Submitted by Abuva on 26 September, 2026 - 02:04
"लय झालं, जीवच देतो आता" राजा बोलला.
"तुज्यायला..." हे अचानक पुढे सरसावले.
"अवो नाय वो, नकोऽ"
राजा दोन पावलं मागे सरला, अगदी कड्याच्या काठावर...
"मागे नोको रेऽऽ राजा..."
ह्यांच्या हातात त्याचा हात आला.
पण त्यानं झिडकारला.
"पाय बगा हो..."
झटापटीत त्याचा तोल गेला.
पकडायला गेला तर यांचा शर्ट हाती लागला.
"आयेऽऽ"
"राजाऽऽ"
क्षणभरच नजर भिडली. भयभीत. मरणासन्न.
हात गळ्याशी धरून मी धावू लागले.
कड्याखाली तो दिसेनासा झाला.
जाताना ह्यांना घेऊन गेला.
"वाचव गं मायेऽऽ"
एक किंकाळी अवकाश चिरत गेली.
"अवो, अवोऽऽ"
पायाखाली जमीन सरली.
हाताच्या झटक्यात कड्यावर काळे मणी उधळले.
मी त्या पोकळीत सामावून गेले.
(करुण-अनलंकृत)
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
अंगावर आली
अंगावर आली
सत्यकथा!
सत्यकथा!
सुन्न करणारी
सुन्न करणारी
पुन्हा आठवण करून दिलीत त्या
पुन्हा आठवण करून दिलीत त्या घटनेची.. पुन्हा तितकेच अस्वस्थ वाटले
सुन्न करणारी सत्यकथा..!
सुन्न करणारी सत्यकथा..!
सुन्न करणारी सत्यकथा.. >> +१
सुन्न करणारी सत्यकथा.. >> +१
>>>>>सुन्न करणारी सत्यकथा..!
>>>>>सुन्न करणारी सत्यकथा..!
+१
सुन्न करणारी सत्यकथा..! >>
सुन्न करणारी सत्यकथा..! >> +१.
छान लिहिली आहे
छान लिहिली आहे
सुन्न करणारी सत्यकथा..! >> +१
सुन्न करणारी सत्यकथा..! >> +१
>> पुन्हा आठवण करून दिलीत
>> पुन्हा आठवण करून दिलीत त्या घटनेची

+१
फार व्यथित होतं मन. तीन तास सारं सुरू होतं तरीही कोणासही ही आत्महत्या रोखता आली नाही. याउलट, उठवळ माध्यमांनी या बाळाला मृत्यूनंतरही बदनाम केले
आठवली बातमी
आठवली बातमी
