केबीसीमध्ये दोन तीन दिवसापूर्वी एक गुजरातचा मुलगा आला होता जो काही नकारात्मक कारणांनी वेगाने वायरल झाला आहे.
उद्धट, उर्मट, ओवरकॉन्फिडंट म्हणून ट्रोल होत आहे. आई-वडिलांनी दिलेले संस्कार काढले जात आहेत. प्रथमदर्शनी त्याचा शॉर्ट व्हिडिओ पाहिल्यावर माझेही साधारण तसेच मत झाले. पण ठीक आहे, असतात अशी मुले म्हणून पुढे निघून गेलो.
त्यानंतर मात्र दोनेक दिवसात बरेच पोस्ट पाहिल्या ज्यामध्ये तो फार वाईट पद्धतीने ट्रोल होत होता. वाईट वाटले.
आता फेसबुकवर एक पोस्ट पाहिली. त्यात थोडा वेगळा अँगल मांडला होता. वैद्यकीय दृष्टिकोनातून त्याच्या वागण्याचे विश्लेषण केले होते. अर्थात ही फक्त एक शक्यताच होती. प्रत्यक्षात सत्य जे असेल ते असेल..
पण ती पोस्ट वाचून मी मुद्दाम शोधून त्या मुलाचा पूर्ण व्हिडिओ पाहिला.
तुम्ही देखील फक्त शॉर्ट व्हिडीओ पाहिले असल्यास पूर्ण व्हिडिओ जरूर पहा
https://youtu.be/IEijtBQlovA?si=ZnQwP6oURdwX3aYF
दीड दोन मिनिटाच्या शॉर्ट मध्ये त्याचे मोजके संवाद एडिट करून घेतल्याने प्रकरण जितके डेंजर वाटत होते तितकेदेखील नव्हते. पूर्ण व्हिडिओमध्ये त्याच्यातील काही चांगल्या सवयी देखील जाणवल्या. जसे की फास्टेस्ट फिंगर फर्स्ट मध्ये जिंकून हॉट सीटवर बसायला आल्यावर पाया पडून देवाचे आभार मानणे. शांत असतानाचे त्याचे हास्य निरागसच भासले. आणि हरल्यावर आता पैसे मिळणार नाहीत या दुःखापेक्षा आता अमिताभ बच्चन सोबत फोटो काढायला मिळणार नाही याचे त्याला जास्त दुःख झाले.
आधी तो जे प्रसंगी अमिताभासारख्या जेष्ठ व्यक्तीचा अनादर करून बोलत होता ते शेवटच्या क्षणाला बिलकुल जाणवले नाही.
उलट मला त्या मुलावर आणि त्याच्या पालकांवर तोंडसुख घेणारी माणसे चूकीची वाटू लागली. जर त्या मुलावर योग्य संस्कार झाले नसतील तर त्याच्या बालमनावर काय परिणाम होईल याचा विचार न करता त्याला सोशलमीडियावर नावे ठेवणारी माणसे तरी मग कशी सुसंस्कृत म्हणावीत?
अर्थात यानिमित्ताने पॅरेंटिंग कशी असावी यावर देखील चर्चा सुरू झाल्या आहेत. त्या योग्य भाषेत आणि त्या मुलाला टार्गेट न करता असतील तर त्यावर बिलकुल आक्षेप नाही. त्यांचे स्वागतच राहील. या निमित्ताने त्या व्हाव्यात. कारण आताची पिढी आणि आधीची पिढी यातील जनरेशन गॅप कमालीचा मोठा आहे. आधीच्या तुलनेत मुलांना सूट देण्याचे प्रमाण जसे वाढले आहे, तसे ते खटकणारे देखील बरेच आहेत जे सारे या मुलाच्या निमित्ताने रिंगणात उतरले आहेत असे बरेच पोस्ट पाहून वाटल्या.
मलाही साधारण याच वयाची मुले असल्याने या विषयावर चर्चा करायला आणि त्या मुलाला कोणी टारगेट करताना दिसले तर त्यांना समर्थन देऊ नका ही विनंती करायला हा धागा.
व्हिडिओ दिसत नाहीये. अन-
व्हिडिओ दिसत नाहीये. अन- अव्हेलेबल आहे.
मला दिसत आहे.
मला दिसत आहे.
kbc boy controversy असे सर्च करून इतर व्हिडिओ मिळवू शकता. पण त्यानंतर शक्य झाल्यास पूर्ण व्हिडिओ कुठे मिळतो का हे देखील बघा.
मग अमेरिकेत दिसत नसेल.
मग अमेरिकेत दिसत नसेल.
>>>>>>जिंकून हॉट सीटवर बसायला आल्यावर पाया पडून देवाचे आभार मानणे.
चांगली सवय म्हणावे की उदासीन असावे की वाईट सवय म्हणावे याबद्दल मतमतांतरे असू शकतात.
------------
१० वर्षाचे पोर आहे ते. किती चॅनल्स, कंटेंट क्रिएटर्स दाखवतायत त्याला. कशाला मागे लागलेत. लीव्ह हिम अलोन.
त्याच्या पूर्ण
त्याच्या पूर्ण प्रश्नोत्तरांचा व्हिडीओ युट्युबवर दिसला तरी नाही. ज्या काही क्लिप्स दिसल्या त्यात तरी तो थोडा ओव्हर कॉन्फिडंटच वाटला. हल्लीची मुलं असतीलही अशी. काही कल्पना नाही. त्याला ADHD असावा असंही वाचलं कुठेतरी.
(No subject)
तो मुलगा आगाऊपणा करत होता आणि
तो मुलगा आगाऊपणा करत होता आणि त्यावर त्याचे आई वडील हसत होते.
कौशल इनामदारांनी लेख लिहिलाय त्यात ADHD ची शक्यता वर्तवली आहे. परंतु त्याला काही behavioural issues asu शकतात.
त्याचं वागणं नॉर्मल नाही वाटत हेही खरंच.
मलाही असं वाटल की त्या लहान मुलाच्या काय इतक मागे लागतायत..
पण एक गोष्ट अशीही आहे की आई वडील मुलांना एव्हढ्या मोठी प्लॅटफॉर्म वर पाठवतात ( किती तरी वेळा हट्टाने) त्या सगळ्या खटाटोपात ती मुलं त्यांचं बालपण हरवून बसतात.. काही कुठे वावग घडलं की लोकं/ मिडिया कोणी मग हयगय करत नाहीत मग.
एकदा मला वाटलं की त्या मुलाला मुद्दाम तसे वागायला तर सांगितले नसेल... Just to spice up the things.
आजकाल किती चॅनल्स वर पण ही अशी छोटी मूळ येतात, त्यांचा वारेमाप कौतुक वाहिन्या करवून आणतात, मग कधी त्याच्या / आणि पालकांच्या डोक्यात हवा जाते.. मग हेच लोकं त्यांचा उपयोग सरला की त्यांना बाजूला करतात.. दुसर कोणी गाठतात.
यात किती टीआरपी, किती
यात किती टीआरपी, किती पब्लिसिटी स्टंट, किती मार्केटींग माहित नाही. पण तो जन्मजात आगाऊ असेल आणि पालकांनी सो कॉल्ड स्मार्टनेस नावाखाली खतपाणी घातलं असेल तर नो सिंपथी अॅट ऑल.
सध्याच्या एका डान्स शो मधे असंच एका (बोलण्यात) आगाऊ मुलीला - माझे फॉलोअर्स इतकेच आहेत (मग सेलेब्रिटींना तुम्ही माझ्याबरोबर रील करा मग अजून वाढतील वगैरे भीक मागताना पाहिलं - वय वर्ष ७-८) डिजिटल भीका...लोल्झ... कीवच आली सगळ्या शो ची.
असल्या चीप गोष्टींमुळे बघायचे सोडून दिले रिअॅलिटी शोज! मुठभर जेन्युईन कस्टमर गेले तरी त्यांना काय फरक पडणार म्हणा! जाऊदे झालं!
शो ऑफ की दुनिया है जिनको देखना है देखते रहो!
रिअॅलिटी शोज (अमेरिकन)
रिअॅलिटी शोज (अमेरिकन) बघीतलेले आहेत. भारतिय नाही. पण एकंदर अग्ली अग्ली असतात. खालच्या थरावर पॉलिटिक्स व ड्रामाबाजी चालते. ट्रॅशी करमणूक.
ऋन्मेष अवांतर आहे नसेल चालत तर सांगा, काढून टाकेन. आजकाल थोडं ही अवांतर करण्याचा धसका घेतलाय कोण उठुन चिडेल सांगता येत नाही.
जर लहान मुलांच्याच संदर्भाने
जर लहान मुलांच्याच संदर्भाने बोलत आहात तर अवांतर नाही. धागा मुलांचे संगोपन ग्रूप मध्ये काढला आहे. शुभरात्री.
फक्त over confident नाही अगदी
फक्त over confident नाही, आगाऊ आणि उद्धट वाटतो. कसं वागावं बोलावं न शिकवलेला/शिकलेला वाटतो
हां आत्ता बुद्धीबळातल्या
हां आत्ता बुद्धीबळातल्या राजापर्यंतचा एपिसोड पाहीला. अगदी नॉर्मल वाटला. feisty, impatient, बालिश बस्स. काय आहे यात टिका करण्यासारखं?
हं 'अयोद्धा कांड' ला अमिताभच्या अंगावरती, जरा ओरडत होता तो
पण त्याला, मिसेस इनामदार म्हणतात तसे एडीचडी असावीही. शक्य आहे. लक्षणं माहीत नाहीत मात्र.
लोक म्हणतायत, “अमिताभनं किती
लोक म्हणतायत, “अमिताभनं किती शांतपणे परिस्थिती हाताळली!”
Come on- तो जयाबच्चनसोबत राहतो रे बाबा
मी तिन मुलांचे एपिसोड पाहिले.
मी तिन मुलांचे एपिसोड पाहिले. त्यांच्या तोंडचे संवाद ९-१० वर्षांच्या मुलांच्या रोजच्या बोलण्यात असतील तर मी असे छापिल सम्वाद बोलणारी मुले आजवर पाहिली नसल्याने मला हा शो स्क्रिप्टेड वाटला.
एकच उदाहरण देते. अरुणोदय नावाचा ९ वर्षांचा मुलगा त्याने २-३ लाईफलाइन वापरल्या ह्या कंमेंटवर म्हणतो की ये तो युज करनेके लिये दी है, सजाके रखनेके लिये नही. मग काही क्षण थांबुन बोलतो की मैने कहा ये युज की वो आप देख रहे हो, मैने कहा युज नही की वो आपने देखाही नही. काय अर्थ आहे या वाक्याचा? त्या मुलालातरी कळला असेल का? तिनही मुलांच्या प्रत्येक वाक्याला अमिताभचा कपाळबडवंती योग आणि प्रेक्षकांच्या जोरदार टाळ्या. बाकी कार्यक्रमात लोकांना टाळ्या वाजवा म्हणुन सांगावे लागते. इथे न बोलता नुसत्या धुवांधार टाळ्या…
या अरुणोदयच्या एपिसोडखाली किती संस्कारी आहे वगैरे कमेंटी आहेत. या मुलाने स्वतःच्या उंचीबद्दल बोलताना दोन उदाहरणे दिली. एकात तो म्हणतो माझा घरातील आउदा/हौदा (मला शब्दच कळला नाही, बहुतेक स्टेटस या अर्थाचा हिंदी शब्द) इतका लहान आहे की घरातला कुत्राही माझ्यापेक्षा एक वर्षाने मोठा आहे. (इतका लहान आहे हे शब्द तिनदा रिपिट केले). याचा उण्चीशी काय संबंध?? दुसर्या उदाहरणात बसने प्रवास करताना तो चार वर्षांचा आहे असे सांगुन आजीने हाफ तिकिट घेतले. बहुतेक राज्य सरकारच्या गाड्यांमध्ये ५ पर्यंत नो तिकिट व १२ पर्यम्त अर्धे तिकिट अशी सोय आहे.
गुज्जु इशित भट्टच्या एपिसोडसाठीच्या फास्टेस्ट फिन्गर्सआधी अमिताभ म्हणतो की अच्छा हुवा जानवीसे छुटकारा मिल गया, कितना बोलती है… नंतर जानवी नावाच्या मुलीचा एपिसोड पाहिला. तिच्या तोंडी अरुणोदयला दिले होते त्याच्या निम्मेही संवाद नव्हते. आणि या आधी इतक्या वर्षात अमिताभने कुठल्याही स्पर्धकाबद्दल असे काही बोलल्याचे ऐकले नाही.
रिअॅलिटी शो ‘रियल’ असतात असं
रिअॅलिटी शो ‘रियल’ असतात असं मानणंच भाबडेपणाचं आहे.
जिथे अमिताभच्या जवळ जायला, फोटो काढायला सुद्धा परवानगी लागते तिथे ह्या लहानग्या मुलाचं वागणं स्क्रिप्टेड नाही ह्यावर विश्वास ठेवणं कठीण आहे.
रिअॅलिटी शो ‘रियल’ असतात असं
रिअॅलिटी शो ‘रियल’ असतात असं मानणंच भाबडेपणाचं आहे>>>
मुलांना असे वापरुन घेणे अमानुषपणाचे आहे. अनरियल, एडिटेड शो आहे हे बघतानाही कळते. पण मुलांना असे वापरता आणि पालक वापरु देतात हे भयंकर आहे. इशित भट्टला सोमि सोडाच, त्याच्या शाळेत किती त्रास होईल हा विचार आईबाबांनी करायला हवा ना..
आईबाबांना माहित आहे सगळे. अरुणोदयचा घरचा विडिओ दाखवला. त्यात आईबद्दल तिच्यासमोर तो जे बोलतो ते ऐकुन कुठल्याही आईने प्रेमाने एक हलकी चापट मारली असती, इथे आईला संवाद ऐकुच गेला नाही
आई ज्वालामुखी आहे, कधीही फुटु शकतो असे काहीतरी तो बोलला आणि आई त्याचे केस विंचरतेय इतकी जवळ आहे असा शॉट आहे.
शो स्क्रिप्टेड आणी व्यवस्थित
शो स्क्रिप्टेड आणी व्यवस्थित एडीटेडच आहे पण तरी मुलाकडून सवान्द वैगरे म्हणूवुन घेतले अस वाटत तरी नाही
पण ऑडिशनला आल्यावर या मुलाचा ओव्हरकॉन्फिडन्स/हायपर्नेस नोटिस केला असणार...तो चॅनेलने एनकॅश करायला बरोबर हॉटसिटवर बसवल..सगळच त्याच्याच हातात आहे ना?
याच मुलासारखाच अजुन एका मुलाचा व्हिडीओ पण कूणीतरी शोधुन व्हायरल केलाय त्यात तर पॅरेन्ट्स मुलगा चुकल्यावर खुपच अपसेट होवुन रिअॅक्ट करतायत...
पण ज्या पद्धतिने लोकानी त्या मुलाला ट्रोल केलय ते माझ्यामते तरी खुप हार्श आहे...चुका होत नाहित का कूणाकडून?
फक्त त्या चव्हाट्यावर येत नाहीत..त्या मुलाला पुढच आयुष्य आहे...पब्लिक मेमरी शॉर्ट असते तरी शाळा, स्वतःपुरत सर्कल कुणाला चुकलय.
चॅनेल एपिसोड वगळतिल कशाला?मुलाना अशा शोज ला एक्स्पोज करण्याची किमत असते ती पॅरेन्ट चुकवतायत का?
कम ऑन ! आर डी एक्स घरात सापडून, ड्रग्जच्या आहारी उघड उघड जावुन , अगणित भानगडी केलेला हिरो ठरतो...मुन्नाभाई म्हणुन मिरवतो..त्याच्यावर मुव्हि निघतो तो दणकून चालतो...म्हणजे त्याला हिरो मानणारे आहेत.
हा तर छोटा मुलगा आहे १० वर्शाचा...होप त्याचे पॅरेन्ट्स आणी इतरही पॅरेन्ट्स यातुन योग्य धडा घेतिल.
जगजेत्त्याला बुद्धीबळ स्पर्धेत हरवुन अतिशय शान्तपणे रिअॅक्ट होणारा गुकेश आपल्याच भारतातला आहे..
मी ही पाहिला तो व्हिडीओ. तो
मी ही पाहिला तो व्हिडीओ. तो मुलगा हरल्या वर हुश्श झालं. उर्मटपणा फार जाणवला, कारण तो अमिताभ ना धड पर्याय पण पुर्ण वाचू देत नव्हता. किती किम्मतीचा प्रश्न आता येत आहे, ते होस्ट बोलत असताना ही त्याला अजिबात पेशन्स नव्हता.
स्क्रिप्टेड असूच शकते पण त्या आई बाबांना किती काळ ट्रोलींग सहन करावे लागेल आता असे वाटले
जगजेत्त्याला बुद्धीबळ
जगजेत्त्याला बुद्धीबळ स्पर्धेत हरवुन अतिशय शान्तपणे रिअॅक्ट होणारा गुकेश आपल्याच भारतातला आहे..>>>> ज्जे ब्बात!
बाकी सर्व ठीकच माझी कमेन्ट
बाकी सर्व ठीकच माझी कमेन्ट फक्त ड्रग्स च्या आहारै जाण्याबद्दल अहे - व्यसनाधीनता ही एक मानसिक व्याधी आहे. त्यावर बरेच संशोधन होत असते - तिचे जेनेटिक अॅस्पेक्टस वगैरे. व्यसना वरुन माणसाला जज करु नका.
व्यसन ही मानसिक व्याधी आहे.
व्यसन ही मानसिक व्याधी आहे. व्यसनावरुन माणसाला जज करु नका. >>
मला एक काळी निकोटिनचे व्यसन होते. व्यसनापायी मानसिक संतुलन बिघडले, हे समजू शकतो. पण मानसिक व्याधी आहे म्हणून कुणी व्यसनी झाला असे माझ्यातरी बघण्यात कुणी नाही. त्यामुळे कुठलेही व्यसन वाईटच असे म्हटले जाते, मग ते व्यसन ड्रग्सचे असो, दारू - सिगारेटचे असो, अति खाण्याचे किंवा अति शॉपिंग करण्याचे असो.
मानसिक व्याधीमुळे व्यसनाकडे
मानसिक व्याधीमुळे व्यसनाकडे माणूस जातो असे नाही म्हटलेले. व्यसनाधीनता हीच एक मानसिक व्याधी आहे असे म्हटलेले आहे.
Yes, addiction is considered a mental health disorder. It is classified as a substance use disorder (SUD) in the Diagnostic and Statistical Manual of Mental Disorders (DSM-5). Addiction is characterized by: Compulsive substance use despite negative consequences, Loss of control over substance use, Tolerance and withdrawal symptoms, and Changes in brain chemistry and function.
हे ए आयचे आऊटपुट.
मग अश्या परिस्थितीत मानसिक
मग अश्या परिस्थितीत मानसिक व्याधी असलेल्या रुग्णाने डॉक्टरकडे जावे. तुमचा आक्षेप काय आहे? (अवांतराबद्दल क्षमस्व)
स्क्रिप्टेड किंवा घडवून
स्क्रिप्टेड किंवा घडवून आणलेले वाटत नाही. अमिताभ अश्या काही प्रकारात सामील होईल असे वाटत नाही.
पण तसे असल्यास दुर्दैवी आहे. केबीसी टीम मधील जे जे यात सामील असतील ते सारेच अपराधी म्हणायला हवेत. कारण एकीकडे अमिताभ आणि केबीसी टीम त्या मुलाला कसे शांतपणे हँडल केले म्हणून कौतुक मिळवत आहे जे स्क्रिप्टेड असल्यास खोटे ठरेल. तर दुसरीकडे तो मुलगा आणि त्याचे आईबाप यांना स्क्रिप्टेड असण्याची कल्पना असो किंवा नसो पण यातून होणाऱ्या परिणामांची कल्पना तरी नक्कीच नसेल ते आता त्रास सहन करत आहेत.
हे सगळे स्क्रिप्टेड असेल असे
हे सगळे स्क्रिप्टेड असेल असे वाटत नाही कारण या एपिसोडचे शुटींग सुरू होते तेव्हा आम्ही तिथे प्रेक्षक म्हणून उपस्थित होतो. जेव्हा या मुलाचा टर्न आला आणी हि सगळी प्रश्न उत्तरे सुरू होती तेव्हाच आम्ही अवाक झालो होतो हा कसा बोलतोय ते.
त्याच्या आईने सांगीतले कि तो खुप हुशार आहे. हे मेन एपिसोडमध्ये दाखवले नाही.
त्याचे सिलेक्शन होण्याआधी भूक लागलेली त्याला. मग शुटींग मध्ये ब्रेक घेतला तेवढ्यासाठी.
तिथला क्रु फार काळजी घेत होते मुलांची, फ्रेंडली वागत होते.
कदाचित म्हणून मुलांना काही टेन्शन, प्रेशर नसेल आणी ती मोकळेपणाने वागत होती.
या मुलाचे आई वडीलही अगदी साधेच होते.
तरीही काही वाक्य एडिटींग मध्ये कट करता आले असते. याच्या आधी आलेल्या मुलीने पण फार गप्पा मारल्या अमिताभ सोबत. ब्रेक मध्ये पण त्यांच्या गप्पा सुरूच होत्या. तिच्या बर्याच गप्पा कट केल्या आहेत.
तिनही मुलांच्या प्रत्येक वाक्याला अमिताभचा कपाळबडवंती योग आणि प्रेक्षकांच्या जोरदार टाळ्या. बाकी कार्यक्रमात लोकांना टाळ्या वाजवा म्हणुन सांगावे लागते. इथे न बोलता नुसत्या धुवांधार टाळ्या…>>>>>>>>
तिथे प्रेक्षकांना एवढीच सुचना असते...टाळ्या वाजवा:)
मला असे वाटते की हा मुलगा
मला असे वाटते की हा मुलगा थोडा फनी, entertaining बनण्याचा प्रयत्न करत होता असे वाटले. ओव्हरकॉन्फिडन्ट होता , घाई करत होता पण मुद्दाम नसेल. स्टँडअप कॉमेडियन विशेषतः नॉर्थ इंडियन्स असेच थोडे उध्दट सारखे बोलतात. ते विनोद म्हणून घेतले जाते. हा मुलगा बहुधा तसेच बोलण्याचा प्रयत्न करत होता . कदाचित मी चुकीची असेन पण इतके टोकाचे ट्रोल करण्यासारखे पण वाटले नाही. Leave him alone now
मला असे वाटते की हा मुलगा
डबल पोस्ट
तेव्हा आम्ही तिथे प्रेक्षक
तेव्हा आम्ही तिथे प्रेक्षक म्हणून उपस्थित होतो..
>>>>
ग्रेट.. आम्हा इतरांच्या अंदाज बांधलेल्या पोस्टपेक्षा तुमची घटनास्थळी उपस्थित असलेल्यांची पोस्ट विशेष वाटली.
ते विनोद म्हणून घेतले जाते.
ते विनोद म्हणून घेतले जाते. हा मुलगा बहुधा तसेच बोलण्याचा प्रयत्न करत होता.
>>>>>>>>
हो, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. इन्फ्ल्युइंस होतो. शिंचन किंवा ऑगी अँड कॉकरोच मधील कॅरेक्टर सारखे बोलणारे बरेच असतात. बरेचदा ते विनोदी सुद्धा वाटतेच.
बरीच मुले घरी पालकांशी बिनधास्त फ्रेंडली बोलतात. बाहेर पालकांशी बोलताना किंवा इतरांशी बोलताना काय टाळावे हे लहान मुलांना पटकन समजत नाही. माझ्याशी घरी असताना तू कसाही बोल पण बाहेर असताना शिस्तीत बोल असे सांगून लहान मुलांना कन्फ्युज करावेसे वाटत नाही. ते त्यांना वय आल्यावर आपसूक समजते. बरेचदा आपल्याला जे उद्घट वाटते ते त्यांच्यासाठी फनी असते आणि ज्याच्याशी ते बोलत असतात त्यांच्याबद्दल मनात आदरच असतो. वेळ मिळाल्यास यावर स्वतंत्र सविस्तरपणे लिहायला आवडेल.
खरडवहीत बोलू यात उबो. धन्यवाद
प्लीज खरडवहीत बोलू यात उबो. धन्यवाद.
छोटी क्लिप बघून तो मुलगा
छोटी क्लिप बघून तो मुलगा उर्मट, उद्धट. ओवरकॉन्फीडन्स असणारा वाटला. अमिताभ यांच्याशी बोलतानाही तसंच वाटलं पण मला वाटतंय की त्याची शिक्षा (एक धडा जास्त योग्य शब्द) त्याला लगेच मिळाली. जर त्याला काही मेडीकल इश्युज नसतील तर हा धडा आहे त्याच्यासाठी. त्याने आणि त्याच्या पॅरेंटसनी विचार करावा. मेडीकल इश्युज असतील तर योग्य मार्गदर्शन घेऊन औषधोपचार करावेत.
मी पुर्ण बघितलं नाहीये आणि जजही करत नाहीये. स्क्रीप्टेड वगैरे असेल तर चुकीचं आहे.
आधीचं सवडीने वाचते.
Pages