मायबोली गणेशोत्सव २०२६
प्रवेशिकांची यादी - लेखन स्पर्धा - पाककृती लेखन
लेखन स्पर्धा - पाककृती लेखन स्पर्धा
१.आम्रसांदणी - स्वाती आंबोळे
https://www.maayboli.com/node/88814
२. स्वाती आंबोळे - तीन अंकी लोकप्रिय नाटक - लाडका
https://www.maayboli.com/node/88832
३. स्वयंपाक न जमणार्या बाबाचे अंड्याचे फंडे - ऋन्मेऽऽष
https://www.maayboli.com/node/88842
प्रवेशिकांची यादी - पाककृती स्पर्धा क्र. ३- पेय - फळ + फूल + मसाला : चवींचा त्रिवेणी संगम
पाककृती स्पर्धा क्र. ३- पेय - फळ + फूल + मसाला : चवींचा त्रिवेणी संगम
१. जास्वंद डाळिंब ज्युस - मनीमोहोर
https://www.maayboli.com/node/88835
२. रोझ ऑरेंज मोहितो - निल्स_23
https://www.maayboli.com/node/88851
३. मॅरीगोल्ड सनराईज - मॅगी
https://www.maayboli.com/node/88869
प्रवेशिकांची यादी -पाककृती स्पर्धा क्र. २ - दिसतं तसं नसतं
पाककृती स्पर्धा क्र. २ - दिसतं तसं नसतं
१. नमकीन पुरणपोळी - मनीमोहोर
https://www.maayboli.com/node/88812
२. चमचमीत तुकड्या – शर्मिला
https://www.maayboli.com/node/88846
३. पायनापल पेस्ट्री उर्फ मेयोनीज सँडविच - सहेली
https://www.maayboli.com/node/88909
प्रवेशिकांची यादी - पाककृती स्पर्धा क्र. १ - जिन्नस एक, पदार्थ अनेक
पाककृती स्पर्धा १: जिन्नस एक, पदार्थ अनेक
१. तांदूळ महोत्सव! - Adm
https://www.maayboli.com/node/88811
२. लालभडक टमाटे - mi_anu
https://www.maayboli.com/node/88818
३. लाडका दोडका - स्वाती_आंबोळे
https://www.maayboli.com/node/88832
गेले करायचे राहुन- पशुपत
प्रत्येक माणसाच्या बौद्धिक कुवती मध्ये आणि आवडीमध्ये भरपूर तफावत असते.
मला शाळा आणि महाविद्यालयीन (सुरुवातीच्या) काळात शास्त्र आणि गणित या दोन्ही गोष्टी अतिशय उत्कृष्टपणे आत्मसात करता यायच्या जमायच्या आणि त्या अनुषंगाने या विषयात रसही निर्माण झाला होता ; परंतु शाळेमध्ये आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या काळात मराठी आणि इंग्रजी हे विषय शिकवायला अतिशय भाषेवर प्रभुत्व असलेले ज्ञानी शिक्षक आम्हाला मिळाले होते .
शशक स्पर्धा - अतुल - मधुमती २०२६
शिमल्याला रात्री उशिरा पोहोचलो. हॉटेलमध्ये चेकइन केले. तिसऱ्या मजल्यावरील माझ्या रूमवर गेलो. प्रवासाने शिणलो असल्याने बेडवर अंग टाकताच झोप लागणार, तोच कुठूनसे एका मुलीच्या सुंदर आवाजात गाण्याचे अस्पष्ट सूर ऐकू आले,
"आजा रेऽऽऽ....". मला आश्चर्य वाटले. यावेळी कोण गात असेल?
थोड्या वेळाने पुन्हा हेच सूर ऐकू आले. असे तीन चार वेळा झाले. हॉटेलच्या मागून कुठूनसा आवाज येत होता. मी उठून खिडकीतून हळूच पाहिले. हॉटेलच्या मागे चांदण्यात खाली जंगल व दरी दिसत होती. पण सगळी सामसूम होती. दूर दूर कुणीही दिसत नव्हते.
शशक स्पर्धा - अतुल - पुनर्भेट
आयसीयू मधल्या बेडवर तो निपचितपणे पडलेला. ग्लानीत होता. आजूबाजूची लगबग आणि आवाज अस्पष्टपणे जाणवत होते. साऱ्या शरीरभर प्राणांतिक ठणका पसरलेला. अचानक एक भयानक वेदना विजेसारखी चमकली. जिवाच्या आकांताने ओरडणार. तोच त्याची शुद्ध हरपली.
जाग आली तेंव्हा सभोवती अंधार होता. निरव शांतता होती. वेदना जाणवत नव्हती. कि आवाज जाणवत नव्हते. अचानक कोणाचीतरी चाहूल लागली. त्याने पाहिले. 'ती' होती. जवळच उभी. हो तीच. चेहऱ्यावर मंद हास्य. तेच डोळे. तोच पेहराव. दिसायला अजूनही तेंव्हासारखीच. तशीच. हि यावेळी आणि इथे? तो चमकला. कारण ती त्याच्या आयुष्यातून गेली त्याला कित्येक वर्षे होऊन गेली होती!
शशक स्पर्धा - Abuva - पोकळी
"लय झालं, जीवच देतो आता" राजा बोलला.
"तुज्यायला..." हे अचानक पुढे सरसावले.
"अवो नाय वो, नकोऽ"
राजा दोन पावलं मागे सरला, अगदी कड्याच्या काठावर...
"मागे नोको रेऽऽ राजा..."
ह्यांच्या हातात त्याचा हात आला.
पण त्यानं झिडकारला.
"पाय बगा हो..."
झटापटीत त्याचा तोल गेला.
पकडायला गेला तर यांचा शर्ट हाती लागला.
"आयेऽऽ"
"राजाऽऽ"
क्षणभरच नजर भिडली. भयभीत. मरणासन्न.
हात गळ्याशी धरून मी धावू लागले.
कड्याखाली तो दिसेनासा झाला.
जाताना ह्यांना घेऊन गेला.
"वाचव गं मायेऽऽ"
एक किंकाळी अवकाश चिरत गेली.
ठसे वापरून शुभेच्छापत्र - विजयालक्ष्मी - मनिम्याऊ
मायबोली गणेशोत्सवाचा शेवटचा दिवस. घाई झाली फारच.
ठसे वापरायचे होते.. काही सुचेना.. मग हाताचेच ठसे मारून मंडला मोर बनवले.
स्वतःलाच Happy birthday.. येतोय ना लवकरच..