
९ रन द ल्यूज विदाउट फ्युएल!!
..हेमंत नाईक
वैयक्तिक न्यूझीलंड येथे फिरण्यास येणारे कमी आहेत बहुदा ट्रॅव्हल कंपनी वा इथं मुलं असली तर त्यांच्या बरोबर फिरतात. बहुतेक वेळा इंटर्नरीत नॉर्थ आयलंड मधील ऑकलंड रोटोरुआ होबिटन सेट, वैटामोचे ग्लो वर्म केव्ह आणि मग ओक्लॅण्ड स्काय टॉवर बघून झाले की फ्लाईटने साऊथ आयलंड येथे जाऊन न्यूझीलंडची ऍडव्हेचर कपिटल क्वीन्सटाउन, नयनरम्य मिलफोर्ड साऊंड, वनाका, फॉक्स ग्लसीअर आणि मग शेवटी ग्रेमाऊथ ते क्राईस्टचर्च हा जगातील एक सुंदर रेल्वे प्रवास करून ही ट्रिप पूर्ण करतात.
रोटरूआ हे त्यापैकी एक.. खूप काही सांगण्यासारखं असणार हे शहर मी दुसऱ्यांदा एक्सप्लोर करतो आहे.
"Run the Luje Without Fuel" या आजच्या भागात मात्र, मी जगात फार कमी ठिकाणी असलेल्या अशा जादुई छोटया घसरगाडी प्रकारच्या, ल्यूजबद्दल त्या नयनरम्य प्रवासाबद्दल लिहिणार आहे.मित्रांनो इधनशिवाय काहीही वर्क होणं कठीण आहे अगदी आपल्याला ही अन्नरूपात ते लागते. इथं गुरुत्वाकर्शणाचे इंधन घेऊन हा अबालवृद्धासाठी हा सुंदर साहसी खेळ आहे आणि तो ही अत्यंत निसर्गरम्य अशा वातावरणात.
सर्वप्रथम स्काय लाईन्स या बंदिस्त रोपवे ने दहा मिनिटात उंचावर पर्वत शिखरावर पोहचायचे असते तेथे दोन ठिकाणहून या ल्यूज निघतात.तिन चार मार्ग आहे दोन किमी अंतर हे डोंगर उतारावरून Luje द्वारे हिरव्यागार निसर्गातून वेगाने घसरताना बालपण आठवते.. आपले आयुष्यही किती वेगाने गेले हा पण विचार माझ्या मनात येऊन गेला . डोंगरावरून सुटलं की डायरेक्ट खाली पायथ्याशी पोहचल्याशिवाय गत्यन्तर नसते.
तसंच,
"मानवी जीवन असत आनंदाचे क्षण नकळत निसटत असतात परत तेथे जाताही येत नाही फक्त्त पुढे पुढे जायचे असते... मागे कुणालाही परतता येत नाही."
जगरहाटी
_जीवन अनेक_
_वळणावर वळले_
_पुढे जाता ते_
_मागचे न दिसले_
_दिशा एकच ती_
_पुढे पुढे जाण्याची_
_त्यात सर्वं आनंदी_
_स्मृति टिपण्याची_
_स्मृति अमुल्य फक्त्त_
_त्या आपल्या साठी_
_विरतील त्या बरोबर_
_ही असे जगरहाटी.._
ल्यूजचे हॅण्डल आपल्या कडे ओढले की वळणावर ब्रेक लावून स्पीड कमी करता येतो. ल्यूज राईड साठी हेल्मेट घालणे अनिवार्य आहे.. इथं तर सायकलिंग करताना सुद्धा हेल्मेट घालावे लागते.
या राईड मध्ये चार साईझ मध्ये हेल्मेट शोधायला सोपे पडावे म्हणून ते वेगवेगळ्या रंगात होते. या ट्रकवर उतरताना ठराविक तिन ठिकाणी निसर्गाच्या बॅकग्राऊंड वर तुमचे ऑटोमॅटिक कॅमेराद्वारे फोटो घेतले जातात आणि तुमचे हेल्मेट स्कॅन केले की तुम्ही ते स्क्रीनवर पाहू शकतात कॉपीसाठी मात्र विस पंचवीस डॉलर लागतात. खाली उतरल्यावर ल्यूज वर नेण्या करता स्पेशल रोप वे आहे.. या ओपन रोप वे ने बेंचवर बसून परत वर जाऊन तुम्ही ल्यूज परत एन्जॉय करू शकता.
या डोंगरावर वरती पाचशे माणसे एका वेळा बसु शकतील एवढे मोठे रेस्टॉरंट आणि त्याच्या काचेतून दिसणारा विस्तीर्ण रोटोरुआ लेक आणि ते सुंदर गाव असे विलक्षण दृश्य कायमस्वरूपी मनात बिंबते.
या ठिकाणी बिग स्विंग एक उंच झोका आहे तुम्हाला दोरीने मागे ओढत सुमारे शंभर मिटर मागे उंच नेले जाते आणि तेथून तुम्हास ते सोडतात. दोरीवरून व्हॅली क्रॉसिंग हे सुद्धा या ठिकाणचे आकर्षण आहे.
चार ते पाच मार्ग, ल्यूजचे आहेत त्यात सिनिक रूट, बिगीनर्स,स्टीपउताराचाअसे ते मार्ग आहेत.
आम्ही ईस्टरच्या तिन सुट्या लागून आल्या असल्याने नियोजन केले असल्याने सर्वं ठिकाणी बऱ्यापैकी गर्दी होती.
ल्यूज पूर्ण करून वर येतांना ओपन रोप वे तून खाली हिरव्या गार डोंगरावर वळणदार सुंदर उतरणारे ल्यूजचे मार्ग आणि त्यावर वेगात घसरणाऱ्या या गाड्या असे सुंदर दृश्य दिसत होते. नेमके त्याच वेळा स्टिप उतार असलेल्या एका मार्गांवर एक वेगात जाणारी ल्यूज उतारावर उलटली पण सुदैवाने त्या चालकास इजा झाली नाही.
ओपन रोपेवे ने वर येतांना तुमच्या बेंच खाली परत वर नेण्यासाठी ल्यूज लटकावल्या जातात. जोरात हवा आली की संपूर्ण ओपन रोप वेचा बेंच हलताना थोडी भिती वाटते.रोटोरूआ येथे तापमान ऑकलंड पेक्षा कमी असतें त्या दिवशी ९ डिग्री होते. अशा थंडीत देखील घाम फोडणारा हा साहसी खेळ ल्यूज अविस्मरणीय आहे.
दोन अशा चकरा मारल्यावर वर असलेल्या रेस्टारन्ट मध्ये निसर्गरम्य दृश्य अनुभवत बफे जेवण घेऊन आम्ही स्काय लाईन रोप वेने परत खाली आलो.
...हेमंत नाईक
०४.०४.२४
नवीन माहिती.
नवीन माहिती.
लेखमाला वाचते आहे.
>>>>त्या दिवशी ९ डिग्री होते.
>>>>त्या दिवशी ९ डिग्री होते. अशा थंडीत देखील घाम फोडणारा हा साहसी खेळ
अश्या वाक्यांनी मजा आली.
.
तो ३६० डिग्री व्ह्यु फारच सुंदर आहे.
>>>>>>>>>>>"मानवी जीवन असत आनंदाचे क्षण नकळत निसटत असतात परत तेथे जाताही येत नाही फक्त्त पुढे पुढे जायचे असते... मागे कुणालाही परतता येत नाही."
+१
'लेट देम' पुस्तकात मेल रॉबिन्स म्हणते की आपल्या प्रिय जनांचा सहवास हा एक वितळणारा बर्फाचा चौकोन आहे (क्युब). तो वितळतोय सतत. आपण फक्त एवढेच करु शकतो की आनंद घेउ शकतो. ते वितळणे ना थांबवता येत ना मंदावता येते.
वाह मस्त.. इंटरेस्टिंग आहे
वाह मस्त.. इंटरेस्टिंग आहे राईड.. कल्पना करून अनुभवली.
धन्यवाद
धन्यवाद