आधुनिक प्रगतीने मानवी पंचेन्द्रियांचा ऱ्हास?

Submitted by ब्लू कोलंबसे on 19 October, 2025 - 05:10

आपल्याला (आणि मला) डोळे, कान, नाक, जीभ (तोंड) व त्वचा अशी पंचेंद्रिये आहेत. जन्मापासून यांचे महत्त्व अध्यात्मात व विज्ञानात मी ऐकत आलो आहे. मात्र post internet व smartphone era, यांचे वापर कमालीचे वाढलेले मला दिसतात.

म्हणजे जिथून analogue life संपून digital life सुरु झाली, तिथून पंचेंद्रियांमधील समतोल ढासळला, असे मला वाटते. जगात व कालांतराने भारतातही २० व्या शतकातील विज्ञान, तंत्रज्ञान, अधुनिकीकरणासाठी आवश्यक सुविधा यांचा गणित व भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र यांच्या मदतीने उच्चतम विकास केला गेला. (आकाश चटके - Facebook post pdf - link)

यामुळे माणसाचे जीवन सुखकर, सुरक्षित व कमी श्रमाचे झाले खरे, मात्र माणसाच्या पंचेंद्रियांच्या ऱ्हासाला ते कारणीभूत ठरू लागले. ते कसे?

युवाल नोआह हरारी म्हणतो, त्याप्रमाणे माणूस नवनव्या गोष्टी invent तर नक्की करू शकतो, पण तो त्या manage करू शकत नाही. (संदर्भ: Book: Preface; 21 Lessons for 21st Century by Yuval Noah Harari) हे मला मानवी वर्तनाचे सखोल अभ्यासानंतर केलेले मुलभूत विधान वाटते, कारण याला पुष्टी देणाऱ्या अनेक घटना उत्तर-आधुनिक काळात घडल्या आहेत. दुसरे महायुद्ध, पूर, धरण फुटणे, अण्वस्त्रांचा विघातक वापर, आवाजाची उच्च डेसिबल पातळी, सर्व प्रकारचे प्रदूषण इत्यादी.

या सर्वाचा आपल्या पंचेंद्रियावर कसा परिणाम झाला ते सांगतो.

आधुनिक गाड्यांचा जन्म १९३० चा! तेलाचा शोध लागल्यानंतर वेगाने इच्छित स्थळी नेणाऱ्या गाड्या, तसेच ट्रेन, प्लेन इत्यादीमुळे माणसाच्या नाकावाटे शरीरात जाणाऱ्या धुराचे प्रमाण वाढून नवे शरीरधोके, आजार उत्पन्न झाले. याच वाहनांचे आवाज रस्त्यावरून वाढत गेल्याने पंचेंद्रियातील कानाला होणारा त्रास वाढला. पुढे तांत्रिक प्रगतीमुळे फ्रीजमध्ये अन्न दीर्घकाळ साठवणे सोपे झाले, परंतु जिभेची नैसर्गिक, ताज्या चवीची- आदिमकाळ ते १९व्या शतकापर्यंतची सवय व healthy system मोडीत निघाली. दुसऱ्या महायुद्धात सर्वच संपन्न राष्ट्रांनी युद्धासाठी आपापल्या देशातल्या हुशार शास्त्रज्ञांना वेठीस धरत, टिकणारे, फ्रोझन पदार्थ, जवानांना वेगाने वाहून नेणार वाहन प्रकार, माहितीचे वेगाने संदेशवहन करणारे E-Devices यांचे लवकरात लवकर व अचूक शोध लावण्यास प्रवृत्त केले! यातून युद्ध करताना त्या-त्या देशांना फायदा झालाच व नंतर सामान्य लोक या तंत्रज्ञानास आहारी जाण्याची परिस्थिती निर्माण केली गेली. कोणी केली, तर या शोधातून तयार झालेले प्रोडक्ट विकणाऱ्या कंपन्यांनी! युद्धोतर काळात गिऱ्हाईक शोधणाऱ्या कंपन्यांनी जाहिरातबाजीच्या माध्यमातून सामान्यांना या नव-शोधाचे व्यसन लावण्यास सुरुवात केली. नफेखोरी - भांडवलशाही - ग्राहकवाद - चंगळवाद - जाहिरातबाजी - तंत्रज्ञान प्रसार - जागतिकीकरण असा हा प्रवास २०व्या शतकाच्या उत्तरार्धापासून हर एक इंद्रियास मारक ठरला.

युद्धोतर काळी कंपन्यांचे नैसर्गिक साधनसंपत्ती वापरत, देश-सरकारपेक्षा 'मोठे' होणे मानवी जगण्याच्या नैसर्गिक जीवनशैलीस आव्हान देणारे ठरले. औषधे, वैद्यकीय सुविधांचा, सैनिकांचे प्राण वाचवण्यासाठी व नंतर मानवी आयुष्यकाल दीर्घ करण्यासाठी उपयोग झाला खरा*, पण या दीर्घायुष्यात पंचेंद्रियाचा ऱ्हास करत त्याच आधुनिक विज्ञानाची मदत घेण त्यानेच तयार केलेल्या समस्यांचा सामना मानव आज करत आहे. रसायनांच्या माऱ्यामुळे (कंपन्यांची lifestyle easy करणारी उत्पादने; पाण्याचा वारेमाप वापर करत तयार करणे, Frozen food, fridge यासाठी वापरली जाणारी रसायने) माणसाच्या अन्न्ग्रहानातून रसायने पोटात जाऊन नवनवे आजार उद्भवले, जें या पंचेंद्रियांना औद्योगिकीकरणाआधी माहितच नव्हते. (उदा. पाऱ्याच्या सेवनाने बाधित मासा खाऊन होणारा जपानमधील मिनामाटा हा नव-आजार)! त्वचा या पंचेद्रियांपैकी एका इंद्रियावर अशा प्रकारे या आधुनिक काळात घाला पडला.

आत्तापर्यंत आपण मानवी पंचेंद्रियातील ४ प्रमुख इंद्रियांवर (कान, नाक, त्वचा, जीभ) झालेला परिणाम पहिला.

Analogue काळातून Digital काळात प्रवास करताना माणसाच्या डोळ्यांवर प्रथमच आधुनिक प्रगतीचा विपरीत परिणाम होताना आपण आज अनुभवत आहोत. साधारण १९६५ मध्ये गणित, विजेवर चालणारी उपकरणे आणि नैसर्गिक खनिजे यांचा वापर करत स्क्रीनधारी संगणक जगात निर्माण झाले. Slow life ची fast life करण्याचा चंग बांधलेल्या काही मंडळींनी वेगवान नफेखोरी करणाऱ्या कंपन्यांच्या R&D Departmentला उत्तेजन देत संगणक, PC, पेजर, मोबाईल, स्मार्टफोन, tablet अशी e-devices जगात आणत 'संपर्क क्रांती'चा प्रारंभ केला.

मात्र यामध्ये, मागे युवालने म्हणल्याप्रमाणे ' माणूस नवनव्या गोष्टी invent करू शकतो, पण त्याचा वापर manageकरू शकत नाही', हे पुन्हा एकदा यानिमित्ताने सिद्ध झाले. संपर्काने सोय झाली खरी, मात्र post 4G(आता internet हेही US armyने शीतयुद्धात develop केलेलं तंत्रज्ञान) काळात संपर्कापलीकडे डिजिटल समाज माध्यमांनी व दृक्श्राव्य भडीमाराने कान व विशेषतः डोळे हा महत्त्वाचा, नाजूक अवयव सध्या सर्वाधिक भरडला जातोय, यात शंका नाही.

मानवी सुखसोयी व सुखी आयुष्याच्या हव्यासात आपल्या मुलभूत पंचेद्रियांवर होणाऱ्या विपरीत परिणामांचा हा आढावा!!

या लेखांबाबत आपल्या प्रतिक्रिया किंवा इतर मतमतांतरे असल्यास आपण व्यक्त करू शकता. महाराष्ट्राला विचारवंतांची परंपरा असल्याने नवनवे विचार येणे व त्यांचा अत्यंत खिलाडूवृत्तीने स्वीकार करणे मला नेहमीच आवडेल व त्यातून नवे दृष्टीकोन निर्माण होतील यात शंका नाही.

Group content visibility: 
Use group defaults