तू ऐक ना

Submitted by Meghvalli on 14 September, 2025 - 03:23

तू ऐक ना

शेर १:
माझ्या वेदनांचे रुंजन तू ऐक ना।
माझ्या हृदयाचे स्पंदन तू ऐक ना।।

शेर २:
रात्रभर जागते स्वप्नांचे हे सिंचन।
हळव्या मनाचे सर्जन तू ऐक ना।।

शेर ३:
पावलोपावली भग्न स्वप्नांचे स्मरण।
डोळ्यांत दाटलेले मूक रुदन तू ऐक ना।।

शेर ४:
हृदयाच्या ठोक्यांना गाण्याचे कोंदण।
ह्या गाण्यांतले यमन तू ऐक ना।।

शेर ५:
अश्रूंच्या धाग्यांने गुंफलेले जिवन।
तुझ्या स्मिताने झाले उन्मन तू ऐक ना।।

शेर ६:
आयुष्य एक संवेदनशील ग़ज़ल।
त्या ग़ज़ली चे चरण तू ऐक ना।।

शेर ७:
थकल्या श्वासांनी केले समरपण।
शेवटच्या प्रार्थनेचे वंदन तू ऐक ना।।

रविवार, १४/९/२५ , २२:४२ PM
अजय सरदेसाई -मेघ

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>>थकल्या श्वासांनी केले समरपण।
शेवटच्या प्रार्थनेचे वंदन तू ऐक ना।
या ओळी आवडल्या.
-----------
व्यंजन चा अर्थ कळला नाही. बाराखडीत, स्वर आणि व्यंजने असतात. पण तो अर्थ इथे बसत नाही.
------------------
जीवन म्हणजे आयुष्य तर जिवन म्हणाजे पाणी/जल असे शाळेत शिकलेले आहे. तेव्हा मला वाटतं जी दीर्घ हवा.

@सामो अभिप्रायाबद्दल धन्यवाद _/\_
"व्यंजन" = सूचकता, भावनिक प्रतिध्वनी, त्या तुटलेल्या स्वप्नांची अप्रत्यक्ष छाया/भाव".
असं सांगण्याचा प्रयत्न होता . बहुतेक प्रयत्न हुकला असे वाटते.

त्या एवजी मी स्मरण हा शब्द एडीट केला आहे.या शिवाय दोन अधीक शेर एड केले आहेत.

_/\_ Happy

मेघवल्ली हे नावच इतकं सुंदर घेतलयत तुम्ही की त्या नावाला जागून सुंदर सुंदर कविता आता कराव्या लागणार तुम्हाला. सीड जर्नल ठेवा :). काही सुचलं की खरडून ठेवायचं त्यात आणि नंतर सुबक बांधणीत जगासमोर आणायचं. एखाद्या तान्ह्या बाळाला आपण तिट लावुन, पावडर लावुन, छान अंगडं टोपडं चढवुन आणतो तसं Happy