२००३ - मे महीना.
माझा इन्टर्व्ह्यु देउन झालेला होता. रोज सकाळी उठले की धावत जाउन ईमेल चेक करणे - का तर अमेरिकेतून तोवर रिप्लाय आलेला असतो. आणि काहीतरी २५ की २६ मेला उत्तर आले. 'सिलेक्टेड' - अमुक इतका पगार. लवकरात लवकर जॉइन व्हायचे आहे - २८ मे ला
नंतरचे २-३ दिवस प्रचंड धामधुमीचे गेले. प्रोफेशनल कपडे, प्रवासाच्या बॅग्स, डॉलर्स तर होते कारण नवरा जहाजावर जात असे. घरात युरो पासून केन, डॉलर सगळ्या करन्सीजच्या नोटा , नाणी असत.
मुलीचा आणि नवर्याचा निरोप घेताना इमोशनल व्हायला झाले. जरी हे माहीत होते की एका महीन्यात ते सुद्धा अमेरिकेत एच ४ वरती येणार आहेत. विमानतळावर निरोप द्यायला आई-बाबा आलेले. तेव्हा कुठे माहीत होते पुढील ११ वर्षे आम्ही भेटणार नाही.
एल ए ला जायचे होते व्हाया हीथ्रो.
मला नीट आठवणार्या ३-४ गोष्टी इथे लिहीते -
.
(१) तेव्हा मी डिओड वापरत नसे. तशी सवय नव्हती कारण ते प्रकरण माहीतच नव्हते. बाप रे!! आय मस्ट बी स्टिंकिंग आफ्टर २०-२४ अवर्स जर्नी कारण हिथ्रोवरती बराच मोठा ले-ओव्हर होता. बिच्चारा माझ्या बाजूला बसलेला माणूस 
.
(२) हिथ्रोवरती मोठ्ठा चॉकलेट बार घेतला. याईक्स!! तो होता पिनट बटर चॉकलेट बार. स्निकर्स मला वाटतं. टाकुन द्यावा लागला.
.
(३) विमानात एक कागदी खाकी रंगाची जाड बॅग असते. विमान उतरते वेळी, मी इमानेतबारे माझा सर्व कचरा गोळा करुन त्या बॅगेत टाकला आणि विमान उतरताना, हवाईसुंदरीने कचरा कलेक्ट करतात तेव्हा तिला दिला. तिने चिमटीत ती पिशवी धरली आणि पट्टकन तिच्या केर गोळा करण्याच्या पिशवीत टाकली. नंतर खूप महीन्यांनी कळले की विमान लागले तर ती पिशवी उलटी करण्याकरता वापरतात.
.
(४) उतरताना सारे लोक शिस्तीत उतरतात. पहील्यांदा पुढच्या रांगेतील व्यक्ती बाहेर निघते मगच आपण जायचे असते. पण मी सवयीने ट्रेनमध्ये करतात तशी धक्काबुक्की करण्याचा क्षीण प्रयत्न केला. मग लक्षात आले इथे सर्व शिस्तीत चालते. 
.
(५) उतरल्यावरती माझ्याकडे , $१०० ची नोट होती. चिल्लर काहीच नाही. मला घ्यायला माझी एक मैत्रिण येणार होती. मला त्यांना फोन करायचा होता पण पब्लिक फोन करता क्वार्टरच नव्हता. कित्येक लोकांना विचारले पण कोणाकडेच चेन्ज नव्हती. मग शेवटी ज्या विमानकंपनी च्या विमानाने आले त्यांना म्हणजे ब्रिटिश एअरवेज च्या रिसेप्शनिस्टना सांकडे घातले व चिल्लर मिळवुन फोन केला.
.
(६) तपासणी, प्रश्नोत्तराच सोपस्कार पार पडल्यावरती पहील्यांदा एअरपोर्टबाहेर म्हणजे अमेरिकेच्या भूमीवर पाऊल टाकले आणि खूप आनंद झाला - अरे अमेरिका अमेरिका म्हणतात ती हीच का!
तेव्हा माहीतच नव्हते की पुढील कित्येक वर्षे (आयुष्य?) इथे या भूमीवरती जाणार आहे. जस्ट लागली लॉटरी जाउन येउ १-२ वर्षे असे वाटलेले होते. अमेरीकेचा मोठ्ठा ध्वज वार्यावरती गर्वाने, फडकत होता आणि माझ्या मनात आनंदाचे उधाण आलेले होते की येस्स!! डन इट. पुढील कित्येक वर्षे स्वप्नात भारतच येत असे. खरेच वाटत नव्हते की आपण अमेरिकेत आलेलो आहोत.
लेखन उपक्रम : माझा पहिला विमान प्रवास : सामो
Submitted by सामो on 24 September, 2026 - 10:05
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
छान लिहिलंय सामो
छान लिहिलंय सामो
छान लिहिलं आहे.
छान लिहिलं आहे.
छान लिहिलं आहे.
छान लिहिलं आहे.
खूप महीन्यांनी कळले की विमान लागले तर ती पिशवी उलटी करण्याकरता वापरतात. >> मला हे आत्ता कळले.
भारीच लिहिले आहे.
भारीच लिहिले आहे.
पहिलाच विमान प्रवास आणि तो ही डायरेक्ट अमेरिका. जबरी.
व्हिसा आधीच होता का?
व्हिसा काढावा लागला ऋतुराज.
व्हिसा काढावा लागला ऋतुराज. ज्या दिवशी मला व्हिसा मिळाला आम्ही दोघे खूप आनंदात होतो. मुंबईत रीगल ला का कुठे आम्ही 'कॅच मी इफ यु कॅन' सिनेमा पाहीलेला स्मरतो.
अरे वा छान लिहिले आहे सामो
अरे वा छान लिहिले आहे सामो
तेव्हा बरेच जणांचा पहिला विमान प्रवास अमेरिका असावा असे वाटते. माझ्या ओळखीतले, सर्कलमधील असे काही होते.
छान लिहिलंय सामो.
छान लिहिलंय सामो.
छान लिहीलय सामो
छान लिहीलय सामो
छान लिहिलंय! ❤️
छान लिहिलंय! ❤️
कविन, नितनवे, ऋन्मेष आणि
कविन, नितनवे, शर्मिका, ममो, ऋतुराज मनीम्याऊ, ऋन्मेष आणि देवकी आभारी आहे.
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.
मस्त
मस्त
आवडली आठवण. २००३ चा मे महिना
आवडली आठवण. २००३ चा मे महिना म्हणजे सार्स तेव्हा जोरात होता ना? सिंगापूर एअरलाइन्सच्या फ्लाईट्स बंद होत्या हे लक्षात आहे. त्यामुळेच तुम्हाला बहुधा पश्चिम किनार्यावर यायचे असूनही युरोपमधून यावे लागले असेल. नाहीतर तिकडे सिंगापूर, कोरियन, कॅथे जास्त मिळतात.
डिओड म्हणजे डिओडरंट हे पुढच्या संदर्भावरून समजले. काही सेकंद वाटले इलेक्ट्रॉनिक्स मधला डायोड लोक असे रिटेल वस्तू सारखा कशाला वापरतील
फोनच्या बाबतीत तेव्हा ती कलेक्ट कॉलची पद्धत होती. तुम्हाला त्यावेळेस माहीत नसेल. मलाही इथे नंतर समजली. अगदी सुरूवातीला एक दोनदा वापरल्याचे आठवते.
छान लिहिलं आहे.
छान लिहिलं आहे.
उबो, मी_स्वच्चंदी, फा आणि
उबो, मी_स्वच्चंदी, फा आणि कुमार सर - खूप आभारी आहे.
फा मला सार्सचे आठवत नाही. 'कलेक्ट कॉल' हेसुद्धा अजुनही माहीत नाहीये.
डिओड हा शब्द (शॉर्टफॉर्म) मी सर्रास वापरते.
---------------
पण येस! इलेक्ट्रॉनिक्स मधील डिओड आठवला त्या निमित्ताने. ११-१२ इलेक्ट्रॉनिक्स होते.