Submitted by पारिजाता on 21 September, 2026 - 05:24
रस : करूण
अलंकार : उपमा
स्टेशन
गावी जाणाऱ्या ट्रेनमध्ये पुन्हा बसवून देत असणाऱ्या मुलाला वैदेही म्हणाली, "आता मला तिथं एकटं राहणं जमेलसं वाटत नाही रे"
"ठीके. आम्ही तिकडं आलो की चांगलं सिनियर केअरसेंटर बघू." मुलगा जाताच वैदेहीचे डोळे वहायला लागले.
इतक्यात तिला दिसले, ती या ट्रेनमध्ये चढत असताना उतरलेल्या कुटुंबातले आईबाबा. समोर लागलेल्या विरुद्ध दिशेच्या ट्रेनमध्ये घाईघाईने चढत होते. त्यांच्याबरोबरची मुलगी कुठं गेली?
तेवढ्यात तिला दूर पाणपोईशी तीच मुलगी बाटली भरताना दिसली. मागं वळल्यावर आईबाबा दिसले नाहीत. मुलगी कावरीबावरी,रडवेली. आणि समोरची ट्रेन हलली.
लगेच वैदेहीची ट्रेनपण हलली.
अनेक वर्षं जिथं काढली तिथून निरोप घ्यायला स्टेशनवर ती छोटी, मुलगी फक्त. तिच्यासारखीच एकटी आणि कावरीबावरी.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
आई ग..
आई ग..
बापरे!!!
बापरे!!!
अरे रे...
अरे रे...
(No subject)
छान लिहीलेले आहे. वयात अंतर
छान लिहीलेले आहे. वयात अंतर आले पण कावरेबावरेपण तेच.