मायबोली वर्षाविहार २०२५
लोकहो, मस्त पावसाळा सुरू झालेला आहे.
भिजलात की नाही पावसात?
काय म्हणता? नाही अजून.
बरं ठीक आहे, चिंब भिजायला आणि मस्त मजा करायला आपला लाडका ववि येतोय. तुम्ही ववि २०२५ ची दवंडी ऐकली ना?
मग आता आम्ही आलो आहोत त्याबद्दल आणखी सांगायला.
यंदा आपण ववि करणार आहोत नवीन रंगात नवीन ढंगात...
आहात ना तयार?
सगळ्यात आधी कॅलेंडरवर २० जुलै २०२५ चा रविवार हा "वविवार" म्हणून नोंदवून ठेवा बरं पटकन.
तारीख राखून ठेवलीत?OK
एक कबुली सुरवातीलाच देते. मी आस्तिक किंवा नास्तिक दोन्हीही नाही. किंबहुना
सोयीस्करपणे दोन्हीही आहे. आस्तिक असणं तुलनेनं सोपं असतं. एखाद्या सर्व-शक्तिमान ठिकाणी श्रद्धा ठेवून त्या शक्तीवर विश्वासानं सगळं काही सोपवलं की आपण निर्धास्त. अशा वेळी विरोधी भूमिका घेणा-यांकडे पाठ फिरवून त्यांना हुर्र्ऽऽऽ करायला जमलं की झालं. पण तरी कधी काही चुकार प्रश्नांचे भुंगे सतावतात, कोड्यात टाकतात, त्रास देतात, आपल्या श्रद्धास्थानाच्या अस्तित्वावर शंका घेण्यास भाग पाडतात.
नमस्कार मित्रांनो,
या गणपतीत आंबोली ते कर्नाटकातील मुर्डेश्वर, गोवा मार्गे गाडीने जायचा बेत आखत आहोत. जाताना वाटेत लागतील ती प्रेक्षणिय स्थळे पाहात, आवश्यकतेनुसार मुक्काम करत जायचे असा दोन-तिन दिवसांचा प्रवास करणार आहोत.
मुर्डेश्वर, गोकर्ण इतके माहिती आहे. जायच्या वाटेवर कारवार, अंकोला वगैरे मोठी शहरे आहेत. बाकी इतरही पाहण्यासारखे असेल.
कृपया आंबोली-गोवा - कारवार-अंकोला-मुर्डेश्वर मार्गावरच्या पाहण्यालायक जागा, चांगले होमस्टे व खादाडीच्या जागा सुचवा.
मित्राचं घरचं ज्वारीचं दळण टाकायला शेजारच्या ‘कागनरी’ गावात गेलो होतो. गाव ४ किमी.अंतरावर! (शहरी लोकांनी हा फरक ध्यानात घ्यावा).संध्याकाळी कोरड्या माळरानावर गाडी पळू लागली. मी गार,बोचरं वारं अंगावर घ्यायला लागलो. १५ मिनटात गाडी गावात शिरली.
कॉर्बेटच्या वाटांवर.. ढिकाला, गैरल- जंगल सफारी -०२ (अंतिम)
यापूर्वीचा भाग एक : “https://www.maayboli.com/node/86758 “
पुढे चालू..
वाघ बघून मन भरलं होतं आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे तो आमच्यापासून खूप लांब गेला होता.
वाघ आलाय.. वाघ आलाय.. ही बातमी ऐकून बाकी ही बरीचशी सफारी वाहने त्या जागी आली होती, म्हणून मग आम्ही तिथून निघायचा निर्णय घेतला.
पहिलं वळण घेतल्यानंतर तिथल्याच एका झाडावर हा गरुड बसला होता.
या आधीचा भाग -
https://www.maayboli.com/node/86852
ट्रेक दिवस २
भोज खरक ते केदार खरक
अंतर अंदाजे ५ किमी
ऊंची : १२,८०० फूट ते १४,२०० फूट
सकाळी नेहमीप्रमाणे लवकरच साडेचारला जाग आली. बाहेर थोडं फटफटलं होतं. लोक उठून गर्दी करायच्या आत टॉयलेट टेंटच काम आटोपून घेतलं. जमेल तसे दात घासले आणि बाहेरच बसून राहीले.
कँप हळू हळू जागा होत होता.
दरवर्षी एप्रिल महीना आला की आंब्यांचे वेध लागतात, मे अखेरीस पावसाचे, ऑगस्टमध्ये गणपती तसे डिसेंबर, जानेवारी आला की आम्हाला ट्रेकचे वेध लागतात. ( निबंधाची सुरुवात वाटते आहे ना ? )
तसेच ह्याही वर्षी, कुठे जायचं ? हा विचार सुरु झाला.
माझ्या मनात दोन जागा होत्या, पण त्यातल्या एकाची एकच बॅच होती, जी कोणास ठाऊक कधी फुल झाली होती आणि दुसर्याची तारीख जमेल असं वाटत नव्हतं.
मग माझ्या लिस्टमध्ये असलेले ट्रेक्स, त्याच्या उपलब्ध तारखा, त्यातल्या मला जमू शकतील अश्या तारखा ह्या सगळ्यांचा लसावि, मसावि काढून केदारताल नक्की केला.
मायबोली वर्षाविहार २०२५
ऐका होss ऐकाss...
पैशाला दोन खारका...
पाटलाचा बैल मारका...
ऐका होss ऐकाss...
मदत हवी आहे?
कोणी मायबोलीकरांनी या देशांना पर्यटक व स्थळदर्शन म्हणून भेट दिली आहे का? असल्यास ७ ते ८ दिवसात काय काय पहावे, ग्रूप टूर घ्यावी का, स्थानिक टूर ऑपरेटर आहे का, भारतातील कोणी टूर आयोजक असल्यास ते चांगले आहेत का इ. माहिती देऊ शकाल का? मी जुलै ऑगस्ट मध्ये ७ ते ८ दिवस जायचे म्हणतोय.