विचार

भोंदू बाबा लोकांच्या निमित्ते ..…

Posted
5 दिवस ago
शेवटचा प्रतिसाद
5 दिवस ago

सगळ्यांचे दुःख निवारण करण्याच्या निमित्ताने आपल्या समाजात सतत नवनवीन “बाबा” जन्माला येत असतात. लग्न होत नाही, मुलगा नीट वागत नाही, जमिनीचा वाद मिटत नाही… अशी अनेक कारणं असतात. लोक इतके हतबल होतात की, स्वतःला जन्मापासून ओळखत असूनही स्वतःची बुद्धी आणि आयुष्य एखाद्या व्यक्तीच्या हाती सोपवतात या आशेने की तो त्यांच्या दुःखाचं निवारण करेल.

प्रकार: 

पुण्यसंचय / पूर्वसंचित

Posted
2 आठवडे ago
शेवटचा प्रतिसाद
2 आठवडे ago

मला तर पूर्वसंचित किंवा पुण्यसंचय ही गोष्ट भविष्यात आपण कधी काही करण्यास कमी पडलो तर माफी मिळावी किंवा सवलत मिळावी, या अपेक्षेने आधीच करून ठेवलेली चांगल्या कामांची तजवीज वाटते.

दहा वेळा आपण कोणासाठी तरी जीव ओतून काहीतरी करतो; आणि अकराव्या वेळेला जर थोडी कुचराई झाली, तर निदान हा माणूस मुद्दाम असे करणार नाही इतकी खातरी समोरच्याच्या मनात निर्माण होते ती फक्त आधी दहा वेळा जीव ओतून केलेल्या गोष्टींमुळे.

प्रकार: 

"घडणं की बिघडणं?"

Posted
1 month ago
शेवटचा प्रतिसाद
1 month ago

एकमेकांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा एकमेकांच्या आयुष्यावर काही ना काही परिणाम होत असतो. कधी कमी, कधी जास्त; कधी सकारात्मक तर कधी नकारात्मक. या प्रभावामुळे माणसाच्या विचारांमध्ये आणि वर्तनात बदल होतात. काही बदल अतिशय सूक्ष्म असतात, तर काही इतके ठळक की ते सहज जाणवतात. असे बदल बहुतांशी घरच्यांना जाचक वाटू लागतात.

प्रकार: 

माझा बाप आणि माझ्या बापाचा मुलगा

Posted
7 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
7 वर्ष ago

माझा बाप आणि माझ्या बापाचा मुलगा

ह्याच शीर्षकावर मी काही वर्षापूर्वी लेख लिहिला होता. बाबा गेल्या नंतर माझ्या अपराधी ( हो अपराधी) मनाने विमनस्क अवस्थेतून तो लेख उतरला होता. तेंव्हा काही जणानी तो लेख मनाला टोचतो आहे , इतके नकारात्मक नका लिहू पासून ते ह्या विषयावर काहीतरी सकारात्मक लिहून काढ़ म्हणून सांगितले होते.

तसे बापावर सकारात्मक लिहीणयासारखे बरेच काही असताना शब्द शब्द आसूड ओढण्याची गरज मला का पडावी. कदाचित ती त्यावेळची तीच गरज असावी.

विषय: 
प्रकार: 

काळा पैसा माझे काही तुटके फुटके विचार

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

Hello friends and professional collegues in furtherance of my yesterday's articles regarding some questions on the scheme of Govt/ RBI, I have received a lot of criticism and curses by some of my respected friends and known contacts.

प्रकार: 

तेंंडूलकर माफ करा, आम्ही अजूनही तुम्हाला समजू शकलो नाही !

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

kamala.jpg

सध्या तेंडूलकरांच्या "कमला" नाटकावर आधारीत, "कमला" याच नावाची मालिका चालू आहे.

मी ही मालिका पाहीली नाही. ती किती चांगली किंवा वाईट आहे हे मी सांगू शकत नाही.

सध्या सोशल मिडीयामधे ही मालिका किती भंकस आहे याबद्दल प्रतिक्रिया वाचतो आहे. प्रत्येक प्रेक्षकालाच आपले मत व्यक्त करायचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहेच.

विषय: 
प्रकार: 

कायदे बदलण्याची आवश्यकता.....

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

सहज सुचले म्हणून प्रतिक्रिया वादी पोस्ट टाकली. ती वाहून जाऊ नये म्हणून दुसरीकडे टाका अशी सूचना आली तर कुठे टाकावी कळेना मग माझ्याच रंगीबेरंगी पानावर टाकतोय......

थोडेसे अवान्तर...
गुन्हेगारी वाढते ती कायद्याचा धाक नसल्याने हे जगभर फिरत असलेल्या मायबोलीकराना मान्य व्हावे. कायद्याचा धाक नसल्याचे कारण रेट ऑफ कन्विकशन .. शिक्षेचे प्रमाण अतिशय कमी असल्याने. शिक्शेचे प्रमाण कमी असल्याचे कारण गुन्हा सिद्ध करणारी तपास पद्धती आणि ती ज्याच्यावर अवलम्बून आहेत ती क्रिमिनल प्रोसेजर कोड आणि एव्हिडन्स अ‍ॅक्ट ही बायबले अत्यन्त सदोष आहेत हे,

विषय: 
प्रकार: 

तुमच मत?

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

आमच्या मित्राने ही लिंक पाठवली. मला आवडली. बघा तुम्हाला आवडते का.

http://www.youtube.com/watch?v=bmQX7u9ijVE

प्रकार: 

डॉक्टर, या दिव्याची मशाल होईल! - श्री. संजय आवटे

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

’वैरभाव नि विषमता नष्ट करण्याची थोर साधना आपणास करावयाची आहे. हे साधना साप्ताहिक या ध्येयाने जन्मत आहे...’ - १५ ऑगस्ट, १९४८ रोजी साने गुरुजींनी ’साधना’च्या संपादकीयात लिहिलेलं हे वाक्य एका चळवळीला जन्म देऊन गेलं. साने गुरुजी, ना. ग. गोरे, आचार्य जावडेकर, रावसाहेब पटवर्धन, यदुनाथ थत्ते, वसंत बापट, ग. प्र. प्रधान यांसारख्या ज्येष्ठश्रेष्ठ संपादकांनी ’साधना’ ही चळवळ जोपासली आणि ती तितक्याच प्राणपणानं फुलवली ती डॉ. नरेंद्र दाभोळकरांनी.

प्रकार: 

भारत किंवा भारतियांबद्दलचे असेच काही दुवे

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

फेसबूक ईस्टाईल काही दुवे द्यायचा विचार आहे - भारतियांशी किंवा भारताशी संलग्न.
त्यावर अधीक विचार लिहायला आवडतील. वेळेअभावी कसे/किती जमेल ते पाहुया.

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - विचार