सोडून दिलंय
हो, मी आता रडणं सोडून दिलंय
रोज रोज मरणं सोडून दिलंय
बोलताना समोरून उत्तर अन
ऐकताना झुरणं सोडून दिलंय
मानाची इच्छा, प्रेमाची अपेक्षा,
रोजच होणारी त्या शब्दांची समीक्षा
प्रतीक्षा, शुभेच्छा, सदिच्छा साथ
स्वेच्छेने पुरवणं सोडून दिलंय
हो, मी आता रडणं सोडून दिलंय
वाद - अनुवाद, साद - संवाद,
उगाच द्यायचा म्हणून प्रतिसाद
सगळे नाद, दाद, विवाद, संवाद,
आता वापरणं सोडून दिलंय
हो, मी आता रडणं सोडून दिलंय