नवीन शस्त्रे

Submitted by अविनाश जोशी on 1 November, 2025 - 08:26

नवीन शस्त्रे
डोनाल्ड ट्रम्पला साडेसाती सुरु झाली असावी त्याच्या विविध देशांच्या भेटीत गेल्या दोन दिवसात , चीन चे अध्यक्ष जिनपिंग यांना भेटला. ट्रम्पचा जातानाचा चेहरा आणि भेटीनंतरचा चेहरा आणि देहबोली पाहण्यासारखी होती. बैठक संपल्यानंतर जिनपिंग ट्रम्पला सोडायला त्यांच्या कार पर्यंत सुद्धा गेले नाहीत तर ट्रम्पच जिनपिंगला सोडायला त्यांच्या कार पर्यंत गेला. आता लवकरच बुढापेस्ट मध्ये डोनाल्ड ट्रम्प आणि पुतीन यांची भेट ठरली आहे.
ऑक्टोबर मध्येच पुतीन यानी शेवटच्या आठवड्यात दोन महत्वाच्या शस्त्रासंबंधी घोषणा केली. पहिली म्हणजे UUV (Unmanned Underwater Vehicle) अश्या तर्हेची सध्याची वेहिकल्स पेट्रोल कंपन्या आणि कित्येक संरक्षण खाती समुद्राखालच्या टेहळणीसाठी वापरतात. आत्ताच रशियाने जाहीर केलेले पोसिडॉन हे वेगळेच आहे. हे साधारण एक किलोमीटर खोलीवरून जाते आणि त्याचा वेग 250 किलोमीटर पर तास एवढा असू शकतो. सर्वात मुख्य गोष्ट म्हणजे ते अणुशक्तीवर चालते त्यामुळे त्याची क्षमता, पोच आणि पाण्याखाली राहण्याचा काळ अनंत आहे. अणुशक्तीवर चालणारे पोसिडॉन त्याचा व्यास 1.5 ते 2 मीटर असून त्याची लांबी 20 ते 25 मीटर आहे. याच्या संशोधास 2015 साली सुरवात झाली होती. परंतु 2019 साली पुतीन ने त्याचे अस्तित्व मान्य केले. 2022 साली संशोधन पूर्णत्वास गेल्यावर संरक्षण खात्याकडे सुपूर्त करण्यात आले. आणि आत्ता ऑक्टोबर 2025 मध्ये ते जाहीर करण्यात आले. एवढेच नव्हे तर K31 जातीच्या सबमरिनवर अशा तर्हेची आठ शस्त्रे बसवल्याची ही माहिती बाहेर आली आहे. एक किलोमीटर खोलीवर ही शस्त्रे शत्रूच्या अतिशय जवळ समुद्रात राहू शकतात. त्यांना शोधून काढणे अतिशय कठीण आहे. कुठल्याही तर्हेची हालचाल न ठेवता किंवा कसलाही आवाज न करता ती राहू शकतात. अणुशक्तीमुळे कुठल्याही तर्हेच्या ऑक्सिजनची जरूर नसते. यांचे वजन 100 टनापर्यंत असू शकते. आणि संदेश मिळाल्यावर काही सेकंदातच ती शत्रूवर हल्ला करू शकतात. अजूनतरी कुठलीही पाण्याखालील संरक्षण क्षमता कोणत्याही राष्ट्राकडे नाही.

चीन ने संशोधनास सुरवात केली आहे परंतु अजूनपर्यंत कोणतीही माहिती नाही. अमेरिकेकडे या प्रकारचे अजून तरी काही नाही आणि त्यांचे जास्त संशोधन डिझेल /बॅटरी पॉवर्ड शस्त्र अस्त्रांवर जास्त आहे. प्रमुख अश्या एअर डिफेन्स सिस्टिमचा म्हणजे अमेरिकन पॅट्रीऑट , रशिया S 400 अथवा भारतात येऊ घातलेले सुदर्शन चक्र या सर्वांचा या शस्त्राविरुद्ध काहीही उपयोग नाही.
पुतीनने दुसरे महत्वाचे शस्त्र जाहीर केले म्हणजे बेलगोरॉड (Belgorod) अणुशक्तीवर चालणारे मिसाईल. अणुशक्तीमुळे अमर्यादकाल , उडू शकणारे हे शस्त्र केव्हाही दिशा वेग बदलू शकते. तसेच कोणत्याही ठिकाणावर झेपावू शकते. त्यामुळे या शस्त्राला अडवणे अवघड आहे . चीन व अमेरिका या दोघांकडेही याच्या बरोबरचे शस्त्रास्त्र नाही.
अमेरिकेने अशी शस्त्रं संशोधनाकरिता तयार करण्यास मुख्य अडचण म्हणजे त्यांच्याकडे आता अणुशास्त्रज्ञ फारच कमी उरले आहेत. सगळ्यात हलकी व लहान अशी अमेरिकेत असलेली यंत्रे फारच अवाढव्य आहेत.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तपशिलात काही त्रुटी आहेत.

K ३१ ( इको क्लास) ही पाणबुडी रशियाने १९८७ साली मोडीत काढली आहे. https://en.wikipedia.org/wiki/Echo-class_submarine

श्री व्लादिमिर पुतीन यांच्या म्हणण्यानुसार --पॉसिडॉन हा ड्रोन -टॉर्पेडो बेलगोरॉड या K ३२९ सुधारित ऑस्कर क्लास पाणबुडीवरून डागता येतो.हि पाणबुडी सध्या अस्तित्वात असलेली जगातील सर्वात मोठी आणि सर्वात लांब पाणबुडी आहे आणि यावरून पोसिडॉन हा पाणतीर/ पाणड्रोन डागता येईल असा दावा केला आहे. https://en.wikipedia.org/wiki/Russian_submarine_Belgorod

सध्या रशिया कडे असलेली सर्व क्षेपणास्त्रे हि जमीनीवरून किंवा हवेतून किंवा पाणबुडीतून डागता येणारी पण हवेतूनच प्रवास करणारी आहेत. (बाकी देशांची क्षेपणास्त्रे सुद्धा अशीच हवेतून प्रवास करतात) त्यामुळे त्यांना रडार किंवा उपग्रहाद्वारे शोधून काढणे अगदीच अशक्य नाही.

याउलट पॉसिडॉन हा पाणतीर पाण्याच्या खालीच राहून तेथूनच तो वेगाने प्रवास करून किनाऱ्यावरील शहरे किंवा नौदलाचे तळ यावर थेट हल्ला करू शकेल. या पाणतीरावरील अणुशक्ती मुळे किनाऱ्यावर प्रचंड सुनामी सारख्या लाटा येऊन सर्व शहरच्या शहर पाण्याच्या लोटाने नष्ट होऊ शकेल. शिवाय यातील किरणोत्सर्गामुळे शहर बेचिराख होईल. https://www.wionews.com/photos/russia-s-poseidon-drone-the-doomsday-nucl...

या दाव्यातील सत्यता किती आहे हे सध्या तरी शोधून काढणे शक्य नाही. कारण या पाणतीरामध्ये बसवलेली अणुभट्टी हि इतर पाणबुड्यांच्यावर असलेल्या अणुभट्टीच्या एक शतांश इतकी लहान असल्याचा दावा केला आहे. याशिवाय १ किमी खोलीवर हा बरेच दिवस राहू शकेल असाही दावा केला आहे.

हि क्षमता रशियाच्या अल्फा क्लास पाणबुडीत होती असे सांगितले जाते. इतक्या खोलीवर साधा रण पाणबुडीच काय पण पाणतीर सुद्धा जाऊ शकत नाही कारण या खोली वर कोणतेही लोखंड/ पोलाद चेपले जाते त्यामुळे अल्फा क्लास पाणबुड्या टायटॅनियम हे मूलद्रव्य वापरून बनवलेली होती आणि तिची अणुभट्टी थंड करण्यासाठी द्रवरूप बिस्मथ आणि शिसे हे कुलंट म्हणून वापरले जात होते. https://en.wikipedia.org/wiki/Alfa-class_submarine

पोसायडॉन मध्ये असे काय धातू संमिश्र वापरले आहे हे जाणून घेणे औत्सुक्याचे ठरेल.

याशिवाय इतक्या खोल असलेल्या पाणतीराला संदेश देणे हे तितकेच कठीण काम आहे. यासाठी EXTREMLY LOW FREQUENCY विद्युतचुंबकीय संदेश वाहक वापरावे लागते. याची वारंवारता ७०-८० हर्ट्झ असते. अर्थात हि क्षमता रशिया कडे आहे. https://en.wikipedia.org/wiki/Communication_with_submarines

Owing to the technical difficulty of building an ELF transmitter, the U.S.,[3] China,[5] Russia,[4] and India[6][7] are the only nations known to have constructed ELF communication facilities:

ही क्षमता भारताकडे पण आहे हि एक अभिमानाची बाब आहे.

यात तांत्रिक बाबी प्रचंड आहेत आणि त्याची संपूर्ण माहिती मिळणे अशक्य आहे.

ट्रम्प यांनी केलेल्या दर्पोक्तीला पुतीन यांनी दिलेले हे उत्तर असण्याची शक्यता आहे. हा राजकारणाचा भाग आहे.

पण हि पाणबुडी आणि हा पाणतीर खरोखरच किती क्षमतेचा आहे हे पाहणे मनोरंजक ठरेल यात वाद नाही.

कुठल्याही तर्हेची हालचाल न ठेवता किंवा कसलाही आवाज न करता ती राहू शकतात.

गंमत म्हणजे अणुपाणबुड्या या जरी जास्त वेगाने जाऊ शकत असल्या किंवा जास्त खोलीवर जात असल्या किंवा त्यांना पाण्याच्या पृष्ठभागावर ऑक्सिजन साठी महिनोन्महिने येणे आवश्यक नसले तरी डिझेल इलेक्ट्रिक पाणबुड्यांपेक्षा त्यांचा आवाज जास्त असतो.

याचे कारण डिझेल जनरेटर बंद केला तर बॅटरीतुन होणाऱ्या विजेच्या पुरवठ्याचा आवाज फारसा होत नाही आणि जर पाणबुडीतील पंखे किंवा इतर उपकरणे बंद केली तर डिझेल पाणबुडीचा आवाज जवळजवळ नाहीच.

याउलट अणुभट्टी थंड ठेवण्यासाठी त्यांना कूलंटचे पम्प सतत चालूच ठेवावे लागतात. या पम्प चा आपला आवाज असतोच. याशिवाय त्यावरील अणुभट्टीच्या नियंत्रणा साठी असलेली इतर उपकरणे चालू ठेवावीच लागतात.

यामुळे आश्चर्य वाटत असले तरी अणुपाणबुड्या डिझेल पाणबुड्यांइतक्या शांत नसतात.

>>यामुळे आश्चर्य वाटत असले तरी अणुपाणबुड्या डिझेल पाणबुड्यांइतक्या शांत नसतात.<< +१
दोन्हि प्रतिसादांशी सहमत. पोसाय्डनची बातमी तशी जुनी असावी कारण त्याचा उल्लेख डिप्लोमॅटच्या ३र्‍या सिझनमधे खुबीने करुन घेतलेला आहे...