Submitted by पारिजाता on 22 September, 2026 - 04:07
रस : करूण/हास्य
अलंकार : अपेक्षा.. सॉरी.. उत्प्रेक्षा
रिअॅलिटी
'एकतर इथं सगळी कामं स्वतः करा. वर दहा तास काम, दोन तास प्रवास यात उरलेला जीव जातो. सॅलरी गावाकडच्यांना भारी वाटत असली तरी इथं ती पुरवताना नाकी नऊ येतात.
त्यात अनिष्का म्हणे, "तू काही मोमेंट्स बनवत नाहीस. तू माझं काही जपून ठेवत नाहीस. सांग आपण पहिल्यांदा कधी भेटलो."
यावरून ब्रेकप! आपण पिक्चरचे हिरोहिरॉइनच जणु.
इथं मी लग्नासाठी, घरासाठी पैसे जोडतोय.'
इतक्यात Spotify लिस्टमधलं गाणं सुरू झालं, " मन्ने सांभ सांभ रखे तेरे झांझरा के जोडे"
'हे रिकामटेकडे असलं बिनकामाचं सांभाळून पोरींच्या अपेक्षा वाढवून ठेवतात. पैंजण सांभाळतोय! इन्वेस्ट्मेन्ट कर त्यापेक्षा.'
अर्णवने कांदा चिरायचा थांबवून हातातली सुरी गाणाऱ्या मोबाईलवर फेकून मारली.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
भाकरीबरोबर जगायला फूलही लागतं
भाकरीबरोबर जगायला फूलही लागतं.
पण जमलीये. अर्णवसारखे लोक असतात.
अपेक्षा.. सॉरी.. उत्प्रेक्षा>
अपेक्षा.. सॉरी.. उत्प्रेक्षा>> खरंय!
जमलीय. अर्णव आणि अनिष्का
जमलीय. अर्णव आणि अनिष्का दोघंही आपापल्या जागी बरोबर आहेत.