यंदा पृथ्वीवर येण्यापूर्वी बाप्पांनी महागडे Noise Cancellation Headphones मागवले. भगवान शंकरांनी विचारलं, “काय रे, एवढा खर्च कशासाठी?”
बाप्पा वैतागून म्हणाले, “आरती पाच मिनिटं आणि डीजे पाच तास! गेल्या वर्षी ‘झिंगाट’ इतकं ऐकलं की माझा उंदीर दोन दिवस तिरका चालत होता आणि ‘मोरया’ऐवजी ‘झिंगाट... झिंगाट!’ म्हणत होता!”
दुसऱ्या दिवशी सगळ्या गणेशमूर्ती हेडफोन घालून प्रकट झाल्या. भक्त चक्रावले. विध्याधर बापट आनंदाने म्हणाले, “वा! निदान बाप्पांना तरी माझं म्हणणं पटलं!” पण लगेच हळहळले, “अरेरे, आता आपल्या प्रार्थना ऐकू जाणार कशा?”
डीजे मात्र पूर्वीसारखाच धडाडत राहिला. उलट हेडफोनच्या दुकानांबाहेर रांगा लागल्या!
हे पाहून बाप्पा हसले, “अहो, समस्या डीजेची होती, उपाय हेडफोनचा केलात! असंच चाललं तर पुढच्या वर्षी मी मूर्तीऐवजी WhatsApp DP ठेवीन आणि ‘गणपती बाप्पा मोरया’ ऐवजी फक्त एकच संदेश पाठवीन... ‘You Are On Mute!’”
बहोत खूब.
बहोत खूब.
मस्त!!!
मस्त!!!
मस्त.
मस्त.
मस्तच!
मस्तच!