AI चे भारतातल्या नोकऱ्यांवर होणारे परिणाम

Submitted by केअशु on 3 January, 2026 - 01:31

जगप्रसिद्ध अब्जाधीश इलॉन मस्क आणि बिल गेट्स हे मागच्या काही वर्षांपासून सांगत आहेत की AI तसेच ऑटोमेशनमुळे ९०% नोकऱ्या जातील. मागच्या दीड वर्षांमध्ये आयटी क्षेत्रातील हजारो नोकऱ्या गेलेल्या आहेत. मायक्रोसॉफ्ट , टीसीएस , accenture या कंपन्यांमध्ये हजारोंच्या संख्येने माणसे कमी केलेली आहेत हे तुम्ही वाचले असेलच. इलॉन मस्क आणि बिल गेट्स हे जगप्रसिद्ध अब्जाधीश आणि तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणारे व्यक्ती आहेत , व्यावसायिक आहेत त्यामुळे त्यांच्या बोलण्याची दखल घेतली पाहिजे.

पण दुसराही प्रश्न उभा राहतो की हे भारतात कितपत खरे होईल? भारतात AI मुळे सध्या आयटी क्षेत्रातील नोकर्‍यांवर संकट येत आहे. पण याच AI किंवा ऑटोमेशनमुळे भारतातली थेट विक्री करणारी दुकाने जसे की तयार कपड्यांची शोरुम्स , इलेक्ट्रिकल होम appliances ची दुकाने , किराणा मालाची दुकाने , मॉल्स , दुचाकी विक्रीची दुकाने , मोबाईल फोन्स विक्री करणारी दुकाने , स्टेशनरी या ठिकाणी काम करणार्‍या कामगारांच्या नोकर्‍या तसेच ऑनलाईन विक्री करणार्‍या कंपन्यांचे डिलिव्हरी बॉईज , सहकारी बँका यांच्या नोकर्‍यांवरही गदा येईल का? यांच्याही नोकर्‍या जाऊ शकतात का?
मुळात वर उल्लेखलेल्यापैकी ऑनलाईन विक्री करणार्‍या आस्थापना , सहकारी बँका वगळता इतर आस्थापनांना(छोटी किंवा मध्यम दर्जाची दुकाने) यांना AI चा किती उपयोग असेल? असलाच तर त्याची किंमत त्यांना परवडेल का?

भारतातल्या नोकरदारांनी AI ला किती घाबरावं? की हे केवळ एक दु:स्वप्न ठरेल?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

Ai ने नोकऱ्या जातील यापेक्षा Ai येणाऱ्या लोकांना नोकऱयांत प्राधान्य दिलं जाईल ,ही महत्त्वाची बाब असेल.