भविष्यातील शस्त्रे
रशियाच्या दोन अतिप्रगत शोधानंतर चीन आणि अमेरिकाही जागे झाले आहे. आपण एक लक्षात ठेवले पाहिजे कि मी लिहल्याप्रमाणे पोसिडॉनची सुरवात दहा वर्षांपूर्वीच झाली होती. वेगवेगळ्या टप्प्यातून जात आत्ता ते पूर्ण झाल्याचे रशियाने ते मान्य केले आहे. यानंतर अमेरिकेने परत जवळ जवळ तीस वर्षानंतर परमाणू विस्फोट करण्याचे ठरवले आहे. आत्ता पर्यंत अनेक राष्ट्रांनी परमाणू अस्त्रांचे प्रयॊग केले आहेत ते खालील प्रमाणे....
रशिया
अमेरिका
चीन
फ्रान्स
ब्रिटन
भारत
पाकिस्तान
या पैकी सर्वांकडे खालील प्रमाणे परमाणू शस्त्रे आहेत.
रशिया 4,309, युनाइटेड स्टेट्स 3,700, चीन 600, फ्रान्स 290, युनाइटेड किंग्डम 225, इंडिया 180, पाकिस्तान 170, इस्राएल 90, आणि नॉर्थ कोरिया 50.
या शिवाय 2017 च्या आसपास दक्षिण आफ्रिकेजवळ समुद्रात आगीचा प्रचंड लोळ दिसला होता. सर्व राष्ट्राने सिटी बीटी (Comprehensive Nuclear-Test-Ban Treaty) करारावर साह्य केल्या आहेत फक्त त्यात भारत , पाकिस्तान आणि काही छोटी राष्ट्रे नाहत . अमेरिका आणि चीन ने सिटी बीटी रेटिफाय केली नाहीत. अमेरिकेच्या संसदेने सिटी बीटी मान्य करायचे नाकारले आहे.
डोनाल्ड ट्रम्प परत परमाणुशक्तीचे प्रयोग करण्यास सिद्ध झाला आहे त्यामुळे भारत अमेरिका मधील अणुशक्ती करार समपुष्टात येऊ शकतो. त्याच प्रमाणे अमेरिका व रशिया या मधील करारही समपुष्टात येऊ शकतो. चीन ने आपले प्रतिउत्तर म्हणून ड्रोन कॅर्रीर्स विकसित केले आहेत. या सामुद्रिक आणि हवाई या दोन्ही प्रकारच्या आहेत. जास्त माहिती उपलब्ध नाही.
2025 च्या सुरवातीसच डोनाल्ड ट्रम्प ने ऑर्डर देऊन गोल्डन डोम या प्रकल्पास सुरवात करायला सांगितली आहे. गोल्डन डोम तयार झाल्यास , त्यामुळे युद्ध अंतराळात पोहचेल. एका कल्पनेप्रमाणे यात सहाशे ते एक हजार सॅटेलाइट असतील आणि ते पृथ्वीवरील कोणत्याही कोपऱ्यातील हालचाल टिपून त्याच्या नाशाकरिता अतितीव्र लेजर किरणांचा अवकाशातून मारा करतील. या प्रकल्पाची सुरवातीची किंमत 14 लाख कोटी डॉलर्स असून ते पूर्ण होईपर्यंत सत्तर कोटींवर जाईल अशी अपेक्षा आहे. अणुशक्तीचे प्रयोग करण्यास किंवा गोल्डन डोम सुरु करण्यास अमेरिकेला मनुष्यबळाचा मोठा तुटवडा पडणार आहे. अणुशक्तीचे प्रयोग करण्याकरिता आज त्यांच्याकडे तयार साईट नाही. रशिया , चीन आणि भारताने मुख्यतः आपल्या भूमीवरच प्रयोग केले आहेत तर ब्रिटनने बरेच प्रयोग अटलांटिक महासागरात केले आहेत. इस्राइल तर मौन बाळगून आहे. एकच आश्चर्य वाटते कि सिटी बीटी वर सुद्धा सही न केलेल्या अमेरिकेला इराणच्या अणुभट्टींवर हल्ला करण्याचे किंवा इराणच्या प्रमुख अणुशास्त्रज्ञांस रस्त्यावर ठार करणे शोभा देते काय ?
भविष्यातील शस्त्रे
Submitted by अविनाश जोशी on 3 November, 2025 - 06:48
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा