स्वदेशी चा नारा देणाऱ्या सरकारकडून मराठमोळ्या ठाण्यातील एक नवं सांस्कृतिक केंद्र विवियाना मॉल हा विदेशी शक्तींना , खास करून अरबांना विकला हे ऐकले आणि मन सुन्न झाले, चित्त विचलित झाले, पायाखालची जमीन सरकली.
आज ठाणे विकले गेले
माझी खात्री आहे आज सर्व विवेकवादी , पुरोगामी ठाणेकर रडत असतील
आज मॉल विकला गेलाय उद्या सरकारी ऑफीसेस विकली जातील, मग महापालिका मग विधानसभा, लोकसभा, सेंट्रल व्हिस्टा आणि राष्ट्रपती भवनही विकले जाईल. काय काय बघायला लागणार आहे मोदींच्या राज्यात काय माहित.
जीएस्टी चे २ च स्लॅब करून टॅक्स कमी केले आहेत हे दाखवण्याचा आव आणण्यात आलेला आहे असे दिसते.
मला फारसं कळत नाही यातलं. जाणकारांनी कृपया समजवून सांगावे.
जे दिसतंय त्यावरून, हातचलाखी करुन उदा. कार वरचा २८% चा १५% टॅक्स केला तरी १३% कंपनीला अॅडिशनल अन १५% तुम्हाला लावण्यात आला आहे. कंपनी हे १३% तुमच्याच गळ्यात मारणार हे नक्की.
५% जीएस्टीचे इन्पुट क्रेडिट मिळणार नाही, सो पुन्हा तीच गम्मत.
जेव्हा मुम्बै मेट्रो बनवत होते तेव्हा आरे कार शेड प्रकरण चांगलेच गाजले होते
आता निगडी मधे झाडे तोडन्या वरुन वाद सुरु झाले आहे
संबन्धीत कात्रण

कॅनडा, मेक्सिको, चीन या देशातून येणार्या मालावर अतिरिक्त आयात शुल्क लागू होणार असा मोठा निर्णय आज जाहिर झाला. तो निर्णय टाळण्यासाठी कॅनडा , मेक्सिकोने त्यांच्या परिने प्रयत्न केले पण यश आले नाही. कॅनडा आणि मेक्सिकोमधून आयातीवर २५% अतिरिक्त शुल्क आणि चीनमधून आयातीवर १०% अतिरिक्त शुल्क लागू होणार आहे. कॅनडातील ऊर्जा आयातीवर १० % दर असेल.
अमेरिकेत रिटायरमेंट असा वेगळा धागा सापडला नाही. आणि चर्चा करणे सोपे व्हावे म्हणून आर्थिक , तब्येत असे वेगळे धागे काढते आहे.
तर मं डळी पुणे किंवा नाशीक येथे २ बीएच के २ रेस्ट रूम वाला फ्लॅट विकत घेणे आहे. जाणकार माहिती द्या.
१) कोणता एरिआ चांगला? मुंबई हून कॅब ने आरामात येता यावे. व मला ट्रीटमेंट ला ह्या घरातून मुंबईस जावे लागेल. ते जमावे.
२) काय कागद पत्रे जमवावी?
३) होम लोन कुठून घेउ?
४) माझी गरज ७५० - १००० स्क्वे फूट आहे. अगदीच अंधेरी स्टाइल बारका नाका एव्ढा फ्लॅट नको.
५) इन्स्टा वर फार जहिराती येतात पण त्या खर्या असतात का?
६) अजून काय विचारावे बिल्डर ला/ री सेलर ला?
भारतीय ध्वजधारक एमव्ही साईबाबा या तेलवाहू जहाजावर हुथी बंडखोरांनी 23 डिसेंबरला दक्षिण लाल सागरात ड्रोन हल्ला केला. एकाच दिवसात हुथी बंडखोरांनी व्यापारी जहाजांवर केलेला हा दुसरा होता. त्यामध्ये कोणतीही मोठी हानी झाली नसली तरी लाल सागरातील परिस्थिती किती धोकादायक झाली आहे, हे दिसून येत आहे.
नमस्कार,
आर्थिक साक्षरता हा विषय शालेय अभ्यासक्रमात दुर्लक्षित विषय आहे. नविन शैक्षणिक धोरणात तो आता अभ्यासक्रमात घेण्यास सुरुवात होत आहे. मी आमच्या स्टार्ट अप च्या माध्यमातुन या विषयावर काम सुरु केले आहे. त्यासाठी गेमिफिकेशन या पद्धतीने मुलांना आवडेल असे खेळ आपण देउ शकतो का यावर शोध सुरु आहे.
आर्थिक साक्षरता या विषयावरील रॉबर्ट कियोसाकी यांचेसारख्या लेखकांची पुस्तके भारतात उपलब्ध आहेत. परंतु त्यांचे गेमिफिकेशन केलेले खेळ भारतात उपलब्ध नाहीत. ते अमेरिका अन युरोप मध्ये उपलब्ध आहेत. तेथुन ते भारतात आणता येतील का?