शशक स्पर्धा - अतुल - मधुमती २०२६

Submitted by अतुल. on 26 September, 2026 - 02:52

शिमल्याला रात्री उशिरा पोहोचलो. हॉटेलमध्ये चेकइन केले. तिसऱ्या मजल्यावरील माझ्या रूमवर गेलो. प्रवासाने शिणलो असल्याने बेडवर अंग टाकताच झोप लागणार, तोच कुठूनसे एका मुलीच्या सुंदर आवाजात गाण्याचे अस्पष्ट सूर ऐकू आले,

"आजा रेऽऽऽ....". मला आश्चर्य वाटले. यावेळी कोण गात असेल?

थोड्या वेळाने पुन्हा हेच सूर ऐकू आले. असे तीन चार वेळा झाले. हॉटेलच्या मागून कुठूनसा आवाज येत होता. मी उठून खिडकीतून हळूच पाहिले. हॉटेलच्या मागे चांदण्यात खाली जंगल व दरी दिसत होती. पण सगळी सामसूम होती. दूर दूर कुणीही दिसत नव्हते.

तोच पुन्हा आवाज आला. "आजा रेऽऽऽ...." आणि खाली किचन मधल्या पोऱ्याने मोबाईल उचलताच तो बंद झाला. Lol

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ट्विस्ट खतरनाक आहे..
आधी वाटले की तुम्ही दिलीपकुमारचे पुढचे अवतार निघतात की काय..

मला वाटलेले अजय नामक व व्यक्तीला कोणीतरी हाका मारत असणार.
हा शेवटही एकदम मस्त आहे. फुटले.

Lol

झकास!

धन्यवाद सर्वांना Happy

@माबो वाचक: चाणाक्ष नजर आहे तुमची. कारण ही कथा 'अलक' म्हणून ड्राफ्ट लिहून ठेवला होता पूर्वी कधीतरी. त्यामध्ये अधिक तपशील आणि वर्णने होती. सबमिशनसाठी वेळ फार कमी उरला असताना तिची शशक बनवली त्यात ते सारे तपशील निघून गेलेत.