साहित्य

गुरु महिमा

Submitted by हर्षल वैद्य on 15 July, 2025 - 13:09

आंधळ्या वाटेने । चालतोचि आहे ।
पुढे काय पाहे। दिसो नाही ॥

कितीक जन्मांची । कर्मे ही चालली ।
आणिक उरली । किती एक ॥

कर्मफलाशेचा। मोह तो सुटेना।
वाट ती सरेना । पायातील ॥

देही जन्म झाला । देही अडकला ।
देहचि मानिला । सत्यरूप ॥

देहभोग कांक्षा । तेवढी उरली ।
अतिप्रिय झाली । देहसुखे ॥

कामांधतेपायी । लोपलासे धर्म ।
सततचे कर्म । असत्याचे ॥

पुरता रुतलो । कामाच्या कर्दमी ।
जीव अर्थकामी । अज्ञानी गा ॥

कामकाननी ह्या । प्रकाश दिसेना ।
वाट सापडेना । गुरूविण ॥

शब्दखुणा: 

स्मरणगाथा - गोनीदांचा विलक्षण जीवनप्रवास!

Submitted by छन्दिफन्दि on 10 July, 2025 - 22:32

एखाद महिन्यापूर्वी इकडील (अमेरिकेतील) एका वाचनालयात, तेथील परदेशी भाषा विभागात डोकावले. तर मराठी विभागात 50-100 पुस्तक दिसली. त्यातील “स्मरणगाथा” मी घरी येऊन आले. या पुस्तकाची प्रथम आवृत्ती 1973 मध्ये निघाली होती. पुस्तकामध्ये 1920 नंतरचा काळ दाखवला आहे.
ही स्मरणगाथा म्हणजे गोनिदांचे (गोपाळ नीलकंठ दांडेकर) आत्मचरित्र. ही गाथा त्यांच्या वयाच्या 13 व्या वर्षी म्हणजे साधारणता 1929 मध्ये सुरू होत. जेव्हा ते स्वातंत्र्यसंग्रमात सहभाग घेण्यासाठी घरातून पळाले तिथपासून ते पुढची सलग सतरा वर्षे - हा १७ वर्षांचा प्रवास ५०० पानांत वाचायला मिळतो.

ढसाळांची कविता 0: ढसाळ आणि त्यांच्या कवितेबद्दल

Submitted by चेराज on 16 May, 2025 - 12:46

गेल्या तीन-चार वर्षांपासून मी ढसाळांची कविता वाचत आहे. ढसाळांच्या कवितेशी माझा संबंध तसा खूप उशिरानेच आला. सवर्णांच्या सांस्कृतिक जडणघडणीत दलित कविता किंवा एकूणच दलित वाङ्मय/कला यांच्याशी संबंध बेतानेच येत असावा. तसा आला तरी त्याचा सखोल विचार होणे आणि त्याबद्दल आवड, एक प्रकारची आपुलकी निर्माण होणे हे ही बहुधा विरळच असावे. आजही मराठी साहित्य/कला/संस्कृती आणि त्यासंबंधीच्या संकल्पना, ज्यांना सुर्वे “सारस्वत” म्हणतात त्यांनी डॉमिनेट केलेली आहे आणि ह्या बायसला अनुसरूनच कोणत्याही कलाप्रकाराचे संस्कार आपल्यावर होत असतात.

शब्दखुणा: 

कालजयी

Submitted by रानभुली on 15 May, 2025 - 10:03

१५ मे १९९९
सेकंड शिफ्ट संपत आली.

अकराचे टोल पडले. ११.०५ मिनिटांनी नवीन शिफ्ट कार्डस पंच करेल.
त्या आधी मशीन बंद आणि स्वच्छ करून कालजय सप्तर्षी गडबडीत निघाले.

मुलं झोपली असतील. त्यांच्या मनात विचार आला.
गेले कित्येक दिवस ते सेकंड आणि थर्ड शिफ्ट करत होते. थर्ड शिफ्टला लोक टाळाटाळ करतात.
पूर्वी डबल शिफ्टचे पैसे मिळायचे आणि रात्रीच्या शिफ्टचे अडीच पट.

पण आता कंपनीने लबाडी सुरू केली. रात्रीच्या शिफ्टमधे सप्तर्षींना टाकलं.
आणि सेकंड शिफ्टचा ओव्हरटाईम देऊ लागले. त्यामुळं नुकसान होऊ लागलं पण सांगता कुणाला ?

शब्दखुणा: 

पुंडलिक एक नाही

Submitted by किरण कुमार on 18 April, 2025 - 04:00

आज सकाळीच म्हणे
एक प्रसंग घडला
पंढरीच्या वेशीतून
विठू बाहेर पडला

हाल विचारू भक्ताला
आज त्यालाही वाटले
साध्या पाऊल वाटेने
गाव दूरचे गाठले

चंद्रमौळी झोपडीच्या
विठू येताच दाराशी
थांब बाहेरच देवा
आली आरोळी कानाशी

आला कसा अचानक
नाही निरोप धाडला
कसे स्वागत करावे
प्रश्न भक्ताला पाडला

आता आलाच आहेस
मग बस जेवायाला
पण गोडधोड नाही
माझ्याकडे वाढायाला

झोप कोपऱ्यात जिथे
नाही गळणारं पाणी
नवी गोधडी काढतो
तुझ्यासाठी चक्रपाणी

पुस्तक परिचय : बाळूच्या अवस्थांतराची डायरी (किरण गुरव)

Submitted by ललिता-प्रीति on 14 April, 2025 - 03:38

हे तीन मोठ्या कथांचं छोटंसं पुस्तक आहे.
कथा, लघुकथा, दीर्घकथा – यांची नक्की व्याख्या कशी करायची याबाबत माझ्या मनात कायम गोंधळ असतो. माझ्या मते या पुस्तकातल्या तीनही कथा दीर्घकथा म्हणायला हव्यात. असो.

रंगाढंगाचा देश भाग~ 2

Submitted by अविनाश कोल्हे on 14 April, 2025 - 01:36

रंगाढंगाचा देश आयर्लंड — भाग 2

आता पुढील स्वप्न - आयरिश भूमी!

डब्लिन ते कॉर्क – "धडाकेबाज" स्वागताने सुरुवात!
आयरिश भूमीवरील पहिले पाऊल

परदेशात पहिल्यांदाच उतरलो होतो, आणि तोही थेट युरोपमध्ये—आयर्लंडमध्ये! विमानाच्या खिडकीतून बघितलेले डब्लिन शहर विमानतळावर उतरण्यापूर्वीच मनाला धरून बसले होते. विमान जसे उतरायला लागले, तशी आकाशातून खाली दिसणारी हिरवाईची चादर अधिकच जवळ येऊ लागली. हिरवेगार कुरणे, त्यांना विभागणारे दगडी कुंपण, एक पातळ रेषेसारखी वाहणारी नदी आणि दूरवरचा निळसर समुद्र – सगळंच अतिशय सुरेख होतं.

शब्दखुणा: 

रंगाढंगाचा देश. भाग 1

Submitted by अविनाश कोल्हे on 13 April, 2025 - 01:29
प्रवास वर्णन

माझी पहिली विदेशवाट

लेखक: अविनाश अरुण कोल्हे.

पहिल्यांदाच विदेशात जात होतो, तेही थेट युरोपमध्ये – आयर्लंडला! कल्पनेतही कधी पाहिलं नव्हतं असं हिरवंगार आयर्लंड माझ्या प्रवासाची वाट पाहत होतं. प्रवास जरी मुंबईतून सुरू होत असला, तरी तो प्रत्यक्षात मनात मात्र काही महिन्यांपूर्वीच सुरू झाला होता. नकाशावर बोटं फिरवता फिरवता, इंटरनेटवर आयर्लंडचे फोटो पाहता पाहता, त्या हिरव्यागार देशाची स्वप्नं रोज डोळ्यांत रंगत होती.

शब्दखुणा: 

शंतनू नायडू- ध्यास घेतलेला माणूस

Submitted by मार्गी on 8 April, 2025 - 05:14

✪ शंतनू नायडूची प्रेरणादायी मुलाखत
✪ वाचनासाठी पुरस्कार देण्याची वेळ येऊ नये
✪ "मला रतन टाटांबद्दल प्रश्न विचारू नका!"
✪ मुंबई बूकीज- निसर्गात वाचण्याची चळवळ
✪ पुस्तकं डोनेट करणं सोपं, पण मांडीवर घेऊन वाचनाची गोडी लावणं कठीण
✪ Good fellows India – नातवंड भाड्याने देतो! ती वेळ आलेली आहे
✪ रतन टाटा माझ्यासाठी "डंबलडोर" होते!
✪ आई शिक्षिका. पण घरी शिक्षिका व शाळेत आई
✪ आई म्हणते, मराठी मुलगी मिळाली तर बरं होईल!

शब्दखुणा: 

अनुवाद क्षेत्रातील संधींचा परिचय करून देणाऱ्या संमेलनाचा वृत्तान्त

Submitted by पराग र. लोणकर on 26 March, 2025 - 01:19

अनुवादकांच्या एका सुंदर संमेलनात प्रकाशक म्हणून सहभागी होण्याची संधी मला नुकतीच मिळाली. त्या संमेलनाचा वृत्तान्त पुढे देत आहे. ज्या मंडळींना या क्षेत्रात काही काम करण्याची इच्छा असेल, त्यांना - कदाचित - काही उपयोग होऊ शकेल.
~

*नुकत्याच नांदेड येथे संपन्न झालेल्या तिसऱ्या अखिल भारतीय अनुवादित मराठी साहित्य संमेलनाविषयी!*

Pages

Subscribe to RSS - साहित्य