आयुष्य

Submitted by लेखनवाला on 7 November, 2025 - 14:17

नका चिंता करू, आयुष्य सुंदर फार आहे.
अता दुःखात जो, तोही पुन्हा हसणार आहे.

खुळे मन व्यर्थ खोटे स्वप्न पाहुन आस हरते.
मनाच्या संयमातच जीवनाचे सार आहे.

उगा हेवा करुन सांगा कुणाला काय मिळते.
जगाला प्रेम द्या, हा चांगला व्यापार आहे.

कुण्या लाचार मित्राचा बना आधार थोडा.
उद्या तोही परत तुमची मदत करणार आहे.

जरी आलेत संकट लाख, खेळा हिम्मतीने.
तरच तो सामना मग चांगला रंगणार आहे.

विनाकारण कशाला मृत्युला या घाबरावे.
तुम्ही कर्तृत्व रूपी या जगी उरणार आहे.

Group content visibility: 
Use group defaults

सर्वांना नमस्कार.

मायबोलीवर ही माझी पहिली गझल आहे.
तुमचा प्रतिसाद आणी मार्गदर्शन पुढील लेखनासाठी प्रेरणा देईल.
धन्यवाद!

नवीन प्रतिसाद लिहा