साहित्य

जीवनाचे सौंदर्य

Submitted by Meghvalli on 22 April, 2026 - 02:33

हिरव्या गवताच्या पात्यांवर स्फटिकांचे दवबिंदू टपोरे,
सोनेरी तिरीप उन्हांची त्यावर महिरप पसरली रे,
हलकेच वार्‍याच्या स्पर्शाने ते मोती थरथरले,
क्षणभरात त्या सौंदर्याचे स्वप्न गवतात विरघळले।

क्षितिजावर उमलल्या किरणांच्या नव्या ओळी,
मनाच्या कप्प्यात पसरली त्यांची लाली,
हातात गवसले म्हणता सगळेच दूर सरकते,
डोळ्यांना जे दिसते सुंदर, ते दृश्य क्षणोक्षणी बदलते।

भासाभासांच्या या खेळात मन हळूच हरवते,
सापडल्याच्या आनंदातही काहीतरी निसटते,
कळत असूनही का हा मोह सुटत नाही?
क्षणांच्या मागे धावताना मन स्वतःच हरवत जाई।

सैरभैर

Submitted by Meghvalli on 22 April, 2026 - 00:16

क्षणोक्षणी रात्र अधिक काळोखी होते,
टिपटिप टपोऱ्या चांदण्यात न्हाते,
ढगांमधून डोकावत चंद्र हासतो,
प्रेमाच्या सावल्यांत हलकेच विसावतो।

वार्‍यावर स्वार एक गीत सैरभैर पळते,
गुज त्या गीताचे कानांत घुमते,
डोळ्यांच्या काठावर स्वप्नांची पालवी,
स्वप्नांमागे झुलत झुलत मन का बरे पळते?

उत्तरांच्या शोधात मग हरवते वाट,
भावनांच्या धुंदीत गुंततो प्रत्येक श्वास,
हातात न धरता येणारे ते क्षण सारे,
तरीही मनात उरतो त्यांचा चिराभास।

तू नसताना

Submitted by Meghvalli on 20 April, 2026 - 04:32

तुच असतेस माझ्या मनात तू नसताना,
तुझाच विचार असतो मनात तू नसताना।

श्वासांत दरवळतो तुझ्या स्पर्शाचा सुगंध,
मी हरवून जातो त्या शांत क्षणांत तू नसताना।

डोळ्यांत उठते तुझ्या आठवणींचे रान,
मन भरकटत राहतं मग त्या बनांत तू नसताना।

एकांतही जणू सोबतीसारखा भासतो,
मी घालवतो वेळ त्या एकांता सोबत तू नसताना।

फुलाफुलांत दडलेले तुझेच मृदू हसू उमलते,
मन अलवार मिसळते त्या फुलांत तू नसताना।

शब्दांना हरवून बसते अर्थांचीही ओळख,
“मेघ” विरघळून जातो अजाण अस्तित्वात तू नसताना।

सोमवार, २०/४/२६ , १०:१५ AM
अजय सरदेसाई -मेघ

पुन्हा

Submitted by Meghvalli on 20 April, 2026 - 04:24

चल नवी ओळख पेरू पुन्हा,
चल नवी मैत्री सुरू करू पुन्हा।

जुन्या आठवांची धूळ झटकून,
मनाशी साधूया संवाद पुन्हा।

मावळला जरी आजचा दिवस,
उद्या होईल सुंदर सकाळ पुन्हा।

क्षणांच्या या ओल्या मातीत,
विश्वासाचे बीज रुजवू पुन्हा।

कितीदा नव्याने गुंफून गोष्टी,
मी तिचं स्वप्न पाहतो पुन्हा।

टपोऱ्या चांदण्यातली ती चंदेरी वाट,
चल त्या वाटेवर एकत्र चालू पुन्हा।

नव्या क्षितिजावर नवे आभाळ रंगवू,
सृजनाची कुंचली हातात घेऊ पुन्हा।

रविवार, १९/४/२६, २:१० PM
अजय सरदेसाई – मेघ

क्षणीक

Submitted by Meghvalli on 19 April, 2026 - 00:47

क्षणीक मृगजळाच्या मोहात पडतो,
क्षणीक सावल्यांच्या मोहात पडतो.

येणारा प्रत्येक नवीन क्षण अनोळखी,
तरीही मी मात्र त्याच्या प्रेमात पडतो.

रोज सकाळी सोनेरी क्षणांचा अर्क,
अलवार आयुष्याच्या प्याल्यात पडतो.

दिशा उजळल्या अमृत किरणांनी,
आयुष्याचा किलबीलाट कानांवर पडतो.

दूर क्षितिजावर स्वप्नांची किनार,
'मेघ' त्या क्षितीजावर रेंगाळत पडतो.

रविवार, १९/४/२६ , १०:०० AM
अजय सरदेसाई -मेघ

जुनी पाने..

Submitted by शिवानी बलकुंदी on 15 April, 2026 - 05:42

ग्रंथालयातील एक नेहमीचे दरवर्षीच करावे लागणारे काम म्हणजे जुनी झालेली, बांधणी खिळखिळी झालेली पुस्तके काढून टाकणे, किंवा नव्याने बांधणी करायला देणे.
हे करत असताना अनेक पुस्तके, एकदा पुनरबांधणी झालेली असली तरी आता त्यांची परत बांधणी करण्याची वेळ आलेली असते. पण ते करता येणे शक्य नाही अशा वेळी अशी पुस्तके ग्रंथालयातून कायमची काढून टाकावी लागतात, असे पुस्तके काढून टाकणे मला फार जड जाते.

विषय: 

अनोळखी ओळख

Submitted by Meghvalli on 15 April, 2026 - 00:21

भेटला मज एक अनोळखी आज,
मनमेळ झाला, झाली सुरू मग गाज।
गाजेत आल्या कित्येक गोष्टी,
त्याच्या नि माझ्या मनातल्या कोष्टी।

तो अन मी आधी कधीच भेटलो नाही,
तरीही माझं त्याच्यापासून काहीच दडलं नाही।
तो मज वाचत होता जणू पुस्तकासमान,
पाठचे, पुढचे, आजचे—सर्व अध्याय घुमान।

काय म्हणू मी यास, काय करू या आभासास,
भेट आमुची क्षणभंगुर—जणू स्वप्निल प्रकाश।
जसे भेटलो अचानक तसेच वेगळेही झालो,
काही प्रश्न सुटले, काही अनुत्तरित—मी एकटाच उरलो।

स्थळ: हिंदुजा हॉस्पिटल – इमर्जन्सी
तारीख: १३/०४/२०२६
वेळ: साधारण ४ वाजता

मी वाचलेले पुस्तक -४

Submitted by भरत. on 9 April, 2026 - 01:44

आधीच्या मी वाचलेले पुस्तक -३ या धाग्यावर २००० हून अधिक प्रतिसाद झाल्याने , नवा धागा काढला आहे.

आनंदाने वाचत राहू. काय वाचलं त्यावर काथ्याकूट करत राहू.

विषय: 
शब्दखुणा: 

पाल-घर

Submitted by मेधावि on 2 April, 2026 - 23:21

स्पॉयलर अलर्ट - पुढील लेखात बिभत्स रस आहे. तो अगतिकते पोटी आलेला आहे. कोवळ्या मनाच्या वाचकांनी खरंच वाचू नये. चुकून माकून कुठेतरी "करुण" रस जाणवला, तर तोच योगायोग समजावा.

विषय: 
शब्दखुणा: 

कृपेचा निर्झर

Submitted by Meghvalli on 2 April, 2026 - 04:23

तुझ्या कृपेच्या कथा ऐकल्या मी बहुत,
आज मीही अनुभवला स्पर्श तो अद्भुत।

शब्द माझे हरवले गहिवराच्या प्रवाहात,
कृतज्ञ अश्रू ओघळती शांत ह्या डोळ्यांत।

कसे फेडू दत्ता तुझ्या प्रेमाचे पांग,
करितो प्रार्थना—नित्य ठेवावा संग।

मनपटलावर निर्झरती तुझ्या कीर्तीचे उखाणे,
मन भरून येते आठवून तुझे तराणे।

तुच केली सरस्वती बहाल माझ्या शब्दांना,
केली लय प्रदान माझ्या कवितांना।

ठेव अशीच कृपा नित्य माझ्यावर,
मिळो कीर्ती नि भुक्ती मम कवितेवर।

बीज गीताचे रोवलेस तूच—तूच वृक्ष कर आता,
दत्ता, तव इच्छेविण दुज्या कुणाची काय गाथा।

Pages

Subscribe to RSS - साहित्य