
*१० रिंग ऑफ फायर*
✍️हेमंत नाईक
०५.०४.२४
रोटरूआ हे १५ देशातून जाणाऱ्या पॅसिफिक समुद्रा लगतच्या " रिंग ऑफ फायर " या खूप साऱ्या ज्वालामुखीने ऍक्टिव्ह असलेल्या भागावर वसले आहे.
जगात होणारे ९० टक्के भुकपं या ४०००० किमी पसरलेल्या ज्वालामुखीना जोडणाऱ्या लाईनीलगत म्हणजेच फायर ऑफ रिंग्स वर होत असतात.
ज्वालामुखी ने कोन शेपचे पर्वत तयार होतात पण खूप मोठे इरप्शन झाले की मॅगमा कोलॅप्स होतॊ आणि कॅलडेरा फॉर्म होतो. सुमारे २,३०,००० वर्षापूर्वीच्या , मोठा २२ किमी कलडेरा तयार करणाऱ्या, ज्वालामुखीच्या या इरप्शनमुळे हा भुभाग तयार झालेला आहे.
येथे खूप जिओथर्मल ऍक्टिव्हिटी बघता येतात. अनेक जिओथर्मल पार्क येथे आहेत शहरांलगतच किरावू पार्क आहे. सुंदर हिरवळ लाल पिवळे आणि हिरवे या रंगाच्या तिन्ही पानांनी, रंगीत फुलझाडानी निसर्गाने नटवलेली ही धरिती सुंदर असली तरी, तिच्या पोटात असलेली प्रचंड खळबळ उष्ण पाण्याचे झरे, गरम सल्फरच्या वाफा, मडी बुडेबूडे दाखवणारे पॉंड्स, हे या पार्क मध्ये सुंदर व सुरक्षित वॉकवेत फिरताना अनुभवता येतात.
"ते पुइया" हे अजून एक सुंदर जिओ थर्मल पार्क जिथे एंट्री फी नव्वद डॉलर्स असून तेथेही माओरी संस्कृतीचे दर्शन घडवले जाते. येथील मुख्य आकर्षण म्हणजे पोहुतु हा उंच उडणारा गरम पाण्याचा गिझर अर्थात कारंजा.
जिओथर्मल पार्क "वाई ओ टापू "(या माओरी शब्दाचा अर्थ पवित्र पाणी असं होतो ) येथील मीनरल्स मुळे वेगवेगळ्या रंगाच्या छटा दाखवणाऱ्या शंपेन पूल आणि "लेडी नोक्स" हा गरम कारंजा प्रसिद्ध आहे.
येथे दहा पंधरा असे जिओ थर्मल पार्क असावेत. पण या सर्व एरियात गरम वाफा कुठे न कुठे तरी वर येत असताना दिसत असतात.
नेमक्या या ऍक्टिव्हिटी का होतात?कोणत्या होतात? ते जाणून घेऊ या.
उष्ण पाण्याच्या गीझरचा उद्रेक थर्मल ते गतिज उर्जेच्या रूपांतराने चालतो. दुसऱ्या शब्दांत, जमिनीत खोलवर असलेले पाणी जवळच्या उष्ण खडकांमुळे गरम होते, आणि जेव्हा परिस्थिती अगदी योग्य असते, आणि आच्छादित खडकांचा दाब पडतो जातो तेव्हा पाणी गीझरच्या रूपात उंच उसळून जमिनीतून बाहेर पडते.
मड पूल का तयार होतात...जिओथर्मल भागात मातीचे पूल तयार होतात जेथे खोल उकळत्या द्रवपदार्थातून वाफ आणि वायू उथळ भूजल किंवा पावसाच्या पाण्यात घट्ट होतात. सल्फर वायू पाण्याला अम्लीय बनवतात आणि पृष्ठभागावरील खडकांवर हल्ला करून चिकणमाती बनवतात. चिकणमाती-समृद्ध माती तलावाच्या पाण्यात मिसळून चिखल, वाफेवर गरम होणारी मळी किंवा चिखलाचा तलाव तयार होतो.आणि त्यात वायुचे बुडबुडे येतांना दिसतात.
रोटोरुआचे सर्वं थर्मल पार्क हे सुशोभीत केलेले असून प्रत्येक ठिकाणी सोव्हीनिअर शॉप आहेत..सुंदर रेस्टारन्टही आहेत.
"सुंदर लँडस्केपींग, रंगीबेरंगी फुलांची झाड ठिकठिकाणी सुंदर कलात्मक शिल्प आणि आकर्षक परिसर सुरक्षित हिरव्या रंगातून जाणारे लाकडी वॉक वे... बाहेरील ८ डिग्री चे थंडगार तापमान आणि शेजारीच उकळते पाणी आणि उष्ण सल्फर वाफा असे विरोधाभासी चित्र मनात ठसवून या थर्मल पार्क सहलीतून हॉटेलवर परतलो असलो तरी रोटोरुआला अजून बरेच काही बाकी आहे .
इथे असलेल्या शांतता अन अशांततेबद्दलची शब्द रचना ..
शांत.. अशांत
अस्वस्थता इथं
धरतीच्या पोटी
जाणवते सभोंवती
उसळे ती वरती
तिला नटवून सुंदर
सुस्वरूपं दिसें ती
तिच्या मानवपुत्राची
अजब करणी ही.
शांत काय अशांत
कोडे इथे पडले..
अशांततेत शांतता
निश्चिन्त ती झोपे..
चक्र जेव्हा चालू
त्याचे नाव जीवन.._
अशांततेनंतर शांतता
जाणा हाही मंत्र..
_✍️ हेमंत नाईक_
०५.०४.२४