साहित्य

खूप थंडी आहे यंदा

Submitted by पाषाणभेद on 17 November, 2025 - 23:13

खूप थंडी आहे यंदा. पांघरायला ब्लॅंकेट काढू का दुलई काढू?
ब्लॅंकेट काढ.
पण ब्लॅंकेट धुवायला लागते आधी.
मग दुलई काढ.
दुलई फार हलकी आहे वजनाला.
मग ब्लॅकेट काढ.
ब्लॅंकेटने काय थंडी थांबते का?
मग दुलई काढ.
दुलई थोडी आपरी आहे.
मग ब्लॅंकेट काढ.
ब्लॅंकेट अंगाला टोचते.
मग दुलई काढ.
दुलई कॉटनच्या कापडाची नाही नं.
मग ब्लॅंकेट काढ.
ब्लॅंकेट लई महागाचं आहे नं.
मग दुलई काढ.
जाऊद्या. आपली गोधडीच बरी आहे.

शब्दखुणा: 

कॅट कॉन्सलर

Submitted by चैतन्य रासकर on 27 October, 2025 - 03:52

"कॅट कॉन्सलर?"
"म्हणजे?"
"कॅट म्हणजे मांजर आणि कॉन्सलर म्हणजे आपले ते.." मी ए.आय. ला विचारत म्हणालो
"ते मांजरींची कॉन्सलिंग करतात" नीरव त्याची मांजर कुरवाळत म्हणाला.
मांजराच कॉन्सलिंग?
बाशिंग, लगीन, मग कॉन्सलिंग हे माहित होतं. मांजराचं कॉन्सलिंग??
माझ्या छातीत एकदम धसिंग झालं.

दिवाळी अंक २०२५

Submitted by ऋतुराज. on 5 October, 2025 - 23:59

नमस्कार मायबोलीकर,
दसरा झाला आणि दिवाळी आता अवघ्या पंधरा दिवसांवर आली आहे. बाजारात दिवाळी अंक यायला सुरुवात झाली आहे.
तर हा धागा यंदाच्या दिवाळी अंकासाठी. कोणकोणते दिवाळी अंक घेतले? त्यात काय काय वाचले? यावर चर्चा करायला हा धागा वापरू.
इथल्या मायबोलीकरांचे लेख, कविता, कथा कोणत्या दिवाळी अंकात छापून आले असल्यास त्याची माहिती इथे नक्की देऊया.

विषय: 
शब्दखुणा: 

कोण?

Submitted by Meghvalli on 21 September, 2025 - 02:27

नकळत कैसै होते सुरवंटाचे फुलपाखरू,
कोण पोशितो वाळवंटी उंच हिरवे तरू.
सूर्योदयीच का कुसुम फुलते,
कोण कळ्यांत भरते वारु,
का बगळ्यांची माळ फुले आकाशांत त्याच आकारू.
स्वर नी व्यंजन किती ही असले तरी मुळ नाद तो ओंकारु,
नाद ब्रम्ह हा ब्रम्हांडात या झाला कसा साकारु.
कोण सांगेल उत्तर यांचे, कोणास मी विचारू.
तो सर्व साक्षी कोण आहे, कोण माझा सदगुरू.

शनिवार, २०/९/२५ , ०८:३५ PM
अजय सरदेसाई -मेघ

meghvalli.blogspot.com

खंत

Submitted by Meghvalli on 18 September, 2025 - 08:05

तारुण्यातली स्वप्ने विरून गेली, ही खंत।
आयुष्याची कळी गर्दीत चिरडून गेली, ही खंत।।

जपलं जे गुपित हृदयात, अंतरीच राहीलं।
मनातून ओठांवर न आलं, ही खंत।।

वाटलं होतं उमलतील पुन्हा नवी फुलं।
न उमलतांच पाकळ्या गेल्या झडून -ही खंत।।

प्रीत माझ्या मनातली, जरी गहिरी।
तुला न कळली सखे, ही खंत।।

"मेघ" अश्रूंमध्ये भिजत भिजत रात्र सरली।
माझा उदयस्त सूर्य मलूल-ही खंत।।

गुरुवार, १८/९/२५ , ०३:०१ PM
अजय सरदेसाई -मेघ
meghvalli.blogspot.com

शब्दखुणा: 

अकराव्या वाढदिवसाचं पत्र: गोष्ट "बीलीव्हरची"!

Submitted by मार्गी on 18 September, 2025 - 01:29

तू ऐक ना

Submitted by Meghvalli on 14 September, 2025 - 03:23

तू ऐक ना

शेर १:
माझ्या वेदनांचे रुंजन तू ऐक ना।
माझ्या हृदयाचे स्पंदन तू ऐक ना।।

शेर २:
रात्रभर जागते स्वप्नांचे हे सिंचन।
हळव्या मनाचे सर्जन तू ऐक ना।।

शेर ३:
पावलोपावली भग्न स्वप्नांचे स्मरण।
डोळ्यांत दाटलेले मूक रुदन तू ऐक ना।।

शेर ४:
हृदयाच्या ठोक्यांना गाण्याचे कोंदण।
ह्या गाण्यांतले यमन तू ऐक ना।।

शेर ५:
अश्रूंच्या धाग्यांने गुंफलेले जिवन।
तुझ्या स्मिताने झाले उन्मन तू ऐक ना।।

शेर ६:
आयुष्य एक संवेदनशील ग़ज़ल।
त्या ग़ज़ली चे चरण तू ऐक ना।।

अंदाज मी ठेवत नाही

Submitted by Meghvalli on 13 September, 2025 - 08:59

मतला:
ते म्हणतात, शब्दांचा लिहाज मी ठेवत नाही।
ही अदा काय कमी आहे, की कटूतेचा अंदाज मी ठेवत नाही।।

शेर २:
असतील कुणी सुसंस्कृत, ज्यांची शिष्टाई अदबी आहे।
मी भावनांचा प्रेमी आहे, अदबी अंदाज मी ठेवत नाही।।

शेर ३:
माझी रचना ग़ज़ल नसेल कदाचित, नज़्मच आहे।
भावना भिडल्या तर क़ाफ़िया-रदीफ़चा अंदाज मी ठेवत नाही।।

शेर ४:
साहित्यिक तो, जो शब्दांत भावना मिसळतो।
ग़ालिब सारखा भाषेचा अंदाज मी ठेवत नाही।।

मक़ता:
मी ‘मेघ’ आहे, हे आकाश माझेच आहे।
वाहत्या वाऱ्यांचा अंदाज मी ठेवत नाही।।

ग़ज़ल

Submitted by Meghvalli on 13 September, 2025 - 02:11

हे दुःख नव्हे,शब्दांनीजे व्यक्त आहे।
ही आर्तता शब्दांतली आहे,वेड्या ही ग़ज़ल आहे।।

मनातली एक स्वप्न सुंदरी येथे प्रकटली आहे।
नटली अलंकृत शब्दांनी आहे,वेड्या ही ग़ज़ल आहे।।

मी तिला नी ती मला कधी न भेटलो आधी।
भेट फक्त शब्दांची आहे,वेड्या ही ग़ज़ल आहे।।

शब्दांनी बांधली तिला,एरव्ही ती न वश कुणाला।
शब्दांवाचून जी निसटली आहे ,वेड्या ही ग़ज़ल आहे।।

'मेघ',लय, काफिया,रदिफ हस्तक ज्याचे।
ती, त्याचीच आहे,वेड्या ही ग़ज़ल आहे।।

शनिवार, १३/९/२५ ,११:३० PM
अजय सरदेसाई -मेघ

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - साहित्य