ यकोटींची आहे. टाईम्स ऑफ इंडीयामधे ती बिझनेस अ‍ॅडव्हायजर आहे, झी मधे ती खूप मोठ्या पदावर आहे. टिव्ही १८ आणि अजून एका वाहिनीत पण ती डायरेक्टर किंवा तत्सम पदावर आहे. तिच्या योर स्टोरी डॉट कॉम वर आंत्र्यप्योनर्सची स्टोरी असते. रतन टाटांनी त्यात गुंतवणूक केली आहे.
>>>>

अशी व्यक्ती स्टंट करेल असे वाटत नाही.
तिला असे दुसऱ्या गिऱ्हाईकाच्या सांगण्यावरून हॉटेल मॅनेजर ने हटकने अपमानास्पद वाटले असेल.

लोकं एक व्हिडिओ बघून, एक पोस्ट बघून, एक झलक बघून त्यामागची व्यक्ती कशी आहे हे जज करत सुटतात.

लोक त्या समारंभांना जेवायला येतात, तिथे बसून जेवतात ही नवीनच माहीती कळली मला.
>>>>>

जेवण देतात की नाही माहीत नाही.
पण पाणी तर पित असतीलच ना?

आणि हायजिन जेवतानाच का हवे?
मला झोपतानाही हवे असतेच.
किंबहुना आंघोळ करताना सुद्धा बाथरूम स्वच्छ हवे असते.
नसल्यास आधी मी ते स्वच्छ करतो आणि मग आंघोळीला सुरुवात करतो.

उपहारगृहात गरम वस्तू हाताळल्या जातात. त्या पडून दुखातप होऊ नये म्हणून या आवारात क्लोज्ड टोज शूज घालावे. असं रॅशनेल देऊन एक नियम इथे बालमजुर काम करत नाहीत च्या खाली लिहुन टाका बरं. त्याच बरोबर...
आमच्या खुर्च्यांचे सेंटर ऑफ मास मांडी घातल्यावर बदलते आणि त्यामुळे तुम्हाला, येथील कामगारांना आणि इतर ग्राहकांच्या आरोग्याला धोका पोहोचू शकतो त्यामुळे मांडी घालू नये.
तसेच मांडी घातल्यावर आमच्या खुर्च्या खराब होतात त्यामुळे पायातील कोज्ड टो शूजचा खुर्च्यीच्या बसायच्या भागाला स्पर्ष होणार नाही याची सर्वतोपरी काळजी घ्यावी.
यातील नियमांचे उल्लंघन झाल्यास १ लाख रुपये दंड आणि किंवा त्वरित हाकालपट्टी करण्याचे स्वातंत्र्य प्रशासनाला आहे.
हुकमावरुन.

अहो जरा कॉन्टेक्स्ट मध्ये बोला कधी तरी. हॉटेलात आपण खायला जातो तिथे पादत्राणे खुर्चीवर ठेउन कोणी खात असेल तर हे अनहायजिनिकच आहे.
समारंभांना आपण खायला-प्यायला जात नाही. आणि तिथेही पाय वरती घेउन ब सतच नाहीये कोणी. फक्त पाद्त्राणे घालुन पारितोषिक स्वीकारतायत.

तुम्हाला खात्रीशीर माहीत आहे का - की त्या मुली च्या पायाच्या नखांना 'फंगल इन्फेक्शन' नव्हते? घाणेरडे इन्फेक्शन असते ते. नखे कापताना, अंगठ्याचे मोठे नखच्या नख हातात येते. नखे पिवळी पडतात. पायाला दुर्गंध येते. अणि बरे होण्यास अतिचिवट इन्फेक्शन असते.

चला, दिवाळीचा फराळ संपवायचाय. मांडी घालून मधे फराळ ठेवून सगळे बसून डाऊन मार्केट म म व पार्टी करणार आहोत.
सोसायटीतल्या एलिट क्लासला त्रास झाला तर आम्हाला बाहेर काढतील !

तुम्ही घरात काय वाटेल ते करा. एका ताटात खा का अजुन कसं. सार्वजनिक जागेत जाऊन आम्हाला हवं तेच करू चालणार नाही.

>>>>>>>सोसायटीतल्या एलिट क्लासला त्रास झाला तर आम्हाला बाहेर काढतील !
तुमच्या घरात तुम्ही पादा नाहीतर नांदा. बाहेर सार्वजनिक जागेत कशाला अट्टाहास?

Lol
मी कन्विन्स नाही करतै. तुम्हाला ते नियम बिनडोक वाटत नाहीत हा तुमचा चॉईस आहे. मला ते तसे वाटतात. Happy

चप्पल घालून पुरस्कार स्वीकारणे आणी चप्पल काढून मांडी घालून खुर्चीवर बसणे सेम आहे ?

इथे न्यू जर्सीत काही देवळात मोफत जेवण असते, चप्पल काढून मांडी घालूनच जेवतो मीही. ज्यंना हे आवडत नाही त्यांना न जेवण्याचे स्वातंत्र्य आहेच. आमच्या देवळात चालते , मग इतर सर्वत्र चालवून घ्या हा हट्ट चुकीचा आहे.

Pages