सोशल मीडियावर गेले दोन दिवस या चर्चेने जोर धरला आहे.
एक महिला सलवार कमीज आणि कोल्हापुरी चप्पल या पेहरावात ताज हॉटेलमध्ये जेवायला गेली. तिथे एका खुर्चीत माय लाईफ माय कम्फर्ट म्हणत मांडी घालून जेवायला बसली. ते पाहून ताजच्या मॅनेजरने तिला हटकले. इतर ग्राहकांना याचा त्रास होत आहे सांगून तिला तसे बसण्यास मनाई केली. तिच्या कोल्हापुरी चप्पलवर सुद्धा कॉमेंट केली.
तिने या सगळ्याचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर अपलोड केला आणि त्यावर दोन्ही बाजूने घमासान चर्चा होत आहे.
सविस्तर बातमी ललनटॉप वर इथे बघू शकता.
https://youtu.be/h-Cme3L3aTw?si=ScpSSvBxSLRJSE5O
त्या महिलेचा ओरिजनल व्हिडिओ इथे बघू शकता.
https://youtube.com/shorts/oBOjfrM6xsk?si=NkbdeQnDi9RiAH-8
वादाला दोन बाजू आहेत.
पहिली बाजू –
जर एखादा ग्राहक पादत्राणे काढून मांडी घालून खुर्चीत जेवायला बसत असेल, जेवतानाची ती पोजिशन त्याला कंफर्टेबल वाटत असेल तर त्यात गैर काय आहे? त्याला तो हक्क मिळायला नको का?
काहींची उंची कमी असल्याने पाय खाली टेकत नाहीत किंवा ताणले जातात आणि पोजिशन अजून अनकंफर्टेबल होते त्यांना मांडी घालून बसायचा पर्याय एखादे फाईव्ह स्टार हॉटेल देऊ शकत नसेल तर काय फायदा पैसे खर्च करायचा?
काहींच्या मते पादत्राणे काढले तरी पाय बसायच्या सीटवर ठेवणे चूकच. पण मांडी घालून बसतो तेव्हा पायाचे तळवे आडवे होतात आणि ते सीटवर टेकवले जात नाहीत असे एक निरीक्षण.
आणखी एक भावनेला हात घालणारा मुद्दा म्हणजे मांडी घालून जेवायला बसणे ही भारतीय बैठक आहे. भारतीय परंपरा आहे. आज यालाच भारताच्या एका मोठ्या हॉटेलमध्ये हे एटीकेट्समध्ये बसत नसल्याचा शिक्का मारला जातोय हे दुर्दैवी आहे.
जर ती महिला बडे बाप की बेटी किंवा एखाद्या मोठ्या राजकीय घराण्यातील असती तर...
दुसरी बाजू -
तुम्ही ज्या जागी जाता तिथले नियम तुम्हाला पाळावे लागतात. ते पाळू शकत नसाल तर तिथे जाऊच नये.
अर्थात असे नियम तिथे लिखित स्वरूपात आहेत की नाही याची कल्पना नाही. तसेच त्या नियमांची ग्राहकांना आधीच कल्पना देण्यात येते का याचीही मला कल्पना नाही.
पण एखादी खाजगी जागा आपले शिष्टाचाराचे नियम लाऊ शकते हा मुद्दा काही अंशी पटतो.
मी काही अंशी म्हटले आहे कारण मनाने मला पहिलीच बाजू जास्त जवळची वाटते.
सार्वजनिक जागी तारतम्य बाळगावे हे माझेही मत आहे. पण मांडी घालून बसणे हे तारतम्य सोडून वागणे मला वाटत नाही. अर्थात याबाबतीत काय चूक आणि काय बरोबर हे आपण ज्या वातावरणात वाढलो, आणि ज्या निकषांची फुटपट्टी लाऊन जगलो त्यावर बरेचदा अवलंबून असते. त्यामुळे कित्येकांना हे मॅनर्सलेस वाटू शकेल. पण तटस्थ दृष्टीने पाहता जी आपली मूळ परंपरा आहे तीच आधुनिक एटीकेटच्या निकषावर चुकीची ठरते याचा खेद हा वाटतोच.
असो, काहीना हा एकूणच त्या महिलेचा स्टंट वाटत आहे. तिने जाणून बुझून वाद होईल हे बघितले असेही काही म्हणत आहेत.
असेलही.
हल्ली काहीही शक्य आहे. पण ताज मॅनेजमेंटने घेतलेला आक्षेप तर खरा होता.
जर तो तुमच्या बाबतीत घेतला गेला असता तर तुम्हाला तो खटकला असता का?
तुम्ही ताजमध्ये जेवायला गेले असताना तुमच्या शेजारच्या टेबलवर कोणी खुर्चीत मांडी घालून जेवायला बसले असते तर तुम्ही स्वतः त्यावर आक्षेप घेतला असता का?
बऱ्याच high end हॉटेल मध्ये
बऱ्याच high end हॉटेल मध्ये त्यांचा ड्रेस कोड (hi ) असू शकतो/असतो.
Shoes/tie required/ no flip flops etc त्यांचा खाजगी व्यवसाय असल्याने ते ठराविक गोष्टींवर निर्बंध घालू शकतात ( कायद्यानुसार).
जाताना/ गेल्यावर त्यांचे काही नियम किंवा संकेत असतील तर ते सांभाळायला हवेत.
कित्ती तरी ठिकाणी right to decline service अशी पती ही असते.
आपल्याला पटत नसेल तर तिकडे जाऊ नये. जिथे /जे करताना आपण कंफर्टेबल असतो तेच करावं.
अवांतर
अवांतर
मामदनी (Nyc चा मेयरल उमेदवार आहे) काही दिवसांपूर्वी हाताने डाळ भात खातो म्हणून बराच ओरडा झालेला ऐकला.
किंवा
विवेक रामस्वामी त्याच्या स्वतःच्या च घरात मुलाखतीला पायात shoes n घालता आला म्हणूनही बरीच ओरड झालेली.
आता ह्या दोन्ही ठिकाणी ते त्यांना comfortable/ त्यांच्या संस्कृतीत बसणारे होते.. पण ते ज्या समाजात वावरतात ( एक तर पब्लिक फिगर आहेत) त्यांना रुचणारे नाही.
आपल्याला हवे ते करायचे तर त्याचे पडसाद/ प्रतिसाद झेलण्याचीही
तयारी लागते
काहीच समजत नाहीत असल्या
काहीच समजत नाहीत असल्या गोष्टी. फीड वर बरंच नियंत्रण आणलं आहे सध्या.
माझी शंका - जुन्या भादंवि मधे ग्राहकाला त्याच्या वागणुकीवर बंधने घालण्याच्या अटी घालून व्यवसाय करण्याची मुभा आहे का ? व्यवसाय करताना काही तरी परवानग्या काढाव्या लागत असतील ना ?
कोणत्या तरी मंत्र्याने धोतर घालून फाईव्ह स्टार मधे जा.अडवल्यास मला कळवा असे म्हटले होते असे वाचले होते, पण दहा बारा वर्षं झाली असतील. राजे महाराजे शेरवानी पेहरावात अशा ठिकाणी गेले तर त्यांना असेच सुनावतील का ? ग्राहकाला ड्रेस कोड हे चमत्कारिक आहे. ब्रिटीशकालीन नियम आहेत का हे ?
मी अमेरिकेत काही restaurants
मी अमेरिकेत काही restaurants मधे बघितलिये अशी पाटी.
मध्ये United सारख्या airlines नी पण ओपन toes पादत्राणे ( चपला/ सँडल/ फ्लिप फ्लॉप/ स्लीपर) बंदी घातली होती. त्यावरूनही आरडाओरडा झालेला आठवतोय
अमेरिकेत काही ठिकाणी पाटी
अमेरिकेत काही ठिकाणी पाटी बघितल्याने दिल्लीतही तेच नियम लागू असणार हा आत्मविश्वास जबरी आहे!
बाकी नियम काय असतील ते असतील. जे बहुसंख्य लोकांना मान्य असतील तेच नियम पाळले जाणार आणि पुढे जाऊन तेच नियम बनणार. ही स्टंटबाजी असली तरी ती कशी हाताळली आणि पुढे ती उलगडते आहे हे समजुन घेण्यात रस आहे. मूळ मुद्द्यावर मूर्खपणा शिवाय काहीही प्रतिक्रिया नाही.
मलातरी स्टंट वाटतोय. मुळात
मलातरी स्टंट वाटतोय. मुळात त्या व्हिडीओमध्ये जे दिसतंय ते खरंच ताज आहे का अशी शंका मला आहे. बाकी फाईन डायनिंग रेस्टॉरंट्स आपापला ड्रेस्कोड ठरवू शकतातच. इथे एक रेस्तॉरंट आहे तिथे उन्हाळ्यात चप्पल, शॉर्ट्स वगैरे घालून गेलेलं चालत नाही.
लॉजिक आणि कोरीलेशन नावाच्या
लॉजिक आणि कोरीलेशन नावाच्या दोन गोष्टी,(ही )असतात
आता कुठल्यातरी हिंदुत्ववादी
आता कुठल्यातरी हिंदुत्ववादी संघटनेने तिथे जाऊन जेवण मागवून पानाभोवती प्रोक्षण आणि चित्राहुती घालून हात जोडून वदनी कवळ घेता, हरीच्या घरी शेवया तूप पोळ्या, झालंच तर शुकासारीखे पूर्ण वैराग्य ज्याचे वगैरे श्लोक म्हणून जय जय रघुवीर समर्थ घोषणा करून ताव मारण्याचे राष्ट्रकार्य करावे असे मला (बाहेर उभे राहून घाबरटपणे) फार मनात आहे. पण जेवणाला पैसे पडत असल्याने ते प्रत्यक्षात येण्याची शक्यता कमी आहे.
पब्लिसिटी स्टंट.
पब्लिसिटी स्टंट.
“कुठल्यातरी हिंदुत्ववादी
“कुठल्यातरी हिंदुत्ववादी संघटनेने” - ह्यात पैसे पडण्यापेक्षा, “वदनी कवळ घेता, हरीच्या घरी शेवया तूप पोळ्या, झालंच तर शुकासारीखे पूर्ण वैराग्य ज्याचे वगैरे श्लोक” म्हणता येणं ही मोठी अडचण आहे.
(No subject)
When in Rome, do as Romans do
When in Rome, do as Romans do - या म्हणीप्रमाणे ताज मध्ये जसे इतर लोक वागतात तसे वागावे.
बाकी मांडी घालून बसल्यामुळे पायाचे तळवे उघडे पडतात व काहींना जेवताना ते पाहणे अस्वस्थकारक वाटू शकते. त्यामुळे ताजची बाजू बरोबर आहे असे वाटते.
बाकी अश्या उचभ्रु ठिकाणचे दर जास्त असण्यामागे हेही कारण आहे कि तिथे उचभ्रु वातावरण व व्यवस्था असते. त्याचेच मुबलक पैसे ते घेतात. मग तसे वातावरण व व्यवस्था देणे हि त्यांची जबाबदारी आहे. मांडी घालून जेवायला बसणे त्या वातावरणात बसत नाही, मग त्यांनी आक्षेप घेतला. तो घेतला नसता तर इतर ग्राहकांवर अन्याय केल्यासारखे झाले असते.
एके काळी साहेबाच्या हाटेलात
एके काळी साहेबाच्या हाटेलात देशी पेहराव घालून गेलेल्या टाटा यांना प्रवेश मिळाला नाही, अपमान झाला. त्यानंतर टाटांनी जिद्दीने ते हॉटेल विकत घेतले. तेच ते गेटवे ऑफ इंडिया येथील ताजमहाल हॉटेल अशी कथा बरेच वेळा ऐकली आहे.
ताज हॉटेल कथा मी सुद्धा ऐकली
ताज हॉटेल कथा मी सुद्धा ऐकली आहे.
तिथे उचभ्रु वातावरण व व्यवस्था असते. त्याचेच मुबलक पैसे ते घेतात.
>>>>
आणि भारतीय डाऊन मार्केट परंपरा, पद्धती, पोशाख यात बसत नाहीत...
तिचा व्हिडिओ पाहिला.. shorts.
तिचा व्हिडिओ पाहिला.. shorts..
ते हॉटेल ताज असेल पण The Taj ग्रुप मधील वाटलं नाही..
शिवाय ती व्हिडिओ घेतानाही तशीच बसलीय/ जेवणाच्या मध्ये तो व्हिडिओ घेण चाललंय. उगाच ओढून ताणून केलेलं दिसतंय सगळ,.
भारतीय डाऊन मार्केट परंपरा, पद्धती, पोशाख यात बसत नाहीत...>>>
तिला जर परंपरा सांभाळायची तर परंपरेनुसार दिवाळीमध्ये घरी छान मस्त कुटुंबासोबत घरचे जेवण / फराळ करायची पद्धत आहे.
बाहेर पण जायचय / परंपरा पण सांभाळायची आहे/ जिथे गेलो तिथले नियमही पाळायचे नाहीत..
परंपरा / प्रथा सगळं आजकाल आपापल्या सोयीने घेतात किंवा सोडतात.
कुठेच clarity / सुस्पष्टता नाही.
तिच्या बाबत बांधलेले अंदाज
तिच्या बाबत बांधलेले अंदाज खरे असतीलही.
पण तिला जज न करता या निमित्ताने जो मुद्दा पुढे आलाय त्यावर चर्चा व्हावी असे वाटते.
<<<
परंपरेनुसार दिवाळीमध्ये घरी छान मस्त कुटुंबासोबत घरचे जेवण / फराळ करायची पद्धत आहे.
>>>>
हा मुद्दा सुद्धा अनावश्यक वाटतो.
कारण सणाचे बाहेर जेवायला जायला काही हरकत नाही असे वाटते.
किंबहुना घरी जेवण करायच्या त्रासाला सुट्टी मिळत असेल तर काय वाईट.
हल्ली स्त्री पुरुष दोघे जॉब करतात. त्यांना कोणी आयते जेवण दिले तर त्यांना हवेच आहे.
… पानाभोवती प्रोक्षण आणि
… पानाभोवती प्रोक्षण आणि चित्राहुती घालून हात जोडून वदनी कवळ घेता,…
हर्पा,
Me laughing crazy ! 🤣
एक राहिलेच - जमीनीवर मांडी घालून बसणे मस्ट !
प्रत्येक पक्षकाराला एक एक
प्रत्येक पक्षकाराला एक एक वाक्य बोलण्याची संधी दिली आहे, त्यावर जज्जसाहेब आपला निर्णय देत आहेत अशी चित्रविचिचित्र अवस्था होऊ नये ही अपेक्षा.
परंपरा, संस्कृती एव्हढे
परंपरा, संस्कृती एव्हढे टोकाचे प्रकरण खरंच आहे का ? व्हिडीओ नाही पाहिलेला, इच्छाही नाही बघायचा.
अगदी स्टंट असेल तरी लक्ष वेधून घेण्याचे काम केलेच आहे.
ती बाई कुठल्या तरी कंपनीची सीईओ आहे. कपडे भारतीय आहेत आणि सभ्य आहेत. यावर आक्षेप नसावा.
कोल्हापुरी चप्पल का चालणार नाही ? जगभरात कोल्हापुरी चप्पलची नक्कल होतेय. नुकत्याच एका आंतरराष्ट्रीय ब्रॅण्डला कोल्हापुरी चप्पल किंवा तत्सम डिझाईन तुम्हाला परवानगी न घेता विकता येणार नाही असा न्यायालयाने दणका दिला आहे. या चपलेला जिओटॅग आहे. कोल्हापुरीच का ? ज्याला कुणाला चप्पल कम्फर्टेबल वाटत असेल त्याने ती घालून गेलं तर त्याने हॉटेलला आक्षेप घेण्याचं कारण काय ?
हॉटेलला नियम ठरवण्याचे अधिकार आहेत. पण ते माफक आहेत. अगदीच कुणाला लाज वाटेल असा पोषाख नसावा एव्हढीच असभ्यपणाची व्याख्या असावी. थ्रीपीस सूट ते ही दिल्लीत ? न्यायालयात सुद्धा आता वकीलांना ब्रिटीशकालीन कोट आणि झग्यांची आवश्यकता नाहीये. डिसेन्ट असावं म्हणजे चप्पल नको असा नियम (भारतात) कसा काय लागू होईल ?
भेदभाव करण्याचा प्रयत्न झाला तर ग्राहकाला दाद मागण्याचा हक्क आहे.
एखाद्याला वदनी कवळ घेता म्हणावेसे वाटले तरी बाकिच्यांना त्रास का व्हावा ? ते काही आकाशातून टपकलेत का ? अन्य धर्मात पण अशी प्रथा असेल तर त्यांनीही पाळावी. ज्याला नको त्याने नाही पाळली तरी चालेल. हेच अभिव्यक्तीस्वातंत्र्य असतं ना ? पंचतारांकित हॉटेल आहे म्हणून त्यांनी गळचेपी केली तर चालते का ? एरव्ही कुणी काय पोषाख करावा याच्या स्वातंत्र्याच्या गप्पा हाणतोच कि आपण.
जसे एखाद्याला धार्मिक परंपरांचा अभिमान आहे, पण त्याचा अभिमान इतरांच्या आड येऊ नये, तसेच कुणाच्या परंपरांचा त्रास कुणालाही होऊ नये. ( विवेकाने अर्थात ! नाहीतर उटपटांग परंपरांचा उल्लेख होईल. ज्या परंपरा भेदभाव पाळतात त्यांचा वितंड्यासाठी उल्लेख होईल. ). भारतासारख्या वैविध्यपूर्ण देशात श्रीमंतीचा तोरा दाखवत ज्यांना त्रास होतो, त्यांनी आपल्या कुटुंबापुरती वेगवेगळ्या शहरात फाईव्ह स्टार हॉटेल्स बांधावीत आणि तिथे कुणालाही येऊ देऊ नये. किंवा क्लब सुरू करावा. क्लबमधे फक्त मेंबर्सना च प्रवेश असतो. प्रत्येकाच्या ओंगळ वागण्याच्या कल्पना वेगवेगळ्या असतात. कमी कपड्यांवर आक्षेप हे जसे अभिव्यक्तीस्वातंत्र्यावरचे आक्रमण आहे तसेच भारतीय सभ्य पोषाखावर आक्षेप हे का आक्रमण नाही ? त्या बाईने घरी जेवावे हा लॉजिकल विचार म्हणून ठीक आहे. पण तोच विचार ज्यांना आक्षेप आहे त्यांच्यासाठी पण का नाही लागू होत ?
हॉटेलची सुरक्षा, अन्य ग्राहकांना त्रास होईल असे वर्तन ( सूज्ञास सांगणे न लगे) हे आक्षेपार्ह असायला हवे. ते ग्राहक प्रचंड श्रीमंत आहेत म्हणून स्वस्तातले कपडे घालून आलेल्यांबद्दल आक्षेप घेत असतील तर मानवाधिकार आयोग आणि अन्य कलमांद्वारे हॉटेलवर केस ठोकता येते. ज्या देशात कायद्याने असा भेदभाव अलाऊड आहे तिथे हे लागू होत नाही. त्या देशातले कायदे इथे लागू होत नाहीत. वडाची साल पिंपळाला लावून चालणार नाही.
ही कमेण्ट आहे, रीसर्च पेपर किंवा पुस्तक नाही. त्यामुळे फटी असणारच. आशय समजून घेतल्याबद्दल धन्यवाद. वितंडवाद्यांना लांबूनच नमस्कार.
ग्रोक चे उत्तर काय आहे बघूयात
ग्रोक चे उत्तर काय आहे बघूयात का ?
हॉटेल/रेस्टॉरंटला नियम लादण्याची कायदेशीर परवानगी
भारतात खासगी मालमत्तेच्या अधिकाराला (Right to Private Property) संरक्षण आहे, जे संविधानाच्या कलम ३००A अंतर्गत मानले जाते. हॉटेल किंवा रेस्टॉरंट हे खासगी व्यावसायिक ठिकाण असल्याने, मालक किंवा व्यवस्थापनाला आपल्या व्यवसायाच्या नियम आणि धोरणे ठरवण्याचा अधिकार आहे, जर ते कायद्याच्या चौकटीत असतील. याबाबत खालील मुद्दे महत्त्वाचे आहेत:
1. **ड्रेस कोड (कपडे)**:
- हॉटेल/रेस्टॉरंट मालकाला ग्राहकांसाठी ड्रेस कोड ठरवण्याचा अधिकार आहे, जसे की फॉर्मल कपडे (उदा., शर्ट आणि पँट) किंवा विशिष्ट ड्रेस (उदा., नो शॉर्ट्स/स्लिपर्स). हे त्यांच्या ब्रँड इमेज, ग्राहक अनुभव, किंवा स्वच्छतेच्या निकषांवर आधारित असते.
- उदा., ५-स्टार हॉटेल्स (जसे ताज किंवा ओबेरॉय) फॉर्मल ड्रेस कोड लादतात, तर कॅज्युअल रेस्टॉरंट्समध्ये हे लवचिक असते.
- **कायदेशीरता**: हा अधिकार खासगी मालमत्तेच्या स्वातंत्र्याचा भाग आहे, पण तो भेदभावमुक्त (non-discriminatory) असावा. जर ड्रेस कोड धर्म, जाती, लिंग किंवा आर्थिक स्थितीवर आधारित असेल (उदा., फक्त श्रीमंतांसाठी फॉर्मल ड्रेस), तर तो भारतीय दंड संहितेच्या कलम १५३A (religious or racial discrimination) किंवा समानतेच्या अधिकाराच्या (Article 14) उल्लंघन होऊ शकतो.
2. **बसण्याचे नियम (उदा., मांडी घालून बसणे)**:
- हॉटेल/रेस्टॉरंटला ग्राहकांना कसे बसावे याबाबत नियम ठरवण्याचा अधिकार आहे, उदा., खुर्चीवर मांडी घालून बसण्यास मज्जाव (उदा., सभ्यतेच्या कारणास्तव). हे त्यांच्या सेवा धोरणाचा भाग असू शकते.
- **कायदेशीरता**: हे नियम ग्राहकांच्या आरामावर परिणाम करत असल्यास किंवा अनावश्यक अडचण निर्माण करत असल्यास, ते कंज्यूमर प्रोटेक्शन एक्ट, २०१९ अंतर्गत आव्हान दिले जाऊ शकतात. पण जर हे स्वच्छता किंवा सुरक्षिततेच्या दृष्टीने असेल, तर ते वैध मानले जाऊ शकते.
3. **व्यवसाय स्वातंत्र्य**:
- सर्वोच्च न्यायालयाने (2004, Indian Hotel & Restaurant Association vs. State of Maharashtra) खासगी व्यवसायांना ग्राहक निवडण्याचा अधिकार दिला आहे, जर तो कायदेशीर कारणांसाठी असेल (उदा., हिंसक वर्तन, अनुचित कपडे). पण हा अधिकार अपरिमित नाही – तो भेदभावमुक्त आणि पारदर्शक असावा.
### असे नियम केले असल्यास तक्रार करता येते का?
हो, जर नियम कायदेशीर चौकटीत नसेल किंवा ग्राहकांच्या अधिकारांचे उल्लंघन करत असेल, तर तक्रार करता येते:
- **कंज्यूमर प्रोटेक्शन एक्ट, २०१९**: जर हॉटेल/रेस्टॉरंट ड्रेस कोड किंवा बसण्याचे नियम ग्राहकाला सेवा नाकारण्यासाठी वापरत असेल (उदा., प्रवेश नाकारणे), आणि ते अनुचित किंवा भेदभावपूर्ण असेल, तर ग्राहक कंज्यूमर कोर्टात तक्रार देऊ शकतो. उदा., जर एखाद्या व्यक्तीला जातीभेदाने नाकारले, तर तो तक्रारी योग्य आहे.
- **मानवी हक्क आयोग (NHRC)**: जर नियम लिंग, धर्म किंवा जातीवर आधारित असतील, तर राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाकडे तक्रार करता येते.
- **स्थानिक पोलिस किंवा दंडाधिकारी**: जर नियम ग्राहकाला शारीरिक किंवा मानसिक त्रास देत असतील (उदा., जास्त कडक अंमलबजावणी), तर स्थानिक पोलिसात तक्रार नोंदवता येते.
- **प्रक्रिया**: प्रथम हॉटेलच्या व्यवस्थापनाला लेखी तक्रार करा. नंतर, कंज्यूमर फोरम (district level) किंवा ऑनलाइन (e-Daakhil पोर्टल) तक्रार दाखल करा.
सारांश :
- **कायदेशीरता**: हॉटेल/रेस्टॉरंटला ड्रेस कोड आणि बसण्याचे नियम लादण्याची परवानगी आहे, जर ते भेदभावमुक्त, पारदर्शक, आणि व्यवसायाच्या हिताचे असतील.
- **तक्रार**: जर नियम अनुचित, भेदभावपूर्ण किंवा ग्राहकांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करत असतील, तर तक्रार करता येते.
हे नियम ग्राहकांच्या आरामावर
हे नियम ग्राहकांच्या आरामावर परिणाम करत असल्यास किंवा अनावश्यक अडचण निर्माण करत असल्यास, ते कंज्यूमर प्रोटेक्शन एक्ट, २०१९ अंतर्गत आव्हान दिले जाऊ शकतात. पण जर हे स्वच्छता किंवा सुरक्षिततेच्या दृष्टीने असेल, तर ते वैध मानले जाऊ शकते.
>>>>
इंटरेस्टिंग मुद्दा !
मांडी आरामदायक असते या मुद्द्यावर ग्राहक नक्कीच तक्रार करू शकतो.
यात स्वच्छता नाही हे हॉटेल मॅनेजमेंट पटवून देऊ शकेल का?
आणि भारतीय डाऊन मार्केट
आणि भारतीय डाऊन मार्केट परंपरा, पद्धती, पोशाख यात बसत नाहीत... >>>> हे खरे नाही. योग्य प्रकारे केलेल्या भारतीय परंपरा पद्धति पोशाख यांना कोणी विरोध केला नाही. एअर इंडिया जी ताज च्याच टाटांची आहे तिथे भारतीय पोशाखातीलच आकाश यजमान असतात. व भारतीय परंपरेप्रमाणेच हात जोडून नमस्कार करतात.
तसेही मांडी घालून जमिनीवर बसायचे असते. उद्या एखादी व्यक्ती भारतीय परंपरा म्हणून जमिनीवर मांडी घालून हॉटेलमध्ये बसली तर इतरांनी जायचे यायचे कसे?
काळ वेळ परिस्थिती पाहून तारतम्याने वागावे. प्रथा परंपरा जपताना सुद्धा तारतम्य वापरावे. आडमुठेपणा करू नये.
माबो वाचक , कोल्हापुरी चप्पल
माबो वाचक , कोल्हापुरी चप्पल आक्षेपार्ह का ? हाय हिल्स सँडल्स किंवा शूज कम्फर्टेबल नसतील तर ? पूर्वी राजे लोक सुद्धा कोल्हापुरीच वापरायचे ना ? ती चप्पल असभ्य कशी झाली ? हॉटेलवर केस केली तर ते न्यायालयाला बाजू पटवून देऊ शकत असतील तर मग ठीक आहे.
राजस्थान मधे एका राजवाड्यातल्या हॉटेलमधे मोजडी, शेरवानी अशा पोषाखात लोक आलेले पाहिलेत. जपानमधे हॉटेल मधे मांडी घालून बसतात. पुण्यात पण एका हॉटेलमधे व्यवस्था होती. ते हॉटेल बंद पडलं. खाली मांडी घालून हॉटेलमधे बसलं तर इतरांना अडथळा होईल. पण खुर्चीवर मांडी घालून बसल्याने इतरांना त्रास का होत असेल ? तारतम्य दोन्हीकडे असावे. भारतात भारतीय पद्धतीच्या पेहरावाला आक्षेप हे तारतम्य असेल असे वाटत नाही. कोल्हापुरात फाईव्ह स्टार हॉटेलमधे कोल्हापुरी चप्पल चालते.
https://www.indulgexpress.com/travel/2025/Jul/19/pradas-chappal-controve...
जुहू मधे मराठी कलाकारांना चप्पलेमुळे बाहेर घालवले. पण त्याने वाद चिघळला नाही. बहुतेक हॉटेल व्यवस्थापनाने माफी मागितली.
ब्रिटीश लोक परंपराप्रिय आहेत. पण त्या त्यांच्या परंपरा आहेत, आपल्या नाहीत. आता ते ही इतके कडक नियम पाळत असतील का ? जोधपूरला तर अजून एका फाईव्ह स्टार हॉटेल मधे परदेशी पर्यटक थ्री फोर्थ घालून जेवायला बसलेले व्हिडीओत दिसतात.
मॅनेजर काही सांगत असल्याची
मॅनेजर काही सांगत असल्याची क्लिप मिळाली नाही थोडक्यात जे काही आहे तो त्या व्यक्तीचा दावा. काय सांगितले, कशा प्रकारे सांगितले वगैरे मी बघितलेले नाही तेव्हा त्या प्रसंगाबद्दल मी काय बोलणार ?
आता माझे अवांतर दोन पैसे -
भारतीय पद्धतीत आपण जेव्हा पाटावर/सतरंजीवर मांडी घालून जेवायला बसतो तेव्हा पादत्राणे ही मुळात जेवायच्या जागी आणतच नाही. इतकेच नाही तर बाहेरुन आल्यावर उघडी पादत्राणे असतात तर पायाला काही प्रमाणात धूळ लागलेली असते म्हणून पाय धुतो. आपल्या घरात कुणी जेवायच्या जागी कोल्हापुरी चप्पल घालून आले आणि चपला खाली ठेवून छान कुशनवाल्या खुर्चीवर धूळ भरल्या पायाने मांडी घालून बसलेले आपल्याला आवडेल का? शूज तसेच घालून आलेले आणि मांडी घालून बसलेले चालेल का?
जपानमधे मांडी घालून बसतात पण तिथे पादत्राणे नेमुन दिलेल्या ठिकाणी उतरवणे अपेक्षित असते.
तुम्हाला सगळीकडे पादत्राणे घालून वावरायचे आहे, खाली बसुन जेवायचे नाहीये, टेबल खुर्ची हवी आहे तर मग कुशन वाल्या खुर्चीत प्लीज पाय वर घेवून बसू नका. त्यातुन ड्रेसकोड बद्दल किंवा मिळालेल्या वागणूकीबद्दल आक्षेप आहे तर ग्राहक म्हणून तक्रार नोंदवता येतेच. उगाच आपली परंपरा, आपला पोशाख म्हणून ड्रामा नको.
उद्या एखादी व्यक्ती भारतीय
उद्या एखादी व्यक्ती भारतीय परंपरा म्हणून जमिनीवर मांडी घालून हॉटेलमध्ये बसली तर इतरांनी जायचे यायचे कसे?
>>>>>
तुम्ही लोकांच्या येण्याजाण्याच्या रस्त्यावर खुर्ची घेऊन सूटबुटात बसलात तरीही त्यांना त्रास होईल.
की तुमच्या मते खुर्चीवर बसला आहे सूटबुटात आहे म्हणून आदराने ओलांडून जातील?
उगाच ओढून ताणून जो मुद्दा नाही तो कशाला आणत आहात
कुणी जेवायच्या जागी
कुणी जेवायच्या जागी कोल्हापुरी चप्पल घालून आले आणि चपला खाली ठेवून छान कुशनवाल्या खुर्चीवर धूळ भरल्या पायाने मांडी घालून बसलेले आपल्याला आवडेल का? शूज तसेच घालून आलेले आणि मांडी घालून बसलेले चालेल का? >> हॉटेलमधे इतर लोक शूज आणि सँडल्स घालून येतात त्यांच्या शूजला धूळ लागत नाही का ? पायात घातले म्हणून ते स्वच्छ राहतात असे काही आहे का ?
इथे मुद्दा पादत्राणे बाहेर काढून यायचा नाहीच आहे. प्रत्येक जण आपापली पादत्राणे घेऊनच जेवायला बसला होता. मला बाकीची तुमची पोस्ट काहीच समजली नाही.
पोशाखावरून अजून एक मुद्दा
पोशाखावरून अजून एक मुद्दा मनात आला.
एखाद्या मुलीने महिलेने वेस्टर्न आणि तोकडे कपडे घातले असतील तर ते आजही बरेच भारतीयांना बघायला अनकंफर्टेबल वाटतात.
पण त्यावर आक्षेप घेतला तर मात्र पुन्हा अभिव्यक्तीस्वातंत्र्य धोक्यात आले, आम्ही आमच्या मनाने आधुनिक कपडे घालू शकत नाही का असा ओरडा सुरू होईल.
अर्थात मी त्या पोशाखाच्या विरोधात नाहीये. किंबहुना प्रत्येकाच्या या स्वातंत्र्याला सपोर्टच करतो.
पण इक्वलिटी एकाच बाजूने अपेक्षित नसावी ना.. सर्वांनी एकमेकांना स्वीकारायला हवे.
>>हॉटेलमधे इतर लोक शूज आणि
>>हॉटेलमधे इतर लोक शूज आणि सँडल्स घालून येतात त्यांच्या शूजला धूळ लागत नाही का ? पायात घातले म्हणून ते स्वच्छ राहतात असे काही आहे का ?>> च्च! म्हणूनच पाय खाली ठेवणे, मांडी न घालणे अपेक्षित आहे ना!
तुम्हाला सगळीकडे पादत्राणे
तुम्हाला सगळीकडे पादत्राणे घालून वावरायचे आहे, खाली बसुन जेवायचे नाहीये, टेबल खुर्ची हवी आहे तर मग कुशन वाल्या खुर्चीत प्लीज पाय वर घेवून बसू नका. त्यातुन ड्रेसकोड बद्दल किंवा मिळालेल्या वागणूकीबद्दल आक्षेप आहे तर ग्राहक म्हणून तक्रार नोंदवता येतेच. उगाच आपली परंपरा, आपला पोशाख म्हणून ड्रामा नको.>>> तुम्हाला माझी पोस्ट समजलेली नाही बहुतेक. इथे आपली परंपरा किंवा प्पोशाख याची वकिली नाही चाललेली. आपला पोशाख हा आक्षेपार्ह कसा हा लॉजिकल प्रश्न आहे जो या निमित्ताने विचारात आला आहे. इंग्रजी ड्रेसकोड कधीपासून आपल्या परंपरेत आला ? हा ड्रामा नाही का ?
च्च! म्हणूनच पाय खाली ठेवणे, मांडी न घालणे अपेक्षित आहे ना! >>> मांडी घालायचा मुद्दा जपानचे उदाहरण देऊन आला तर पादत्राणे बाहेर काढायचा नियम आणला, आणि पादत्राणे बाहेर काढायचा मुद्दा अस्थानी आहे म्हटलं तर आता पाय खाली ठेवायला पाहीजेत म्हणता. नक्की म्हणायचेय काय ? खुर्चीवर मांडी घालून बसू नये हे तारत्म्य आहे. पण मांडी घालून बसल्याने इतरांना काय त्रास होतो हा प्रश्न होता. कारण बातमीत मॅनेजरने असे सांगितलेय असे वाचले. कुणाला पाय खाली सोडल्याने मुंग्या येत असतील, काही कारणे असतील जी आपल्याला माहिती नाहीत.
वर लिंक्स पण दिल्या आहेत. एखाद्या फाईव्ह स्टार हॉटेलमधे कोल्हापुरी चप्पल चालते याचा अर्थ ती निषिद्ध नक्कीच नाही. चप्पल बाहेर काढून यायचा मूद्दा इथे अस्थानी आहे. धूळ पायाला लागते तर कपड्यांना सुद्धा लागूच शकते.
तारतम्य दोन्हीकडून बाळगले पाहीजे. तसेच एखाद्या ठिकाणी आपल्याला अपमानास्पद वाटणारे नियम असतील तर जाब सुद्धा विचारण्याचा हक्क आहे. कुणाला एव्हढा वेळ नसतो. इतकेच.
महाराष्ट्र विधानसभेत कोल्हापुरी चप्पलेला पब मधे विरोध का याची चौकशी करण्याचे आदेश २००८ साली निघाले होते. त्याचं पुढे काय झालं कल्पना नाही. बहुतांश लोक पंचतारांकित हॉटेलमधे जात नाहीत. त्यामुळं त्यांना प्रश्न पडत नाहीत. एखाद्याला पडले तर तो अल्पसंख्यांक ठरतो. पूर्वी ब्रिटीश कायदा होता, त्यांच्या क्लबमधे मेस मधे प्रवेश मिळावा, त्यांनी पाठ थोपटावी म्हणून भारतीय लोक त्या परंपरा आपल्याशा करत होते. पण तसेच वागणे हीच सभ्यता आहे असा आग्रह हा सुद्धा आडमुठेपणाच आहे.
माझं मांडून झालं आहे. लोक फक्त एकाच बाजूने विचार करणार असतील तर काहीच उपयोग नाही.
>>आम्ही आमच्या मनाने आधुनिक
>>आम्ही आमच्या मनाने आधुनिक कपडे घालू शकत नाही का असा ओरडा सुरू होईल.>>
भारतात भानगड अशी आहे की एक (की अनेक?) भारत आणि त्यात भर म्हणून आपापल्या मर्जीचे अनेक इंडिया हे एकाचवेळी एकमेकांना एकत्र आणत आणि विभक्त करत रहातात. त्यात अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले आधुनिक म्हणजे तर धन्यवादच. वेस्टर्न, आधुनिक वगैरे म्हणताना तिथेही काही संकेत पाळणे अपेक्षित असते हे लक्षातच घेतले जात नाही. आता पबमधे चालतील असे कपडे घालून फ्युनरला गेलात तर आमच्या गावातही पब्लिक नावच ठेवेल. तिथे काय आम्ही आधुनिक आहोत म्हणणार आहात का?
Pages